STORYMIRROR

Bharti Gadgilwar

Abstract

3  

Bharti Gadgilwar

Abstract

लपंडाव

लपंडाव

3 mins
686

संक्रांती पासुन सुरु झालेला कोरोना सोबतचा लपंडाव अखेर परवा म्हणजेच सोमवारी संपला, आणि आपल्या विळख्यात त्याने मला घेतलेच. 

     तसे पाहिले तर प्रत्येक मनुष्य संपूर्ण आयुष्यात संकटांशी लपंडाव करतच आपला जीवनप्रवास करत असतो. मग मी अपवाद कशी असणार? 

      कोरोनाचे संकट गेल्या दोन वर्षांपासून लोकांना भयभीत करत आहे. मास्क, सॅनिटायझर हे शब्द आता आपल्या सर्वांच्या जीवनातील अविभाज्य भाग झाले आहेत. पण या गोष्टींनी माझ्या जीवनात ६ वर्षां आधीच प्रवेश केला आहे. निमित्त होते मुलांचे हृदय प्रत्यारोपण (heart transplant). 

      या प्रक्रियेने आमचे जीवन पुर्णतः बदलले. बाहेरचे खाणे पिणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, कुटुंब आणि नाते संबंधांतील लोकांच्या आजारपणात त्यांची देखरेख करताना मुलांना संसर्गापासून वाचविण्यासाठी त्यांना दूर ठेवणे, स्वतःही निर्जंतुक झाल्याशिवाय त्यांच्या जवळ न जाणे इ. 

      आता या सर्व गोष्टी सवयीच्या झाल्या असल्या तरीही घरातील ज्येष्ठ मंडळी अर्थात मुलांचे आजी आजोबा यांना वयाप्रमाणे (७७,८५वर्षे) थोडा विसर पडत चालला आहे. त्यांचे दैनंदिन जीवन म्हणजे या वयातही नियमितपणे पहाटे ५ वाजता बागेत फिरायला जाणे, योग व्यायाम करणे. यात आजतागायत बदल झाला नाही. आम्ही दोघेही (मी आणि माझे यजमान) बाहेर कोणत्याही कारणाने गेलो असता परतल्यावर घरात कोठेही स्पर्श न करता आंघोळ करुनच घरात वावरतो. घरात कोणी भेटायला आलेल्या व्यक्ती गेल्यानंतर समोरचा हाॅल फिनाईलने स्वच्छ करणे, सोफ्यावरील कव्हर धुवायला काढणे हे सर्व अगदी न चुकता करतो. यात त्रास होतोच परंतु मुलाच्या तब्येतीसाठी करणे अनिवार्य आहे. 

      मुलाचे हृदय प्रत्यारोपण होऊन ४ वर्ष झाली आहे आता त्याला काही होणार नाही म्हणून आजी आजोबा सामान्यांसारखे घरात वावरतात. बाहेरुन आणलेल्या वस्तु सॅनिटाईझ न करता त्याला देणे इ. याप्रमाणे. अशाप्रकारे आमच्या घरात कोरोनाचा शिरकाव अखेर झालाच. आणि तोही मुलाला. आम्ही चौघेही म्हणजे मी, हे, सासु, सासरे सगळे निगेटीव्ह. तसे तर आम्हा पाचही जणांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी आम्हा चौघांना कोरोनाची बाधा झाली नाही. परंतु मुलगा heart reject होऊ नये म्हणून immunosuppressive medicine घेतो. त्यामुळे त्याच्यात रोगप्रतिकारक शक्ती नाही. म्हणूनच त्याला लवकरच कोणतेही संक्रमण प्रभावित करते. गेल्या ४ वर्षात त्याचा सर्व संक्रमणा पासुन बचाव करत आले आहे. परंतु म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण म्हणतात ना तसेच आता या वयात ज्येष्ठांशी वाद न घालता मुलालाच दूर ठेवणे मला योग्य वाटते. 

      सध्या ओमायक्राॅन हा कोरोनाचा वेरीएंट जास्त प्रभावशाली नसल्याने थोडक्यात निभावले म्हणायला हरकत नाही. पण मुद्दा हा नाहीच. आपल्या महाराष्ट्रात हृदय प्रत्यारोपण झालेल्या व्यक्तींना तपासण्यासाठी अनुभवी डॉक्टर ची चमू उपलब्ध नाही. त्यामुळे हा एक घोर काळजीचा विषय होता आमच्या साठी. त्यात मुलगा मोठा असल्याने तो अतिशय घाबरला होता. तो डीप्रेशनमध्ये जाऊ नये म्हणून त्याला सतत बोलतं ठेवणं, प्रेरणादायी गोष्टींवर चर्चा करणे, त्याच्या जवळ राहून त्याच्या पॅरामीटरची (oxigen level, pulse, bp, temperature) नोंद ठेवणे ही कामे करताना मला त्याच्या जवळ राहणे आवश्यक होते. 

आणि तो ठिक झाला. औषधांचा कोर्स संपण्याआधीच त्याचे सर्व पॅरामीटर्स नाॅर्मल झाले होते. डाॅक्टरनी तो ठिक झाला हे सांगताच आमचाही तणाव कमी झाला. पण त्याच्यासोबत राहिल्याने इतके दिवस चाललेला कोरोना आणि माझ्यातील लपंडाव मात्र संपला आणि मी देखील कोवीड प्रभावित झाले.

      आजचा दुसरा दिवस आहे. एकूण ५ दिवसांचा कोर्स आहे. लवकरच मी देखील बरी होईल.

 मागिल वर्षी झालेल्या कोरोनामुळे माझा अस्थमा (copd : cronic obstructive pulmonary decise ) मध्ये परावर्तित झाला आहे. ओमायक्राॅन हा फारसा प्रभावशाली नसल्याने अस्थमा आहे त्यापेक्षा गंभीर होणार नाही हे नक्की.

      हा लेख लिहिण्याचा खटाटोप यासाठी करत आहे की, ज्यांच्या घरी लहान मुले आणि वृद्ध मंडळी आहेत त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी बाहेरून आल्यावर स्वतःला निर्जंतुक केल्याशिवाय त्यांच्या जवळ जाऊ नये. अजुनपर्यंत मुलांच्या लसीकरणास सुरुवात झाली नाही. तसेच वृद्धांचीही रोगप्रतिकारक क्षमता कमी असते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract