माझं ते तुझं, तर तुझं ते माझं
माझं ते तुझं, तर तुझं ते माझं


तिने सासू-सासऱ्यांची मनोभावे सेवा केली होती. कडक शिस्तीत सगळे दिवस तिने गोड मानलेले. कधीच कशाची तक्रार केली नाही. पण आज तिच्या आईला दवाखान्यात बघून तिचा जीव तळमळला.
तिच्याकडे बघून "सगळं ठीक होईल..." तो म्हणाला...
"खरचं होईल?" ती म्हणाली...
"विश्वास आहे ना माझ्यावर..?" तो उत्तरला...
"फक्त विश्वासावर आईला कसे सोडू... अशा अवस्थेत तिची काळजी कोण घेणार..? मला जादूची कांडी मिळाली तर आईला घरीच घेऊन आले असते कायमचे..." ती म्हणाली...
दोन दिवसानंतर तिच्या आईला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आणि त्याने गाडी त्याच्या घराच्या दिशेने वळविली...
"अरे रस्ता चुकला तुझा..." म्हणत त्याच्याकडे बघतच राहिली...
"नाही, तू मला ओळखण्यात चुकलीस.. माझं ते तुझं, तर तुझं ते माझं ना... आई आता आपल्याजवळच राहतील..." म्हणत तिच्या मनातल्या कल्लोळाला त्याने कायमस्वरूपी विराम दिला...
अनुभवाच्या प्रकाशात सगळेच स्पष्टपणे दिसत नाही.
विचारांचा चष्मा जसा घालाल तसेच तुमच्या दृष्टीतून दिसेल. शेवटी जशी दृष्टी तशी सृष्टी...!