लेडीज ड्रायवर
लेडीज ड्रायवर


चर्च च्या पायरीच्या बाजुलाच छान जागा मिळाली आणि दिपाली ने पटकन तिची चार चाकी ,वाहनतळ समजुन लावून टाकली. चला चांगलीच सोईची जागा मिळाली. अरेरे,गाडी चा दरवाजा लागेल ना?पायरीला?एवढी खुशित गाडी लावली तु दिपाली? की स्वतःला बाहेर निट निघता येईल की नाही? विचारच केला नाहीस? दिपालीच मनातल्या मनात स्वतःशिच बोलणं चालू होतं. ती परत रीव्हर्स गियर टाकणार तेवढयात तिची नजर चर्चच्या दरवाज्यात उभ्या असलेल्या दोन पंचविशीच्या एकमेकांना इशारे करत हसणाऱ्या मुलांकडे गेलं. बहुतेक तिची टिंगल करत होते दोघेही, असंच वाटलं तिला. बघ बघ !ड्रायवर ती पण लेडी,गाडी लावायचा अंदाज चुकला बघ.!खि...खि...खि....खि..! दिपाली ला ह्या संभाषणाची जाणीव झाली आणि ती बसल्या जागी गोठून कुठल्याशा विचारांत बुडून गेली.तिचं मन झर्रकन तिला मागे भूतकाळात खेचुन घेउन गेलं. नुकतीच गाडी चालवायला शिकलेली,नविनच होतं तिला, तिची पहीली एकटीनेच चारचाकी चालवण्याची वेळ, सिग्नल ला लाल दिव्याला नंतर हिरवा होण्याची वाट पाहू लागली.आणि सिग्नल ने हिरव्या रंगाचा दिवा पेटवला. गाडी न्यूट्रल वरून पहिल्या गियर वर उचलण्याच्या नादात ,क्लच, ब्रेक लोचा झाला,काहीतरी चुकलं, काहीतरी गडबडलं, आणि दिपाली बाईंची गाडी हलकी उसळुन बंद पडली, त्यात मागच्या अनेक वाहनांच्या कर्कश्श हॉर्न च्या आवाजाने ती पुरती गोंधळून गेलेली. बिथरून,भांबावलेली ती,सगळया पुरूषांच्या "लेडीज ड्रायवर" च्या नजरांना झेलून ,काहीतरी मोठं पाप घडलं आपल्या हातून, अश्या अवस्थेत बसली,मग तिने एक दीर्घ श्वास घेत निट शिकलेलं ,सगळं आठवत गाडी कशीबशी चालू केली एकदाची, हुश्श सुटले त्या नजरांतून एकदाची..... बापरे काय अनुभव होता? पण मी हार मानून गप्प बसणारी नाही, असं काहीही पुरूषांच्या हातूनही घडत असेलच की! ठीक आहे, त्यात काय एवढं, नुकतीच तर शिकली आहेस, बाऊ करू नकोस, सामान्य आणि साधी गोष्ट आहे.......लगेच दिपालीच मन तिला तिच्या दुसऱ्या अनुभवा पाशी घेऊन गेलं. हायवेवर होती दिपाली ,ही भलीमोठ्ठी ट्रॅफिक, सगळयांच गाड्या अगदी जवळून जवळून, मुंगी च्या पावलांनी चालल्या होत्या, मध्ये मध्ये थांबत होत्या. दिपालीची गाडी न्यूट्रल वरून पहिल्या गियर वर जाण्याच्या अति उत्साहात मागे असणाऱ्या रिक्षेला चिकटली,पण त्याच वेळी ट्रॅफिक सुटली होती, ती ही न थांबता निघाली पण ५ मिनिटांतच तिच्या पुढ्यात पोलिस आणि तो रिक्षावाला दोघेही उभे तिची गाडी अडवायला. समोर उभे ठाकलेले ते दोघे पाहून दिपाली वरून तर वाघीण दिसत होती, पण पाय 90 च्या गतीने थरथरत, लटपटत होते.बापरे पोलिस, आता काही खरं नाही तुझं दिपाली?दिपाली चा उभ्या आयुष्यातला पोलिसकीशी संबंधित पहिला वहिला प्रसंग. मॅडम बाहेर या! पोलिस बोलले....दिपाली तु डर मत मै देखती हूं,ये मेरा रोज का है,तु गाडी चला लेगी के मे चलावु? आर यु ओके? तिच्या ड्रायव्हिंग टिचर स्नेहा ने तिला दिलासा देेेत विचारायचा अवकाश, दिपालीनेे आलेली संधि न दवडता ,ड्रायव्हिंग सिटवरून काढता पाय घेतला आणि बाजूच्या सीटवर जाऊन बसली.स्नेहा तिची ड्रायव्हिंग टिचरच नाही तिची चांगली मैत्रीणही झाली आणि सद्य परिस्थितीतही आहेच.स्नेहा होती म्हणुनच तीच्या वाटेला ती वादावादी आली नव्हती, पण स्नेहा मुळेच ती अशा प्रसंगाना कसं तोंड दयायचं ते शिकली.खरंतर दिपाली तिच्या कडून खूप काही शिकली होती, एका प्रकारे आत्मविश्वासच भरभरून दिला होता दिपालीत ,आणि तो दिपालीच्या कामीही येत होता आणि येेेतोय .अश्या एक एक करत अनेक प्रकारच्या प्रसंगाना तोंड देेेेऊन दिपाली आज एक उत्तम वाहन चालक झाली होती. एवढी की तिची टिचर म्हणायची ," अरे दिपाली तेरी तो अब ट्रक भी निकल जायेेगी आरामसे." आणि खरंच दिपालीनेे आठ वर्षे झाली सगळयांच प्रकारच्या गाडया चालवायला, accent viva,indigo, Verna,xuv 500,I 10,elantra इत्यादी . तिसरा अनुभव ती रोडवर वळताना एक दुुुुचाकी स्वार अचानक हॉर्न न वाजवताज तिच्या आणि रस्त्यावरच्या दुसऱ्या चारचाकी च्या मध्ये सापडला होता, ते तर बरं झालं की तिने वळण्याआधीच हॉर्न दिला होता, तिची चूूूक नव्हतीच पण जरा इंंचभर पुुुुढे गेेली असती तर.....तो दुुुुचाकीस्वार चेेेपुन गेेला असता ,पण तिच प्रसंंगावधान कामी आलं. पण तिच्या पति ने तिला सांगूूूनच ठेेेेवलेलं,असा काही प्रकार तुुझ्या हातून झाला ,तर तु मला फोन कर लगेच, मी बाकीचे सांभाळेेन काय ते,म्हणजे त्याचं म्हणनं, की तो कोणत्याही परिस्थितीत तिच्या सोबतच आहे, तिने अपघात करावा असा अर्थ नव्हता. पण त्यानेच तिला गाडी शिकायला प्रोत्साहन दिलं होतं. अनुभव तसे भरपूर आलेच तिला पण काही कुुुुजकट नजरा, कुुुचेषटा करून हसणाऱ्या नजरा होत्या तिथे त्या उलट हया लेेेेडीज ड्रायव्हर ला समजुन घेेेत मदत करणाऱ्या ,चांगल्या नजराही होत्या,इशारे करून सांगणारी गुुुुणी माणसं,या जागा आहे, निघेल गाडी आरामात, थोडं अजून डावीकडे, थोडी मागे येेऊ दया अजून गाडी, मॅॅॅडम बास,बास !हया सगळयांचाही या लेेेेडीज ड्रायव्हर ला घडवण्यात खारीचा वाटा आहेेेच. पण सगळ्यांत जास्त तिच्या पतिचा हातभार जास्त होता,की तू शिक ,आणि शिकण्यासाठी सगळंच तिला पुुुुरवणं ,स्तुति करावी तेेवढी कमीच, त्यात लेेेेडीज च्या मेेंदूत हजारो विचारांची गुुंतागूंत ,त्यावर मात करून ,गाडी सराईत पणे चालवण्याची कला आत्मसात करून,सगळयां हसणाऱ्या "लेेेेडीज ड्रायव्हर" नजरांवर मात करूनच ही लेेेडी इथवर पोहोचली होती. हया विचारांमधुुन भानावर येेेत दिपाली ने,पहिल्याच प्रयत्नात रीव्हर्स गियर टाकला आणि तिची नवी कोरी Mercedes परत व्यवस्थितपणे त्या दोघांच्या नाकावर टिचून लावून टाकली .आत्मविश्र्वासाने गाडीतूून उतरून ,आपल्या दोन मुुलांना सोबत घेऊन फुुुुटबॉल टर्फ च्या दिशेने निघाली सुुध्दा. तीच मघाचची खी...खी करून कुुुुजकट हसणाारी दोन मुुले दिपाली च्या पाठमोऱ्या आकॄॄॄॄतीकडे आश्चर्य्याने बघतच राहिले ,आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ Mercedes!