akshata alias shubhada Tirodkar

Comedy Fantasy

3  

akshata alias shubhada Tirodkar

Comedy Fantasy

लग्न ते हि आगळ वेगळं

लग्न ते हि आगळ वेगळं

2 mins
361


आपटे कॉलोनीतील दोन कुटूंब सुर्वे आणि भावे कुटुंब म्हणजे प्रेमळ कुटुंब असे हे कटुंब नेहमी हसत खेळत आपले जीवन जगत होते सुर्वेचा जगू नेहमी भावेंच्या घराजवळ घुटमळ्याचा त्याच्या मिनीला पाहून लाजायचा ती हि लाजायची कोणी पहिले कि दोघे हि धूम ठोकायचे असेच दिवस चालले होते त्याच्या प्रेमाची चाहूल दोन्ही कटुंबाना लागली मग काय दोन्ही कुटुंब एक दिवस एकत्र आली तसे दोन्ही कुटुंब श्वान प्रेमी ते जगू आणि मिनीला आपल्या घरातले सदस्य समजत विचार हि त्याचे मिळते जुळते असल्याने त्यांनी त्याचे लग्न करून देण्याचे ठरवले 


येणाऱ्या रविवारी संध्यकाळचा ४ वाजता मूहूर्त ठरला घर सजावटीने भरून गेले सकाळी दोन्ही बाजूनी हळदी चा कार्यक्रम पार पडला जगू हळदी ने नाहून गेला होता तर मिनी चा चेहरा हळदीने उठून दिसत होता भावेंच्या घरी लग्न पार पडणार होते दुपारचे जेवण करून ३.३० वाजता नवर मंडळी भावेंच्या घरी निघाली मिनी ला घरातल्यानी मस्त सजवलं होत "डोली साजाके "गाणं भावेंच्या घरी घुमत होत सगळे तयारीत गुंतले होते इथे जगू हि मस्त दिसत होता 


जगू आणि सर्व मंडळी दारावर पोहोचताच भावेंनी त्याचे स्वागत केले आणि जगू ला सोफ्यावर बसवले पण जगूची नजर आपल्या मिनीला शोधत होती थोड्या वेळात गाण्याच्या टेकावर मिनी आली सगळ्यांनी टाळ्या वाजव्याला मिनी हि जगू ला पाहून मनातल्या मनात लाजली दोघेही सोफ्यावर बसले लग्नासाठी दोन्ही घरातलेच लोक उपस्तिथ होते वयस्कर आजोबानी मंगलाष्ट्के सुरु केली अंतरपाट हि धरण्यात आला सनई च्या धुनेचे गाणे लावण्यात आल होत मंगलाष्टके संपताच अक्षतांचा वर्षाव वर वधू वर बरसला सुर्वे कडून मिनी साठी सोन्याचा बेल्ट मंगळसूत्र रूपी जगू च्या हाती घालण्यात आला आणि सगळ्यांनी एकच जलोष केला 


हलक्या नजरेने मिनी ने जगू ला पहिले जगू ही खूप खुश होता आता त्याला लपून छपून त्याच्या मिनीला भेटायला लागणार नव्हते सगळ्यांकडून आशीर्वाद आणि भेट वस्तू देण्यात आले फोटो सेशन हि जोरात झाले ते हि वेगवेगळ्या पोज मध्ये सगळे जेवणासाठी वळले विविध पदार्थ भावे कुटूंबीयांकडून करण्यात आले होते वर व वधूसाठी खास पेडिग्री चा फ्लेवर आणला होता सगळ्यांनी मस्त पैकी ताव मारला 


परतीच्या वेळी भावे कुटुंब भावुक झाले उठता बसता दिसणारी मिनी त्याच्यापासून दूर जाणार होती तसेच हि पांच मिनिटाची वाट होती पण तो लळाच असा होता कि सुर्वे कुटुंबीयांनी धीर देत मिनी ला नेहमी खुश ठेवण्याचे वचन दिले आणि बाहेर पडले रीतसर गृहप्रवेश करून मिनीला आत घेण्यात आले मिनीची पाठवणी करून भावे कुटुंब परतले आणि मिनी जगू लग्नाच्या गाठीत जन्मभरासाठी अडकले 


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy