STORYMIRROR

Bharti Gadgilwar

Children Stories Others

3  

Bharti Gadgilwar

Children Stories Others

बालपण....रम्य त्या आठवणी

बालपण....रम्य त्या आठवणी

1 min
139

   आज असा कोणीही नाही जो बालपणीच्या आठवणीत रमत नसेल. ते दिवस.....तो काळ पुन्हा जगावसं वाटतं.....

    रोजच्या धावपळीच्या जीवनात जरासा विसावा घेतला की नजरेसमोर दिसणारं मुलांच बालपण पाहून आपल्याला सुद्धा परत एकदा बालपणीच्या काळात जावंस वाटतं....

शाळेतील पहिला दिवस..... नवीन बॅग, नवीन शुज, पेन बाॅक्स, टाय, बेल्ट, युनफाॅर्म, नवीन पुस्तके.....नवीन पुस्तकांच्या पानातील सुगंध.....वाह!!!

    पहीला पाऊस.....पाण्यात भिजण्याचा आनंद....त्यानंतर पाण्यात भिजल्याने झालेल्या सर्दीसाठी आईचा ओरडा.....

    गणपती, दुर्गा देवीच्या काळातील कार्यक्रमात लावलेली हजेरी....परीक्षा जवळ असताना ही हट्ट करुन बाबांसोबत देवीच्या दर्शनासाठी गर्दीत वेळ घालवणं..... देवीच्या उत्सवात लागणाऱ्या आनंद मेळाव्यात जाणं.... आकाश झुल्यात बसणं..... विविध खाद्यपदार्थ खाण्यावर ताव मारणं........ परीक्षा संपल्यावर दिवाळीच्या सुट्टीची वाट बघणं...... रांगोळ्या काढणं....माझीच रांगोळी जास्त सुंदर आहे म्हणून इतरांशी वाद घालणं......फराळ बनवताना लुडबुड करणं..... सोबतच त्यासाठी ओरडा खाणं....

    उन्हाळ्याच्या सुट्टीत पत्ते, लुडो, लगोरी, दोरीवरच्या उड्या, आईस्क्रीम, कुल्फी......वाह...मज्जाच मज्जा.....

सकाळी मित्रांसोबत राॅकी आणि जॅकी (डाॅगीज) ला सोबत घेऊन फिरायला जाणे..... संध्याकाळी बॅडमिंटन खेळणं....

सगळं कसं मस्तच.....कशाची काळजी नाही कि चिंता नाही....निव्वळ आनंद आणि मनसोक्त आनंद लुटणं.....

सगळं कसं एका चित्रपटासारखं ओळीत डोळ्यासमोर येतं ना......!

    प्रत्यक्ष परमेश्वरालाही राहवलं नाही तेव्हाच पृथ्वीवर अवतार घेऊन राम आणि कृष्ण रुपात बालपणाचा आनंद स्वतः घ्यायला आणि सर्वांना द्यायला आले.... म्हणूनच म्हणतात लहान मुलं म्हणजे अगदी बाळकृष्णच.....!!

बालपण अनुभवायला पुन्हा एकदा जन्म नक्कीच मिळावा!!

     " बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ", असं म्हणतात ते उगाच नाही!!


Rate this content
Log in