Abhijeet Tekade

Tragedy

5.0  

Abhijeet Tekade

Tragedy

कुरूप - भाग २

कुरूप - भाग २

8 mins
745


धडा २. खेळ नशिबाचा


बाळांच्या जन्मच्या आधल्या रात्री झोपेमध्येच रश्मी ला कळा सुरु झाल्या होत्या. वेदनेनी ती कन्हायला लागली होती. राजेश रश्मीचा आवाजाने उठला 

“काय होतय तुला!”

रश्मी वेदनांनी भरलेल्या आवाजात म्हणाली “मला पोटात फार दुखतंय लवकर घेऊन चल हॉस्पिटलला” राजेशला कळायला वेळ लागला कारण हा नुकताच आठवा महिना सुरु झाला होता डिलिव्हरी ला साधारण दीड दोन महिने शिल्लक होते. पण तिचा त्रास बघून त्याने हॉस्पिटला फोन केला आणि डॉक्टरांच्या सल्यानुसार त्याच वेळी राजेश ने रश्मीला हॉस्पिटल ला हलवले . 

डिलिव्हरी करिता रश्मीची आई पुण्याला आलीच होती. त्यामुळे राजेशला त्यांचा आधार होता. हॉस्पिटला आत शिरताच डॉक्टरांनी केबिन मध्ये त्यांना बोलावून रश्मीची तपासणी केली. राजेश आणि रश्मीची आई फार चिंतेत खुर्चीत कॅबिनमध्येच बसले होते. डॉक्टरांनी चेकअप केबिन मधून बाहेर येत नर्सला काही सूचना दिल्या आणि रश्मीला तिथेच चेकअप टेबल वरती झोपवून ठेवले. डॉक्टर शांतपणे खुर्चीत बसले त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. त्या हळूच राजेशला बोलल्या 

“आपल्याला आताच डिलिव्हरी करावी लागणार”

राजेश लगेच “हो ठीक आहे लवकर करा काही तरी तिला फार त्रास होतोय” 

डॉक्टर पुढे बोलत “पण .. “

चिंतीत राजेश लगेच विचारीत “पण काय “

“कंडिशन क्रिटिकल आहे आई किंवा बाळाच्या जीवाला धोका आहे. “

हे ऐकताच रश्मीची आई तिथेच रडायला लागली. राजेशने तिला कसेबसे सावरले.

राजेश डॉक्टरांना विनवण्या करू लागला “काही करा डॉक्टर पण वाचवा आई आणि बाळांना”

डॉक्टर समजून संगीत “जुडे बाळ आणि सध्या फक्त सात महिने पूर्ण झालीत आई ला पण हे दुहेरी बाळंतपण भारी आहे. मी प्रयत्न करते”

रश्मीच्या त्रासामुळे राजेशनी आणखी जास्त विचारात वेळ न घालावीता डॉक्टरांनी दिलेले फॉर्म भरायला सुरु केले त्या फॉर्ममधील एका विभागात आई किंवा मूल यामधील पर्याय निवडायचा होता तिथे राजेशचा हात भीतीने थबकला होता त्याला दोघेही हवेच होते पण यावेळी त्याला हे निवडणे नाईलाज होते त्याने अधिक विचार न करीत रश्मीच्या आयुष्याला स्थान दिले.

डॉक्टरांनी लगेच नर्सला ऑपरेशनची तयारी करायला लावली. राजेश आणि रश्मीची आई बाहेर ओप्राशन थेटर जवळील खुर्चीत येऊन बसले. राजेशचा काळजीने घसा कोरडा पडला होता पण तो तिथेच ऑपेरेशन थिएटर समोर होता. कधी लगेच अस्वस्थ होऊन ऑपेरेशन थिएटर समोर घिरट्या घालीत होता, तर कधी खुर्चीत जाऊन बसे.

 रश्मीच्या आई सारखी आपले रडू आवरत होती त्यांची गुरु दत्तावरती भारी श्रद्धा त्या तिथेच मनातल्या मनात जप करायला लागल्या. 

नर्सेस काही कामांनी ऑपेरेशन थिएटर मधून लगबगीत आत बाहेर करीत होत्या. त्या बाहेर जात येत असताना राजेश त्यांच्याकडे काही विचारण्याचा प्रत्यत्न करीत असे. पण त्याच्या कडे दुर्लक्ष करीत नर्सेस निघून जात. नर्सेसची घाईगडबड बघून राजेश आणखी अस्वस्थ होई. डॉक्टरांनी काही आणखी काही विषेयज्ञ बोलावले होते.आणि हि टीम हे ऑपेरेशन यशस्वी करण्याचा पूर्ण प्रयत्नात होते.

अचानक ऑपेरेशन थिएटर मधून बाळांच्या रडण्याचा आवाज आला घिरट्या घालीत असलेल्या राजेशची पावले थांबली, आई खुर्चीतून उठून उभ्या झाल्या दोघांच्या नजरा ऑपेरेशन थेटरच्या दारावरती होत्या. राजेशचा जसा काही काळ श्वास थांबला बाळांचा आवाज त्यांना आनंदाऐवजी काळजी देणारा होता. रश्मीला तर काही झाले नसेलना असे विचार राजेश च्या मनात आला. रश्मीच्या आई च्या देवाच्या धावा वाढल्या. ऑपेरेशन थिएटर चा दिवा विजून पाच मिनिटे निघून गेली.एवढा वेळ का लागत आहे असे राजेश ला वाटायला लागले. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले राजेश थोडा पुढे झाला. डॉकॉटरनी हसत” congratulation! तुम्हाला मुली झाल्यात. आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहे” हे एकताच राजेशचा आनंद मनात मावेना. रश्मीच्या आईने वर बघीत देवाला हात जोडले. डॉक्टरानी थोड्या वेळात दोघी छोट्या चिमुकल्या मुलींना आणून राजेश आणि रश्मीच्या आई च्या हातात दिल्या. त्यांना बघून राजेशच्या आनंदाश्रू वाहायला लागले. मुलींना आणि रश्मीला नंतर रूममध्ये हलवण्यात आले. सगळीकडे आनंदी असे वातावरण होते. राजेश थोड्या वेळात डॉक्टरांना भेटला तेव्हा डॉक्टरांनी त्याला सांगितले कि “एका बाळाचे वजन काही जास्तच कमी आहे त्यामुळे तिची थोडी काळजी घ्यावी लागेल. घाबरण्याची गरज नाही सध्यातरी ते चांगले रीस्पॉन्ड करते आहे. पण ऑबसेर्व्हशन मध्ये ठेवावे लागेल” राजेश ला हे एकूण थोडी काळजी वाटली पण डॉक्टरांनी दिल्येल्या दिलासेमुळे थोडा तो आश्वस्थ झाला.

गर्भामध्ये असताना जे पोषण दोन्ही बाळाला मिळायचे होते ते सौंदर्याचा बाबतीत बरोबर मिळाले पण लावण्याचा ते नाही मिळाले. लावण्याचा जन्म सौंदर्याच्या काही मिनिट नंतर झाला. डॉक्टरांना तर लावण्या जिवंत राहील त्याचीपण खात्री नव्हती परंतु त्या परमेश्वराच्या मनात काही असेल त्यालाच ठाऊक. 

 पसरलेल्या तळहातात मावेल इतकी ती होती. 

दुपार पर्यंत बाळांना ,रश्मीला बघायला राजेशची आई बाबा आणि इतर नातेवाईक येऊन पोहोचले होते. 

बाळांना बघून नातेवाईक भरभरून स्तुती करायला लागले. आपल्या मुलांचे कौतुक जगातल्या कोणत्याही आई वडिलांना आवडेलच. तसेच राजेश रश्मी पण आनंदाने गदगद होत होते.

 दोघी मुली दिसायला अगदी हुबेहूब फक्त वजनामध्ये काही तो फरक होता. दोघीपण गोरीपान, स्ट्राबेरी सारखे ओठ, सुंदर शिंपल्यासारखे डोळे. दोघी अगदी सुंदर बाहुल्या दिसत होत्या. 

नातेवाईकांमध्ये रश्मीची बहीण पण आली होती. तिने तर उत्साहाने दोघी सुंदर बाहुल्याचे नामकरण करून टाकले एकीचे सौंदऱ्या आणि दुसरी लावण्या. आणि तिथे उपस्तिथ नातेवाईकांनी पण याला दुजोरा दिला.

असाच संपूर्ण दिवस आनंदात गेला. संध्याकाळी जेव्हा नातेवाईकांची येजा कमी झाली आणि जेव्हा रश्मीची आई आणि रश्मी निवांत झाल्या तेव्हा रश्मीच्या लक्षात आले कि लावण्या बराच वेळ झाला दूध ओढीत नाही. प्रयत्न करून सुद्धा लावण्याला कदाचित ते शक्य होत नव्हते. ती अधून मधून रडायला लागायची पण अंगात त्राण नसल्यामुळे तिचा रडण्यात पण आवाज चढत नव्हता. काही काळाने संपूर्ण ताकतीनिशी ती आकांत करून रडायला लागली तेवढ्यात राजेश बाहेरून परतला, लावण्याचा आकांत बघून तिघेही फार अस्वस्थ झाले राजेश चटकन रूमबाहेर नर्सला बोलवायला निघाला तेवढ्यात एकदम तिचे रडणे थांबले. 

नर्सबरोबर राजेश परतला नर्सनी लगेच बाळाला चेक केले राजेशला धीर देत “ काळजी नका करू डॉक्टर आलेच आहेत राऊंडवर मी त्यांना आधी इकडॆच घेऊन येते.” राजेश पण नर्सबरोबर निघून गेला. 

डॉक्टर येपर्यंत रश्मी आणि तिची आई पुन्हा लावण्याला थोडं उचलून रडवायच्या आणि दूध पाजण्याकरिता प्रयत्नात जुडल्या .पण ते बाळ न रडता आता फक्त श्वास जोरजोराने आत बाहेर करीत मान एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला नेत होते.

राजेश आणि नर्स डॉक्टरबरोबर लगबगीने रूममध्ये आले .डॉक्टरांनी बाळाची (लावण्याची) तपासणी केली.

डॉक्टर राजेश ला सांगीत “आपल्याला लगेच या बाळाला चाईल्ड केअर हॉस्पिटल हलवावे लागेल”

हे ऐकताच राजेशच्या हृदयाचे ठोकेच चुकले आणि रश्मी रडायला लागली. रश्मीची आई तिला धीर देत होती . 

डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक क्षण महत्वाचा आणि त्यांच्या सांगण्यावरून बाळाला दुसऱ्या हॉस्पिटला हलवावे लागले. डॉक्टरांनी दुसरं बाळ आणि रश्मीला त्याच हॉस्पिटलला थांबवून घेतले.  

एकीकडे राजेश त्या चिमुकल्या बाळाबरोबर एकटा आणि इकडे रश्मी बाळापासून दूर झाल्यामुळे आणखीनच दुखी आणि चिंतीत होती पण तिला इथे दुसऱ्या बाळासाठी थांबणे अनिवार्य होते. 

चाईल्ड केयर ला पोहचल्यावर लगेच बाळाला (लावण्याला) अतिदक्षता कक्षा (ICU) मध्ये नेण्यात आले. 

 राजेश च्या हातून नर्सने बाळाला घेतले त्यावेळी बापाचे मन ते बाळ नर्सच्या हाती देताना थोडे कचकले. 

जेव्हा नर्सबरोबर राजेश चालायला लागला तेव्हा नर्स सूचना देत 

“तुम्ही बाहेरच थांबा आत परवानगी नाही”

राजेशला आत बाळाबरोबर जायच होता तो नर्सला आग्रह करायला लागला “ मला येऊ द्या आत प्लीज “

पण नर्सने पुन्हा समजून सांगितले “विश्वास ठेवा तुम्ही. मी आहे तिथे काळजी घ्यायला तुम्ही आत नाही येऊ शकत” राजेशला ICU बाहेरील शिपायाने थांबवले. 

नर्स बाळाला आत घेऊन गेली तेव्हा राजेशचा जसा प्राण काढुन नेलाय असे हवभाव त्याचा चेहऱ्यावर होते. 

तो शिपायाला विनवणी करून बोलला “प्लीज मी आत नाही जात मला दाराच्या या काचेतून तरी बघू द्या. त्याचा गयावया बघून शिपायाने त्याला तिथे उभे राहू दिले. 

नर्सने ICU मध्ये नेताच बाळा ला सलाईन लावायला सुरवात केली राजेश बाहेरुन हे बघत होता जशी नर्सने बाळाच्या हातामध्ये सुई टोचली तसेच राजेशच्या हृदयात टोचल्या गेले. त्यानंतर तर नर्सने बाळाच्या नाका जवळ गाला वर पण नीडल टोचली . येवढया वेळ कुंथुन रडत असलेलं बाळ वेदनेने जोरात रडायला लागले हे बघून राजेशच्या डोळ्यात अश्रूच्या धारा लागल्या. बाळाला काचेच्या पेटीत ठेवण्यात आले डॉक्टरांची टीम बाळाच्या प्रकृतीवर नजर ठेऊन होते ती रात्र कठीण होती राजेश रात्रभर ICU च्या दाराजवळ होता. डॉक्टर काही ठाम सांगायला तयार नव्हते. 

दुसरा दिवस उजाडला डॉक्टर काही सांगतील या आशेने राजेश तिथेच होता सकाळी पण नर्सेसची आणि डॉक्टरची धावपळ सुरूच होती. सकाळची दुपार झाली राजेश उपाशी तापाशी तिथेच उभा होता . दुपारी साधारण १ वाजता नर्सने राजेशला हाक दिली

 “तुम्हाला डॉक्टरांनी केबिन मध्ये बोलावले” राजेश लगेच डॉक्टरकडे गेला. 

डॉक्टर राजेश ला धीर देत “ सध्याकुठे बाळाची तब्बेत स्टेबल झाली आहे पण तरीही पुढील २ दिवस कठीण आहेत “ हे एकूण राजेशच्या पायाखालील जमीन खचकल्यासारखी झाली. 

राजेशनी रश्मीला ती जास्त काळजीत राहील या कारणाने याबद्दल काही सांगलीतले नाही आणि स्वतःमात्र हा तिथेच तहान भूक विसरून सारखा ICU बाहेर तातकळत होता. 

बाळाला ऍडमिट होऊन आता तीन दिवस झाले होते. रश्मीला इकडे हॉस्पिटलला डिस्चार्ज मिळाला. आणि ती घरी परतली होती.

 तिला लावण्याला बघायची खूप इच्छा होत होती पण राजेश तिला टाळत होता.’बाळ छान आहे आणि वजन वाढवे याकरिता फक्त तिथे डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवलंय’ असच तो तिला सांगायचा.

पण पाचव्या दिवशी मात्र रश्मीला राहवलं गेले नाही. ती हॉस्पिटला जायचा आग्रह करू लागली .

शेवटी रश्मीची आई पण राजेशला म्हणाली “अहो आईच मन आहे तुम्ही कितीही सांगितलं तरी तिला बाळाला बघायची इच्छा होणारच. घेऊन जा तिला मी सांभाळते सौंदर्यला”. यावेळी राजेशचा नाईलाज झाला.

हॉस्पिटला ICU ला भेटायच्या वेळात रश्मी आणि राजेश आत गेले.

 एका काचेच्या पेटित ती चिमुकली लावण्या सुस्त पडून होती. तिच्या हाताला सलाईनच्या नीडलस आणि टेप चिकटवलयेले होते, नाकाला ऑक्सिजन आणि चेहऱ्याला कधीतरी लावलेल्या नीडल आणि टेप होत्या. 

तिच्या वजनामध्ये काही वाढ दिसत नव्हती उलट ती आणखीनच खालावलेली काळवंडलेली आणि निस्तेज दिसत होती. छातीच्या हाडाचा पिंजरा स्पष्ट दिसत होता आणि तो श्वासाबरोबर जोरजोरात खालीवर होत होता. हे बघून रश्मीच्या भावनांचा बांध तुटला आणि ती रडायला लागली.

 राजेशने तिला सावरले. तिला धीर देत ”अग म्हणून मी तुला नको म्हटले होते. पण नको काळजी करू होईल बरोबर”

दिवसा मागून दिवस गेले आता पंधरा दिवस होऊन गेले होते. डॉक्टरांनी राजेश ला केबिन मध्ये बोलावले आणि म्हणाले “ आता बाळ पूर्णपणे धोक्याचा बाहेर आहे” हे एकताच राजेश हर्षाने फुलला.

पुढे डॉक्टर बोलले ”पण म्हणावे तसे तिच्या वजनात फरक नाही आलाय. तरी आता तुम्ही डिस्चार्ज घेऊ शकता जीवाला काही धोका नाही. फक्त घरी जास्त काळजी घ्या. 

थोडं थांबत आणि गंभीरपणे डॉक्टर बोलले “आणखी एक सांगायचे. ते म्हणजे या लहान वयात जे काही भारी उपचार आणि वरून सतत ऑक्सिजनन,काही मेडिसिनसचा साईडइफेक्ट होतात. त्यामुळे तिच्या ओठ,नाक,गालाच्या नसा डेड झाल्यात. व त्याच बरोबर चेहऱ्याचे काही प्रमाणात डिफॉरमेशन झाले.”

राजेश काळजीने” मग याला काही इलाज असेलच ना?”

डॉक्टर धीर देत “प्रयत्न करीता येईल पण या वयात नाही जेव्हा ती वयात येईल तेव्हा ते करावे लागेल. पण नक्की काही सध्या सांगता येणार नाही”

लावण्या चा चेहरा आता तसा नव्हता जसा जन्मतः होता. नाकाच्या छिद्राशिवाय नाकाला दुसरा आकार राहिला नव्हता, गाल आणि ओठ ओरबडून खाली ओढल्यासारखा दिसत होता तिचा चेहरा एखाद्या प्लॅस्टिकच्या चेहऱ्या सारखा निर्जीव दिसत होता.

राजेश रश्मी हॉस्पिटला लावण्याला घरी नेण्याकरीता आले. रश्मीची आई घरी सौंदर्याचा सांभाळ करीत आपल्या दुसऱ्या नातीची आतुरतेने वाट बघत होती.

डॉक्टरांनी सांगतिलैल्या वाईट बातमी बरोबर एक मात्र चांगली बातमी होती ती म्हणजे लावण्या पूर्णपणे बरी झाली होती. ती आता घरी परतली होती. 

म्हणायला तरी आता सर्व सुरळीत झाले होते. पण खरंच राजेश,रश्मी,लावण्या यांच्या दुःखाचा अंत झाला होता कि सुरवात?

दोन जीव एकाच वेळात एकाच ठिकाणी, एकाच आई बाबाच्या पोटी जन्माला आले. आईने गर्भात असताना तर त्यांचे पोषणामध्ये काहीच भेदभाव केला नाही. मात्र नियतीने हा भेदभाव का केला असावा. 

हा खेळ नशिबाचा होता…


क्रमश:



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy