RADHIKA DESHPANDE

Abstract

4.5  

RADHIKA DESHPANDE

Abstract

"हे अनलाँक म्हणायचे की"🤔....

"हे अनलाँक म्हणायचे की"🤔....

2 mins
275


अहो काका कुठे चालले...

नाही अगं,म्हटलं चला फेरफटका मारून यावं.आपलं कित्येक दिवस घरी बसून त्रासलो आता..

अहो निदान तोंडाला 'मास्क'तरी बांधा.

छे!छे! माझा जीव चालला त्यानं..

अहो पण बाहेर सगळं सुरु झालं असलं टाळेबंदी नंतर तरी अजून धोका काही टळलेला नाही. रोज शासनाच्या सुचना येत आहेत वारंवार.. अजूनही काही कोविड गेला नाही हो.....

कोण बोललं.....???नाही इथे हा कोरोना वगैरे ..नुसता बोलबाला आहे तो..आमच्या काळात किती आजार आलेत नी गेले,कुठं काय झालं? मस्त ठणठणीत आहेत की सर्व...

अहो पूर्वीही असे मोठे आजार ,महामारी आली पण त्याने एकाच वेळी साऱ्या जगाला नाही हादरवलं..ह्याची तीव्रता जास्त आहे. इथे मुद्दा थोडा वेगळा आहे.

हे..!मी नाही मानत या कोरोनाला वगैरे..मी चाललो आता बाजारात.. जरा चारचौघांत बसलं,बोललं,फेरफटका मारला की कसं हायसं वाटतं..नाही तर ते सारखं चाललयं तुम्हा नवीन पिढीच...

अहो हे सगळं ठीक आहे पण काही गोष्टीही पाळायला हव्यात ना! सरकार आता सांगतयं की 'माझं कुटुंब माझी माझी जवाबदारी 'या धोरणानं आपली काळजी घ्या..

आता तुम्ही आपले समजून सांगतेय हो तुम्हाला..

अगं पोरी कळतयं मला पण हे काही मला नाही जमायचे... चल येतो मी...

पण... अ्...अ्..अहो....


आज संपूर्ण जग या महामारीने ग्रस्त असताना दुसरीकडे काही लोकांच्या मानसिकतेत बदल झालेला नाही. टाळेबंदी संपली असली तरी आजही काही सुचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. पण आम्ही मानायला तयार आहोत का???की सर्व संपले असे समजून विनाकारण गर्दीत जमायचे,मला नाही जमणार मास्क घालायला वगैरे असे म्हणून असेच फिरायचे...आणि किती गोष्टी आहेत ...पण हे सांगणार कोणाला??..

इथे प्रत्येक जण आपलीच मनमानी करतोय...

आपण नियमांचे पालन करत आपले कामही नीट पार पाडले,आणि आपल्या कामाच्या ठिकाणीही आवश्यक ती काळजी घेतली तर नक्कीच आपण ह्या महामारीवर आळा घालू शकतो.

हल्ली 'लाँकडाऊन' नंतर सर्वांची चाललेली मनमानी किंवा कळूनही वळत नाही असे काही पाहायला मिळते.

ह्याला काय म्हणायचे....???

एकदा हाच प्रश्न स्वतः ला विचारा आणि......

हे अनलाँक म्हणायचे की...............


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract