RADHIKA DESHPANDE

Abstract Tragedy

4.0  

RADHIKA DESHPANDE

Abstract Tragedy

लॉकडाउन आणि बरेच काही...

लॉकडाउन आणि बरेच काही...

3 mins
134


हल्ली फारसा चर्चेत असलेला आणि आता साऱ्यांना नकोसा झालेला मी अर्थातच 'लॉकडाऊन.'आज फारच संताप झालाय मलाच माझा, म्हणून जरा दमलो आणि मनाला ओझे नको म्हणून आता माझे मनोगत तुम्हाला सांगतोय. वर्षभरापूर्वी पासून मी सर्वत्र चर्चेचा आणि बऱ्याच गोष्टींमुळे आठवणीतलादेखील... मागिल वर्षी जेव्हा मला पहिल्यांदा हाक मारली तेव्हा आपण किती महान कार्यासाठी जन्म घेतल्याचे मला जाणवले. आपल्या जानी दुश्मन कोरोनाशी लढायला मला शस्त्र म्हणून वापरल्याने माझी मान इतकी उंचावली की .............ऽऽऽ. नको, आता नकोस झालंय हो ते सगळं. मला माझाच अभिमान वाटायला लागला होता.सर्वत्र आपल्याला सन्मान मिळतोय तसं सेलिब्रिटी सारखं वाटायला लागलं होतं मला.


माझ्यामुळे लहानग्यांच्या, विद्यार्थ्यांच्या तसेच रोजच्या दगदगीने वैतागलेल्या नौकरदारांच्या व घरच्या कामात वेळ न देऊ शकणाऱ्या नौकरदार स्त्रियांच्याही चेहऱ्यावर हसू आलं होतं. सुरवातीचे १५-२० दिवस सगळ्यांचेच मजेत गेलेत.एकदम पंचपक्वांन्नही बनले माझा स्वागतासाठी.पण खरी गंमत सुरू झाली ती १५-२० दिवस पालटल्यावर. सरकारनं सुरुवातीला माझ्याबाबतचा निर्णय पुन्हा काही अवधीसाठी लांबवला आणि हळूहळू माझ्या स्वागतासाठी सज्ज असलेले लोक आता मलाच दोष देऊ लागले.वर्क फ्राॅम होम ‌च्या नावांवर जास्त लोड येऊ लागले, तिकडे ऑनलाईन क्लासेस ने शिक्षक-विद्धार्थी वैतागले आणि बरेच नाही नको ते सारे झाले.


तिकडे कोरोनाचे अक्राळविक्राळ रूप आणि त्यात माझीच चाललेली घिसपीट... काॅलनी, सोसायटी,शाळा, महाविद्यालये, कार्यालये, लग्नसोहळे, पर्यटन सारे.. सारेच थांबले.लोकांची उपासमार होऊ लागली.रोजच्या रोजीवर चालणारे घर-संसार रस्त्यावर आले.कामगारांची गावाच्या दिशेने पायपीट सुरू झाली.फार दयनीय स्थिती होती ती...मी फार जवळून बघत होतो अन् अनुभवतही होतो. दुकाने, बाजार,माॅल्स सगळ्यांना ग्रहण लागलं.त्यालाचं जोड ती म्हणजे समोर दुकानांना कुलूप ठोकून मागच्या दाराने विक्री करणाऱ्यांची...


आता दोष द्यायचा तरी कुणाला.... सारे तर मलाच तलवारीच्या धारेवर घेऊनच होते... सगळ्याचं खापर माझ्या डोक्यावर फोडलं गेलं ते वेगळंच..

काढले तेही दिवस काढले मी..अगदी खंबीरतेने लढून, मोठ्या मनाने... अर्ध्या वर्षांपेक्षा जास्त दिवस लोकांनी काढले माझ्याबरोबर... पण मग त्यांची सहनशक्ती कमी पडू लागली.माझ्यामुळे त्या द्रुष्ट कोरोनाशी झुंज देण्यात मोठे सहकार्य झाले होते, सारे पुन्हा नीट व्हायला आलेच होते. माझी गरज लोकांना नको वाटू लागली.मला हळूहळू सगळीकडून काढण्यात आले, छे छे मला नव्हे लोकांना माझ्या बंधनातून... पण परिणाम काही वेगळेच झाले.


थंड होत आलेल्या कोरोनाच्या लाटीने पुन्हा तोंड वर काढले.त्यावेळेस पुन्हा लोकांनीच त्याला आमंत्रण दिले.कोणात काहीच धास्ती शिल्लक नव्हती. सर्व बंधने तोडत लोक मोठ्या दिमाखात मिरवू लागले, तेव्हाच मला संकटाची चाहूल लागली होती.पण मी नकोसा झालेला, त्यामुळे मला वाचाच फुटली नाही आणि व्हायचे तेच झाले. संधी साधून त्या कोरोनाने आपले रुप पालटून मोठा घात केला.आता त्याचा परिणाम आपण सारेच अनुभवत आहोत.परिणामी नकोसा झालेला मी पुन्हा शस्त्र बनून कार्यरत आहे.


पण खरं सांगायचं झालं तर मलाच आता या साऱ्यांतून स्वतःला आणि साऱ्यांना मुक्त करायचे आहे.पण स्थिती जीवघेणी आहे. माझ्यासोबत लोक समजुत घालायला तयार नाहीत हेही कळतंय मला. बाबांनो मला नाही हो असली काही हौस.. लोकांचे चाललेले जीव,कोरोनाचा वाढता विस्फोट आणि त्यात काहींची माझ्यावरुन चाललेली भाषणबाजी. मला साऱ्यांचा वैताग आलाय... तरी पण स्वतःच्या विचारांना दूर सारून मी लढतोय फक्त तुमचासाठी..‌.तुमच्या सुरक्षिततेसाठी..


||लढलो मी , लढतोय मी आणि लढणारचं..

मानवाला पुन्हा सुखी, निरोगी जीवन मिळवून देणारचं..||


त्यात तुमची साथ मला मिळेल ना....

मिळालीच तर आपण असाध्य ही साध्य करुन या महाभयंकर महामारीला आळा घालू शकतो.

तर देणार ना साथ..........

अऽऽ अऽऽ अऽऽऽ....अरे ..अरे ऐक ,लयं झालं दमून चल तुला आता त्या शहरात जायचयं....चल बाबा लवकर चल...ऽऽऽ...

लाॅकडाऊन


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract