Sangieta Devkar

Tragedy Crime

3.4  

Sangieta Devkar

Tragedy Crime

मैं हु साथ तेरे

मैं हु साथ तेरे

5 mins
548


'आभा आता तुझं आम्ही एक ऐकून नाही घेणार समजले . वय वाढत चालले आहे तुझे, आज येणारे स्थळ खूप चांगले आहे त्याला नकार देऊ नकोस.'

'आई अग पण मला नाही करायचे लग्न इच्छा नाही होत माझी लग्न करण्याची.

'आभा बास आता खूप ऐकून घेतले तुझे निखिल खरच छान मुलगा आहे तुला तो समजून घेईल.'


आता आई पुढे आभाचे काही चालणार नवहते ती गप बसली. तिला लग्नाची मुळात भीती वाटत होती पण कोणाला सांगितले तर आपल्याला वेड्यात काढतील म्हणून ती काही बोलत न्हवती. आता तयार होऊ मग पुढचे पुढे बघू म्हणत आभा तयारीला लागली. आज तिला पाहायला येणारा निखिल दिसायला स्मार्ट होता. त्याचा स्वहताचा टुरिझम बिझनेस होता. निखिल त्याचे आई वडील आभाला पाहायला आले. आभा चहा घेऊन आली. छान दीसत होती. निखिलला आवडली ती. दोघाना एकत्र घरच्यांना बोलून घ्या म्हणाले. तसे आभाच्या रूम मध्ये निखिल आणि आभा आले. निखिल म्हणाला, 'आभा मला तू आवडली आहेस पण तू तुझे मत बिनधास्तपणे सांग मला तू आवडली म्हणजे मी ही तुला पसंत पडावे असे काही नाही.'

'तसे काही नाही तुम्हाला नकार द्यावा असे काहीच नाही तुमच्यात पण मला बोलायचे होते थोडे.'

'आभा जे मनात आहे ते बोल काही ही किंतु न ठेवता.'

'निखिल खर तर मला लग्न या गोष्टीचीच भीती वाटते. मला समजून घेणारा जोडीदार हवा.'

'आभा का लग्नाची भीती वाटते तुला? '

'नाही माहीत पण मी मना पासून तयार नाही.'

'तुला मी आवडलो नाही का? की तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे.'

'नाही निखिल तसे काही ही नाही. तुम्हाला नकार देण्यास काही कारण पण नाही.'

'ओके आभा मग माझ्यावर विश्वास असेल तर हो म्हण लग्नाला. मी समजावून घेईन तुला. काय प्रॉब्लेम आहे तो सांग. '


आभा ला समजेना कसे सांगू याला की मला लग्नाची भीती का वाटते. लहानपनी चा तो प्रसंग कसा सांगू याला. आभा तू विचार कर मग उत्तर दिलेस तरी चालेल. ओके म्हणत आभा आणि निखिल बाहेर आले. दोघाच्या आई वडीलांनी त्यांना विचारले की काय ठरले तुमचे. तसा निखिल बोलला माझा होकार आहे. आभाची आई आभा कडेच पाहत होती की ही काय बोलते . आभा ने ही होकार असल्याचे सांगितले. नाहीतर आई ने तिला नकारा चे कारण विचारून भंडावून सोडले असते. लवकरच आभा आणि निखिल चा विवाह झाला. आज त्यांची पहिली रात्र होती. आभा छान आवरुन निखिल च्या रूम मध्ये बसली होती पण मनातुन प्रचंड घाबरली होती. निखिलला कसे सामोरे जाणार आपण अशी धाकधूक तिला लागून राहिली होती. निखिल आला आत आणि आभा जवळ बसला. तिचा हात हातात घेतला म्हणाला,आभा खूप सुंदर दिसतेस तू. मग त्याने तिच्या चेहऱ्यावर आपले बोट फिरवू लागला. तशी आभा पटकन बाजूला झाली अहो मला खरच भीती वाटते मला स्पर्श नका करू. अरे चिल आभा इतकी का घाबरतेस आणि हे सगळं नॅचरल आहे यात घाबरण्या सारखे काय त्यात? तरी नको माझी तयारी नाही अजून. ओके आभा तुझी इच्छा असेल तेव्हाच मी तुज्या जवळ येईन डोन्ट वरी. थँक्स निखिल आभा बोलली. मग दोघे झोपी गेले. आभा ला वाईट वाटत होते पण तिचा नाईलाज होता भूतकाळातील गोष्ट तिचा पिच्छा सोडत न्हवती. पुरुषी स्पर्शाला ती घाबरत होती. निखिल खरच समंजस होता पण किती दिवस आपण त्याची परीक्षा घ्यायची.? तो तिचा नवरा होता आता आणि बायको म्हणून तिचे कर्तव्य तिला पार पाडावे लागणार होते. असेच पंधरा दिवस झाले. पण आभा अजूनही निखिल जवळ आली न्हवती त्याने विचारले होते की आपण हनीमुन ला जाऊ तुझा मूड ठीक होईल. पण त्याला ही आभा ने नकार दिला. आता जवळजवळ महिना होत आला त्यांच्या लग्नाला. निखिल ने पुन्हा एकदा तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला पण आभा चा नकार. तेव्हा तो रागात म्हणाला,आभा तुला इतकी भीती वाटते तर तू लग्न का केलेस ? मी तुला जवळजवळ महिना भर वेळ दिला तरी तूझ्यात सुधारणा काहीच नाही. मी पण माणूस आहे माझ्या ही काही भावना आहेत आणि तुला नसतील तर जा आताच्या आता हे घर सोडून जा.

आभा रडू लागली म्हणाली,अहो मी आई वडीलां साठी लग्न केले मला वाटले हळूहळू माझी भीती कमी होईल पण नाही झाले तसे तुम्ही जवळ आलात आणि स्पर्श केलात की मला तो प्रसंग तसाच डोळ्यासमोर उभा राहतो. मला किळस येते मग. माझी इच्छा असून सुद्धा मी तुमच्याशी एकरूप नाही होऊ शकत. मला माफ करा माझा भूतकाळ माझी पाठ सोडत नाही म्हणूनच मी कितीतरी मुलांना नकार दिला. निखिल तिच्या जवळ आला कसला भूतकाळ आभा मला सांग. आभा सांगू लागली. माझ्या वडिलांचे मित्र पंकज काका आमच्या घरी नेहमी यायचे. आम्ही त्यांच्या कडे जायचो चांगले घरच्या सारखे संबंध होते आमचे. मी तेव्हा सहा सात वर्षाची असेन. एक दिवस त्यांनी मला चॉकलेट दिले आणि मांडी वर घेऊन मला खाऊ घालू लागले. मी खात होते चॉकलेट आणि काका ओळखीचे नेहमी घरी येणारे मला मुली सारख माननारे त्यामुळे मी त्याच्या मांडी वर बसले हे काही विशेष न्हवते माझ्या आई वडिलांसाठी. मी चॉकलेट खात होते आणि काका माज्या पाठी वरून हात फिरवत होते. कधी पायाला हात लावत होते. मला काही ते समजले नाही. असेच काका दरवेळी काही ना काही खाऊ आणायचे. त्या दिवशी आई बाबाचा लग्नाचा वाढदिवस होता घरी पाहुणे आणि ओळखीचे बरेच लोक आले होते. पंकज काका ही होते. मी बाथरूम मध्ये गेले होते आणि फ्रेश होऊन बाहेर आले तसे पंकज काका बाहेरच उभे होते त्यांनी मला बाहेर येऊ न देता मला ही आत मध्ये घेऊन गेले आणि माझ्या तोंडावर हात ठेवत म्हणाले अजिबात ओरडू नकोस नाहीतर या बाथरूम च्या खिडकीतून तुला खाली ढकलून देईन. मी लहान त्यामुळे घाबरून गप राहिले मग काका मला सगळी कडे किस करत होते मग त्यांनी मला पाठमोरे उभे करून माझी निकर काढून... पुढे आभा बोलू नाही शकली. निखिल ने तिला आपल्या कुशीत घेतले आभा कसं सहन केलीस तू हे सगळं आणि मग आई ला का नाही सांगितलेस. काका नी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती. ओहह किती नालायक माणूस होता तो आभा त्याने तुझे बालपण नासवले. हो निखिल त्या नंतर मी त्या काका समोर जाणंच टाळत होते. किंवा ते घरी आले की मी बाहेर निघून जात होते. पण आई ला सांगायचे धाडस नाही झाले कारण काकांची धमकी आठवत राहायची. मग त्याच वर्षी बाबांची बदली झाली . मला खुप आनंद झाला नव्या ठिकाणी मी रुळले पण त्या पुरुषी स्पर्शाची भीती कायम मनात बसली म्हणून मी लग्नाला नकार देत होते. माझा भूतकाळ मला विसरता येत न्हवता. पण हे आई ला सांगावे असे वाटले नाही . मी एकटीच सहन करत राहिले रात्री घाबरून उठत असे तो प्रसंग आठवून.

आभा मला समजू शकते तू कोणत्या मनस्थितीतुन गेली असशील पण मी आता तुज्या सोबत आहे. माझं प्रेम आहे तुज्यावर. आपण उद्याच मानसोपचार डॉक्टर कडे जाऊ ते तुला यातून बाहेर काढतील. मी तुझी वाट पाहीन आभा कारण यात तुझी काहिच चूक नाही. निखिल किती मोठ्या मनाचे आहात तुम्ही मी तुमच्या माफीच्या ही लायक नाही. नाही आभा असे नको बोलू झोप आता. दुसऱ्या दिवशी निखिल आभा ला घेऊन डॉ कडे गेला. आभाची ट्रीटमेंट सुरू झाली आणि हळूहळू आभा यातून बाहेर आली. निखिल ची साथ आणि प्रेम यामुळे आभा चा संसार फुलला. पण काही काळ तरी तिच्या भूतकाळाची आठवण तिला त्रास देत राहिली पण निखिल ने तिला सांभाळून घेतले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy