Shila Ambhure

Inspirational

3  

Shila Ambhure

Inspirational

मातृप्रेम

मातृप्रेम

1 min
243


  सिग्नलला थांबलेली गाडी पाहून नऊ-दहा वर्षाचा एक मुलगा धावत आला नि रडत-रडत बोलू लागला," दादा,काही खायला असेल तर दया हो." चिडलेल्या सुरेशने गाडीतूनच त्याला झिडकारले. परंतु तो मुलगा काही गेला नाही. तो पुन्हा हात पुढे करून आजारी व उपाशी असलेल्या आईसाठी अन्न आणि औषधासाठी काही पैसे मागू लागला . 'आई ' शब्द ऐकताच सुरेशने रस्त्याच्या कडेला बघितले.फुटपाथवर त्या मुलाची आई फाटकी शाल पांघरुन बसलेली दिसली. सुरेशने घाईने खिशातून हाताला येतील तेवढे पैसे काढून त्या मुलाला दिले. हरवलेले गवसल्याचा आनंद सुरेशला झाला आणि वृद्धाश्रमातून आईला परत आणण्यासाठी तो निघाला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational