Vasudha Naik

Inspirational

2  

Vasudha Naik

Inspirational

माझा प्रवास

माझा प्रवास

4 mins
510


माझे नाव वसुधा. मी पुण्यात राहते. मी घराबाहेर कधीच एकटी पडत नाही. फक्त नोकरीसाठी एकटी. तर सांगायची गोष्ट अशी की मी पुण्यात राहून साधं तुळशीबागेतसुद्धा जाताना मला बरोबर कोणीतरी लागते. तर एकटीने प्रवास ही फार लांबची गोष्ट आहे.


हे सांगण्यामागचे कारण म्हणजे गेल्या वर्षी २ मे २०१९ ला रात्री १.३० च्या विमानाने मी एकटीनं प्रवास कसा केला असेल हे मला सांगायचे आहे.


तर त्याचे असे झाले की माझे मोठे दीर विवेक अन् जावूबाई म्हणजे माझी बहीण अनूताई अमेरिकेत गेली २३ वर्ष वास्तव्य करत आहेत. आम्हाला तिकडे फिरायला न्यायचे ठरले. मग पासपोर्ट, व्हिसा या प्रकिया पूर्ण झाल्या. आम्हा दोघांचे त्यांनी २७ एप्रिल २०१९ चे तिकीट बूक केले. ही तारीख माझ्याच सांगण्यावरून ठरवली गेली.


पण आमच्या मुख्याध्यापकांनी मध्येच नन्नाचा पाढा लावला व मला मेमो दिला गेला, "तुम्ही जा. पण तुमच्या जबाबदारीवर पुढे काही झाले तुमच्या नोकरीचे तर, आम्हाला विचारू नका..."


अशा आशयाचे लेटर मला दिले गेले. मी या संस्थेत काम करून पण आता २३ वर्ष पूर्ण झाली होती. प्रामाणिकपणे इतकी वर्ष काम केले त्याचे फळ हे का? याचे वाईट वाटले. २०१७ मध्ये आमची एक मैत्रिण याच कालावधीत फॅारेनला गेली होती. तेव्हा काहीच झाले नव्हते. त्यामुळे असे काही मला वाटलेच नव्हते. मला खूप राग आला पण अजिबात दाखवला नाही. ते लेटर घेतले व माझ्या दीरांना पाठवले. दीरांनी तत्काळ माझी ती फ्लाईट कॅन्सल केली व २ मेची फ्लाईट बूक केली.


माझे मि. माझ्या भावाबरोबर २७ एप्रिलला अमेरिकेला निघून गेले, राहिले मी एकटी. तर आता इथून माझा प्रवास सुरू होतो. २ मेला शाळा केली. शाळेतून तीन वाजता घरी आले. शाळेतील सर्वांनी मला बाय केला. मैत्रिणी पण आनंदात होत्या. मुलाने मला जी वाक्ये एअरपोर्टवर विचारली जातील अशी वाक्ये मराठी इंग्रजीत एका डायरीत लिहून ठेवली होती.


दारात गाडी आली होती. जरा आवरले अन.. देवाला, आईला नमस्कार करून मी माझे सामान, माझी मुलं आम्ही गाडीत बसलो. गाडी थेट मुंबई विमानतळावर पोहोचली. सामान उतरवले. माझी फ्लाईट यायला तीन तास वेळ होता.

मनी विचारांचे काहूर माजले होते. प्रवास एकटीने करायचाय, विमानही कधी पाहिले नाही त्या विमानात आज एकटीनं बसायचंय. थोडी भीती, जास्त आनंद असे एकूण मनात होते. पण माझ्या अनुताई जिजांनी माझी सर्व तयारी करून घेतली होती. व्हिडीओ पाहिले होते.


फ्लाईट आली. बाहेर डिस्प्ले झाले. मुलं जरा केविलवाणी झाली. माझेही नयन ओलावले पण मन खंबीर करून पुढच्या प्रवासास निघाले.


आत गेले. मला व्हिलचेअर सांगितली असल्याने बाकीचे काही शोधावे लागले नाही. बॅग एकच होती ती दिली. केबीन बॅग मी ठेवली व आता मी विचारात रममाण झाले एवढ्यात मुख्याध्यापकांचा फोन आला, "गेला का बाई, मुंबईला असे काही..." पण मला बरे वाटले.


विमानात आता मी पहिले पाऊल ठेवले. काहीच माहीत नसल्याने जरा माझी नजर शोधक होती. सर्व फाॅरेनर, गोरे, घारे, भारतीय मंडळी अगदी चार जण होते. माझ्या सीटवर मी बसले. मला मुद्दाम खिडकीचे सीट मिळावे असेच तिकीट काढले होते. माझ्या शेजारी एक जर्मन मुलगी अन् एक अमेरिकन मुलगा होता.


आता खायचे कसे. टाॅयलेट वापर कसा करावा हेही प्रश्न मनात डोकावत होते. मी व्हेज असल्याने माझे जेवण व्हेज आधीच सांगितल्यामुळे बोलण्याचा प्रश्नच आला नाही.


आता विमान उडणार होते आम्हाला सीट बेल्ट लावायला सांगितले ते ही जमेना. त्या मुलीला समजले तिने लावून दिले. मग तिच्याशी गट्टी झाली पण भाषेचा प्राॅब्लेम.


विमानाने मुंबई सोडली. मी खिडकीतून पाहत होते सर्वत्र लाईटचा झगमगाट होता. काही वेळाने आपल्या समोरच्या स्र्किनवर आपल्याला हवे ते लागते ते कसे लावायचे हेही मुलीने समजावून दिले.


आता काही वेळाने जेवण आले तेही कसे खावे हे प्रथम मी निरीक्षण केले व मग खाल्ले. अशा गममी जमतीत आठ तास निघून गेले. पॅरीसला फ्लाईट पोहोचले. आता उतरायचे इथे. माझा हाॅल्ट सात तासांचा होता.


मला व्हिल चेअरवरून माझ्या पुढच्या फ्लाईटमध्ये सोडले गेले. आता तर त्या ठिकाणी दुकानांशिवाय कोणी नव्हते. कारण नुकतीच फ्लाईट गेली होती. तुरळक माणसं होती. माझ्या अनुताईचा फोन आलाच, पोहोचलीस का म्हणून किती काळजीत होते ते पण.


एक फारसी बोलणारा गृहस्थ आला व मला बोलू लागला पण त्याची भाषा माझ्या डोक्यावरून गेली. पण बाॅडी लँग्वेज समजली मी तोडक्या इंग्रजीत बोलले. त्याने समजून घेतले. आम्ही दोघांनी अशाच भन्नाट गप्पा मारत तासभर बसलो.


त्याची फ्लाईट आली तो गेला. आता मी वायफाय चालू केले व मैत्रिणींशी बोलत बसले. मुलांशी बोलले वेळ असा निघून गेला. आता इमिग्रेशनची वेळ आली माझी फ्लाईट उभी होती. इमिग्रेशना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली व फ्लाईटमध्ये जाऊन बसले. आता दिवस असल्याने जरा बाहेरचे छान बघायला मिळणार होते. फ्लाईटने उड्डाण घेतले व मी खिडकीतून पाहत खूप खूश होत होते. ढगातला प्रवास अनुभवत होते. अवर्णनीय अनुभव...


आता अखेर मी नऊ तासांनी अमेरिकेला पोहोचले. इथेही इमिग्रेशन झाले. प्रश्न समजले नशीब आणि उत्तरही देता आले. मी बाहेर आले. बाहेर जिजा, अनुताई वाटच पाहत होते. अनुताईने मला जवळ घेतले आम्हा दोघींच्या डोळ्यातून आनंदाचे आश्रू ओघळत होते.


जिजांनी ते क्षण कॅमेरात कैद केले आणि आम्ही विमानतळ सोडले. घरी आलो तर दारात माझे मि. वैभव माझा भाऊ प्रकाश, भावजय सीमा व भाचा अनिकेत माझ्या स्वागताला उभे होते. अतीआनंदाचे हे क्षण मी माझ्या हृदयाच्या कुपीत बंद केले आहेत. असा माझा पुणे - अमेरिका प्रवास झाला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational