मासिक पाळी : अंधश्रद्धा
मासिक पाळी : अंधश्रद्धा
मिरा लहानपणापासून गणपतीची भक्त होती. छोट्या मोठया संकटात मिराची सतत साथ दिल्याने तिला बाप्पावर खूप विश्वास होता. मिराला आईवडिलांचं साथ कमीच मिळाली. तरी तिला तिच्या मामानी सांभाळ करून वकील केलं होतं. लग्न करून तिला चांगल्या घरी दिलं. नवरा तिला खूप प्रेमळ आणि नेहमी साथ देणारा मिळाला.
मामाच्या घरीही मामीच्या दबदब्या खाली ती लहानची मोठी झाली होती. सासरीही तिला सासूच्या दबदब्यात राहावं लागत. मिरा खूप मोठी वकील होती. तिच्याकडे ज्या केसेस येत त्या ती कधी हारली नव्हती. त्यामुळे ती नामांकित वकील म्हणून ओळखली जात होती. घरात मात्र ती सासूबाईंचं सर्व ऐकत. त्यांना मान देत. सासूबाई प्रेमळ पण कडक स्वभावाच्या होत्या. जरा अंधश्रधाळू होत्या. सासूबाईंना तसं वयामुळे काम होतं नसे. मिरा काम आवरून कोर्टात जात.
आज संकष्टीचतुर्थी होती. नेहमीप्रमाणे मीराने आज पुरणपोळी आणि मोदकाचा घाट घातला होता. अचानक पोटात असह्य वेदना सुरु झाल्या. तिलाही काही समजत नव्हतं की कशामुळे होतंय. तिने पाहिले तर तिला पाळी आली होती. आता तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कोण करणार आता हे...?? सासूबाईंना तर काम होतं नाही. "तिने सासूबाईंना सांगितलं..., तर त्यांच्या तोंडाचा पट्टच सुरु झाला, पण त्यात तिचीही काय चुकी होती....! तरीही तिला सासूबाईनी समजून घेतले नाही.
शेवटी तिने गणपतीबाप्पाला हात जोडले. गणपतीबाप्पा मला आज तू तरी समजून घे. मी आज तुझा नैवद्य बनवणार आहे. मला माफ कर. देवाकडून आलेले हे आम्हा स्त्रियांना वरदानच आहे ना...! तर मी अपवित्र कशी....?? तिने हात जोडून स्वयंपाकला सुरुवात केली. सासूबाई तिच्याकडे रागानेच पाहत होत्या. लांबूनच त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता. तू कर...आणि येऊ दे घरावर काहीतरी संकट....! सासूबाईंचं बोलणं ती मनावर न घेता तिचा हात सुरूच होता. काम आवरून तिने बाप्पाला नैवद्य दाखवून ती कोर्टात निघून गेली. संध्याकाळी अमर आला की, सासूबाईंचा आणखीनच कालवा सुरु झाला. " जेव्हा अमरने मीराला विचारले, तेव्हा मिराने अमरला समजावून सांगितले. अमर आईंना काम होतं नाही. संकष्टीमुळे आज काम जास्त होते. मी काय करायचं होतं...?? त्यात माझ्या कोर्टातील केस त्याचं टेन्शन..!!यात मी काय करायचं होतं सांग तू ....?
" तू नको टेन्शन घेऊस. मी आईला चांगला ओळखतो..! मी तिला समजावतो होईल ती शांत. अमर असं बोलून झोपून गेला.
या गोष्टीला दोन महिने होतं आले होतें, पण घरात काही वाईट घडले नव्हते. मीराची कोर्टात सुरु असणारी केस त्यात ती विजयी झाली होती. अमर खुश होऊन पेढे घेऊन आला. तो पर्मनंट झाला होता आणि पगारातही वाढ झाली होती. त्याने घरी आईला आणि बायकोला पेढा भरवला.
घरात उलट आनंदाचं वातावरण झालं होतं. तिने सासूबाईंना समजावून सांगितले. आई हे आपल्या मनाचे खेळ असतात. आपण कोणतीही गोष्ट निर्मळ मनाने आणि कष्टाने केली ना..., तर देव ही आपल्या पाठीशी उभा राहतोच. यामध्ये पवित्र अपवित्र असं काही नसतंच. यामुळेच स्त्रीला स्त्रीत्व आहे. मीरामुळे सासूबाईंचे डोळे उघडले होते. त्यांनाही त्यांच्या वागण्याचा पश्चाताप होतं होता. मीराच त्यांना कौतुकच वाटत होतं. एवढी शिकलेली आणि समजूतदार सून मिळाली म्हणून...!!
लेख कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा लाईक शेअर करायला विसरू नका.
