कथेचे नाव :फॅशनच्या दुनियेत भरकटलेली ती...
कथेचे नाव :फॅशनच्या दुनियेत भरकटलेली ती...
दीपिका एक हाऊसवाइफ होती. तीच व तिच्या नवऱ्याचं म्हणजे अमोलचं सगळं काही चांगलं होतं. दीपिका गावाकडील होती, पण साधी राहणीमान उच्च विचारसरणी असणारी होती. काटकसरी स्वभावाने संसार बारकाईने करत होती. अमोल तिच्या हातात महिन्याचा पगार देत, त्यातून ती घरातील खर्च व भाजीपाला यासाठी वापरत पण स्वतःतासाठी एक रुपयांही खर्च करत नसे.जास्तीत जास्त सेविंग्स कशी होईल याकडे तिच लक्ष होतं. कारण हायफाय सोसायटीमध्ये दोघांनाही घर घेयच होतं.दोघांचही तसंच स्वप्न होतं तिच्या नवऱ्याला तिच्यावर खूप विश्वास होता की आपली बायको काटकसरीने संसार करेल. त्यामुळे घरातील जबाबदारी तिच्यावर सोपवून तो निर्धास्त कामावर जाई. कारण दीपिका नवऱ्याच्या सुखातच स्वतःचं सुख मानत.अमोल दीपिकाला नेहमी म्हणत की तुलाही काही आवडलं तर घेत जा. पण दीपिकाला साधं राहणं आवडे. तिच्या नवऱ्याकडून अपेक्षाही खूपच कमी होत्या. तिलाही वायफट खर्च करणे आवडत नसे. तिचे सासुसासरे गावाला राहत होते. पण नणंद मात्र तिच्या जवळच राहायला होती.तीच नाव अपूर्वा जी स्वतःच्याच दुनियेत असे. स्वछंदी आयुष्य जगणे, भरपूर शॉपिंग करणे, सारख् हॉटेल्सला जाणे,व भरपूर फिरणे ती घरात जवळजवळ नसायचीच.अपूर्वाचा नवरा खूपच साधा होता. तो अपूर्वाकडे घरखर्चसाठी पगार आणून देत. व तिला नेहमी बजावून सांगे अपूर्वा पैसे खूप काळजीपूर्वक वापर. कारण यातून मी घराचे हप्ते पण देतोय. तुलाही मी महिन्याला मोठी रक्कम देतोय. सगळा घरातील खर्च करून जेवढी रक्कम उरेल तेवढी रक्कम सेविंग्स कर. अडचणीच्या काळात आपल्याला कोणाजवळ हात पसरायला नको.आज सकाळीच अपूर्वाला तिच्या मैत्रिणीचा कॉल आला. जी तिच्या श्रीमंत मैत्रिणी मधील एक होती.अपूर्वा गोव्याला जायचा प्लॅन केलाय सगळ्यांनी. अपूर्वा ट्रिपच ऐकताच खूप खूष झाली. अपूर्वा, "हो जाऊया किती दिवसांची आहे. मैत्रीण,"एक आठवड्यासाठी चालोय..! " तुला काही प्रॉब्लेम नाही ना? " ती मैत्रीण म्हणाली. अपूर्वा,"अग मला कसला प्रॉब्लेम मी नक्कीच येणारं. दोघींचं बोलणं झालं अपूर्वाने फोन ठेवून दिला.ट्रिपचे ऐकून अपूर्वाने सेन्टरलं मॉलला जाऊन खरेदी करण्याचा प्लॅनिंग केला. अपूर्वाच्या नवऱ्याचा पगार लाखोंमध्ये होता. पण अपूर्वाची सवय होती की पैसे वाचवण्यापेक्षा ते उधळता कसे येतील. नवऱ्याचं ऐकेल ती कसली अपूर्वा...!अपूर्वाने स्वतःचंच खरं केलं व तिला हवं तसं करू लागली.तेही नवऱ्याला काही कळू देता.माहेर जवळ असल्याने अपूर्वाचं जाण येणं सारखं असे.आजही ती माहेरी आली.अपूर्वा दीपिकाला म्हणाली, वैहिनी तू किती बोरं राहतेस ग...! ना तुला ड्रेससिंगसेन्स आहे... ना मेकअप "अग छान राहावं जरा अग आजच्या काळातही तू किती साधी राहतेस. मी उद्या शॉपिंगला चाले,यांनी कालच पैसे दिलेत मला, "तू ही येशील का....?" चल तुला ही कळेल कसं राहावं ते...! दीपिका, नाही हो ताई मला नाही जमणार उद्या काम पण भरपूर आहे मला.बरं नका येऊ. पण उद्या माझा स्वयंपाक बनवून ठेवा. कारण मी उद्या लवकरच शॉपिंग करायला जाईन. आणि हो आज काय केलय जेवायला खूप भूक लागलीये. दीपिका, ताई मी आणते ताट करून दोघी जेऊ.जेवण करून अपूर्वा घरी निघून गेली. तिला घरातील काम करण्याचा कंटाळाच. आठवड्यातून चार दिवस नवऱ्याला जेवण बाहेरच करायला सांगे. ती माहेरी येत असे व जेवण तिथेच करत. असं तीच रुटीन बसलं होतं.दूसऱ्या दिवशी अपूर्वा माहेरी आली वैहिनीला शॉपिंग दाखवायला. आधी दोघींनी जेवण केलं. दीपिका आवाक होऊनच बघत होती. कारण खूपच खर्च अपूर्वाने शॉपीगंवर केला होता. सेलेब्रेटी टाईप पर्स, ड्रेस,मॅचिंगच्या सँडल एवढी खरेदी तीने एका दिवसात केली होती. अपूर्वा, "शॉपिंग केली की दिवस कसा आनंदात जातो.तुम्ही पण शॉपिंग करत जा ना दादाकडून घेत जा पैसे.दीपिका, "ताई हे पैसे देतात पण मला साधंच राहायला आवडत.अपूर्वा, "वहिनी खर्च करायचा स्वतःसाठी जरा राहायचं छान,"अपूर्वा दीपिकाला म्हणाली. वहिनी मी निघते. जेवण छान झालं होतं. असं म्हणत अपूर्वा निघून गेली. दीपिकाने एवढा खर्च बघून मात्र डोक्यावर हात मारून घेतला.तिने अमोलला सांगून अपूर्वाचे डोळे उघडावेत असं दीपिकाला वाटत होतं. कारण ती जर काही म्हणायला गेली तर अपूर्वाला राग येईल असं दीपिकाला वाटत होतं.ती अमोल घरी येण्याची वाट पाहू लागली.संध्याकाळी ऑफिसवरून अमोल घरी आला.फ्रेश झाल्यावर अमोल दीपिकाबरोबर गप्पा मारत बसला होता. बोलता बोलता दीपिकाने अपूर्वाचा विषय काढला. आहो ताई आल्या होत्या आज. कुठे गोव्याला फिरायला जाणार आहेत असं म्हणत होत्या. खूप सारी शॉपिंग केलेली होती त्यांनी दाखवायला घेऊन आल्या होत्या. मी तर आवाक होऊनच बघत होते.खूपच पैसे खर्च केले होते त्यांनी...! अमोल, एवढी शॉपिंग अग मध्ये तर तिने कितीतरी ड्रेस, अजून काही शॉपिंग केली होती.दीपिका, आहो ताईचं किती शॉपिंग केली तरी मनचं भरत नाही. सतत इतरांना कॉपी करत तसंच त्यांना राहायचं असतं. पण खर्च किती होतोय, याकडे लक्षच नाही. आहो त्यांना जरा तुम्ही समजावून सांगा तुमचं ऐकलं तर बरं होईल नाहीतर भविष्यात आर्थिक समस्याना त्यांना समोर जावं लागेल. अमोल, "दीपिका काय समजावून सांगायचं तिला ऐकायला तरी हवं आपलं.अमोल म्हणाला, सासू सासरे गावी असतात अपूर्वाचे.ते खूप साधी माणसं आहेत आणि नवराही तिचा खूप साधा आहे.माहेरी होती तेव्हाही तीच तसंच होतं. पण आता तिला बारकावा बघायला हवा,आता ती एकटी नाही. नवरा आहे पुढे मुले होतील.मी बोलेन तिच्याशी, "अमोल दीपिकाला म्हणाला.दीपिकाला पण अपूर्वाची काळजी वाटायची पणसमजावणार कसं कारण अपूर्वा दीपिकपेक्षा मोठी होती. दीपिकाला हेही माहित होतं की चारचौघात अपूर्वाला दिखावा करायला खूप आवडतो.अपूर्वाला घरातील काम नकोत, स्वयंपाक करायला नको काम टाळण्याकरिता सतत माहेरी जाणेछान राहणं, छान दिसणं हे अपूर्वाच्या आवडीच होतं. पण ती हे विसरली होती अंथरून पाहुण पाय पसरावेत.अपूर्वाचा नवरा शैलेश खूपच साधा व सरळ मार्गी होता. नवऱ्याने दिलेली जरा जास्तीची मोकळीक याचाच अपूर्वा पुरेपूर फायदा घेत होती.नेहमीप्रमाणे आजही तिने राहिलेली बाकीची भरपूर शॉपिंग केली. ड्रेस, त्यावर मॅचिंग सँडल,मॅचिंगच्या इअररिंग्स, तेही अभिनेत्रीचा लुक बघून त्यांच्यासारखा लुक तिला गोव्यामध्ये करायचा होता त्यामुळे तिने खूप खर्च केला होता.तिच्या मैत्रीन समोर कोणतही कमीपणा तिला दाखवायचा नव्हता. आज तिचा मूड खूपच छान होता. शॉपिंगमुळे तिला जास्तच आनंद होतं असे. नवऱ्याने दिलेली सेविंग तिने सगळी खर्च केली होती. याच तिला काहीच नव्हतं पडलं.त्यादिवशी संध्याकाळचा डिनर तिने हॉटेमध्येच केला. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी शॉपिंग घेऊन ती दीपिकाकडे आली. दीपिका तिची शॉपिंग पाहुन आवाक होऊनच बघत होती. अपूर्वाच्या तोंडावरून आनंद मात्र ओसांडून वाहत होता. अपूर्वा, वहिनी आवडली का माझी शॉपिंग कशी वाटली तुम्हाला...? दीपिका, ताई खूप छान केलीये शॉपिंग..? महाग पण दिसतंय. अपूर्वा, "वाहिनी अग मॉलमध्ये गेलं ना की कितीही शॉपिंग केली तरी कमीच वाटत.मन माझ कधी भरत नाही. अग शॉपिंगला जाण्याच्या आनंदात घरात काम काहीच मी केलं नाही, यांना पण बाहेरच जेवण करायला सांगितलं. वहिनी भूक खूप लागलीये, मला काहीतरी खायला आणा.दीपिका, ताई लगेच घेऊन आले, तुम्ही हात धुवून बसा असं म्हणत दीपिका अपूर्वाला जेवण आणायला किचनमध्ये गेली. अपूर्वा जेवण करता करता बोलत होती, वहिणी आज संध्याकाळी माझी भिशी आहे. त्यामुळे आज संध्याकाळी मी बाहेरच जेवण करणार. त्यामुळे संध्याकाळी पण मला काम काही नाही. वहिणी तुला बोरं नाही का वाटत तेच तेच काम रोज करायला.दीपिका नाही हो ताई मला नवीन पदार्थ बनवून खायला घालायला खूप आवडतात. आजची तुमच्या आवडीची भाजी आहे, सांडग्याची आवडली का तुम्हाला...? अपूर्वा, "वाहिनी अग तुझ्या हाताला अप्रतिमचव आहे,म्हणून तर जेवायला इकडे येते,कारण काढून आता दोघीही मोठमोठ्याने हसत होत्या. अपूर्वा, वहिणी तुम्हाला सांगायचंच राहिल. आम्ही मैत्रिणी उद्या गोव्याला चाललोय. त्यामुळे एक आठवडा तरी इकडे येणं होणार नाही.अमोल तिथंच दोघीच्या गप्पा ऐकत मोबाईल मध्ये काहीतरी करत बसला होता.अमोल अपूर्वाला म्हणाला, अपूर्वा अग किती पैसे उधळतेस, त्या नवऱ्याच्या कष्टाची जाणीव ठेव जरा. एवढे पैसे खर्च करत का कोण...? घरात काम नको करायला, सारखं माहेरी पळायचं."अग पुढे मुलं होतील तुला अशीच वागणार आहेस का....? अपूर्वा वेळीच डोळे उघड,वेळ निघून गेल्यावर पच्छातापशिवाय काही राहत नाही.अपूर्वा हसत म्हणाली, वहिनी चला मी निघते खूप उशीर होईल. या दादाच लेक्चर ऐकून मला माझा दिवस खराब नाही करायचा.अपूर्वाला कोणाचंही काही ऐकून घेयच नसायचं.ती टेन्शन फ्री जगणारी बिनधास्त मुलगी होती.दीपिका, ताई या ट्रिपवरून आल्यावर धम्माल काय केली ते सांगायला.अपूर्वा, हो म्हणतं हसत निघून गेली.अपूर्वा व दीपिका ननंदभावजय पण बहिणीसारख्या राहत होत्या. दीपिका पण कधी अपूर्वाच्या सारख्या येण्याने कधी राग-राग करायची नाही.उलट अपूर्वा येण्याने दीपिकाला तिच्या बडबडीने दिवस कसा जायचा समजायचंही नाही. दोघीमध्ये छान बॉण्ड झाला होता. एकमेकींना समजून जमवून घेत दोघी राहत होत्या.नणंदेने कधी भावाजयवर रुबाब दाखवला नाही की भावाजयने कधी नणंदेलापरकेपनाची वागणूक दिली नाही. अशा दोघीहीराहत.दादाने एवढं बोलूनही अपूर्वाला काहीचं वाटलं नाही. "हम जैसे है वैसेही रहेंगे....!"असच काहीस अपूर्वाचं होतं.मैत्रिणींबरोबर गोव्याला अपूर्वा छान एन्जॉय करत होती. नवऱ्याचे तिला जास्त काही पडलेलं नव्हतंच. छान छान ब्रँनडेड कपडे घालून तू खिच मेरी फोटो असं म्हणत छान छान सेल्फी घेण्यात सगळेच व्यस्त होते. इन्स्टा, फेसबुक, व्हाट्सअप ला पोस्ट करत खूप सारे लाईक्स अपूर्वाला मिळत होते. त्यात ब्रँडेड कपड्यांचे, वस्तूंचे कौतुक मात्र सगळेच करत होते. खूप साऱ्या मैत्रिणी तिच्या बोलण्याने राहणीमानाने, व श्रीमंतीच्या दिखाव्यामुळे तिच्याशी जोडल्या गेल्या होत्या.अपूर्वाचं व्यक्तिमत्व मोठया श्रीमंत घरातील त्यामुळे तिला तिच्या ग्रुपमध्ये खूप मानपान मिळतं होता. तोच स्टेटस जपण्याकरिता अपूर्वा आवढव्या खर्च करत होती. त्यामुळे अपूर्वा तीच लाईफ तीच स्वतःरंत्र्य याच्याशिवाय तिला काहीच दिसत नव्हतं. तीचा नवरा बाहेर जेवतोय याचही तिला काही पडलं नव्हतं. पण पुढे काय वाढून ठेवलय, याचा अंदाज अपूर्वाला मात्र काहीच नव्हता.अपूर्वा खूप आनंदात होती. गोव्याच्या ट्रिपमधून अजूनतरी ती बाहेर आली नव्हती.त्या रात्री ट्रिपमधील स्वतःचे फोटो बघताना तिच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.शेजारीच शैलेश तिचा नवरा झोपला होता.अपूर्वा, "आहो फोटो बघा ना ट्रिपचे किती छान आलेत, "शैलेश तिच्याकडे बघत म्हणाला, "अपूर्वा अग बरंच वाटत नाही छातीत खूप जोरात दुखतंय.आपण हॉस्पिटल ला जायचं का मला हे दुखणं सहन होतं नाही.शैलेशने असं अचानक काही बोलल्याने अपूर्वा घाबरून गेली.तिने त्याला लगेच रात्री हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. डॉक्टरांनी त्याला चेक केले तर त्याच्या परिस्थितीनुसार अंजिओप्लास्टि करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. त्यासाठी पाच लाख रुपये काउन्टरवर अपूर्वाला भरायला सांगितले.पैसे ऐकून अपूर्वाला घाम फुटला.पाच लाख अपूर्वाने सगळी रक्कम शॉपिंगसाठी खर्च केली होती.आज तीच महागडी शॉपिंग तिला मदत करत नव्हती. तिने तिच्या मैत्रिणींना कॉल केला,की पाच लाख रुपये लगेच हवेत. पण एकीने पण मदतीसाठी हात पुढे केला नाही. व्हाट्स अप, फेसबुक, इंन्सटावर एवढे फ्रेंडस असणारे अपूर्वाचे आज एकही तिच्या मदतीसाठी उभा राहत नव्हते. तिला शेवटी तिचे दादा वाहिनी आठवले.त्यांना कॉल करताच ते लगेच मदतीला धावून आले.रुपये ऐकूणच अपूर्वाला काय करावं काही सुचेना. कारण नवरा सगळी सेविंग तिच्याकडेच देत होता.दूसऱ्या दिवशी सकाळी शैलेशला शुद्ध आली.त्याच हार्ट सर्जेरी ऑपेरेशन यशस्वी झाली होती. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. तो पुन्हा देवाच्या कृपेने चांगलं आयुष्य जगू शकतं होता.बाहेरच जेवण त्याला वर्ज्य होतं. जास्त तेलकट,मसालेदार पदार्थ त्याला खायचं नव्हते. सगळंपथ्य अपूर्वाला डॉक्टरांनी समजावून सांगितलेहोते.नवऱ्याची परिस्थिती बघून अपूर्वालाखूप वाईट वाटत होते. आता अपूर्वालावाटत होतं.आधी मीच काळजी नवऱ्याची घेतली असते,घरचं जेवण बनवून दिलं असतं तर ही वेळ त्याच्यावर आलीच नसते. बाहेरच्याखाण्यानेच त्याला त्रास झाला होता. अपूर्वा दीपिकाच्या गळ्यात पडून रडत बोलत होती. दादा म्हणाला, अपूर्वा झाले ते सोडून दे आणि यापुढे झालेल्या चुका पुन्हा होऊ देऊ नकोस. नवऱ्याची काळजी घे. त्याला महिनाभर तरी घरी आराम करुदे. यापुढे तू काळजी घे त्याची. डॉक्टरांनीच सांगितलय त्याला आरामाची गरज आहे म्हणून.काही दिवसातच शैलेशला डिस्चार्ज मिळाला. अपूर्वाला जॉब करावा लागत होता. अपूर्वाला आता कुठे नवऱ्याच्या कष्टाची जाणीव होतं होती. दिवसरात्र कष्ट करून दिलेली सेविंग तिने काही मिनिटात उडवलेले तिला आठवत होते. एवढ्या दिवसांची नवऱ्याची मेहनत तिने पाण्यासारखी उधळली होती.आज तिच्या त्या श्रीमंत घरातील मैत्रिणी तिला बोलायच्या तर लांब पण जवळ पण येत नव्हत्या.दादा वाहिनी पुन्हा तिला व तिच्या नवऱ्याला भेटायला आले.त्यांना पाहुन अपूर्वा खूप भावुक झाली. तिला रडूच कोसळलं.दीपिका, ताई रडू नका, हेही दिवस जातील सगळंकाही व्यवस्थित होईल. दादा,"अपूर्वा जॉब काय म्हणतोय छान चालू आहेना...? अपूर्वा, हो दादा डिग्री असल्याने चांगली पोस्ट मिळालीआहे. दादा हे मला सेविंग करायला पैसे देत होते,पण मी त्याचा नीट वापर केला नाही. ही वेळआज माझ्यामुळेच आलीये दादा...! दादा, "हे बघ अपूर्वा तुला आधीच मी म्हणालो होतो, पैसे काटकसरीने वापर जास्त खर्च करू नकोस. घराचा हप्ता, घरातील खर्च काय काय तुला बघावं लागतंय. शैलेशच्या साध्यापणाचा तू फायदा घेतलास. पण जाऊदे यापुढे तरी सावध राहा. शैलेशला सांगूनच कोणतेही निर्णय घे. अपूर्वा, हो दादा आता पैशांची किंमत कळतेय,यापुढे अशी चूक नाही करणार दादा, वाहिनीसारखीच वागेन. दीपिका अपूर्वा एकमेकींकडे बघून हसत होत्या. अपूर्वाचे डोळे उघडले खरे, पण त्यासाठी खूप वाईट परिस्थितून तिला जावे लागले.दादा वैहिनीने दोघांचाही निरोप घेतला, काळजी घे दोघांचीही असं अपूर्वाला बजावून सांगितलं.शैलेश आता पूर्ण बरा होतं आला होता. काही महिन्यातच त्याने पुन्हा कामावर तो पुन्हा रुजू झाला.पहिली अपूर्वा आता राहिली नव्हती, तर तिच्यामध्ये खूप बदल झाला होता. तिने आता सगळ्या मैत्रिणी चार हाताच्या अंतरावरच ठेवल्या होत्या. अपूर्वाने आता जॉब सुरूच ठेवला. शैलेश व अपूर्वा आता दोघेही एकत्रित आनंदाने जगू लागले. दिवसेंदिवस दोघांमधील प्रेम आता फुलू लागले अधेमधे दीपिकाचा, तिच्या दादाचा चौकशीसाठी कॉल येत असे. आईवडिलांनंतर दादा वाहिनीची आपुलकी, प्रेमाने चौकशी पाहुन अपूर्वाला खूप बरं वाटत. असाच एकदा अपूर्वाला तिच्या दादाचा कॉल आलाअपूर्वा,हा दादा बोल दादा, अपूर्वा आनंदाची बातमी आहे, अपूर्वा, आनंदाच्या भरात म्हणाली, " मी आत्या होणार...?" दादा, अग तसं काही नाही अपूर्वा, " अग आम्ही रामलीला सोसायटीमध्ये 2Bhk फ्लॅट घेतलाय, तर दोघांनीही एकवीस तारखेला वास्तुशांतीला या.अपूर्वा, अरे व्हा दादा, इतक्या टोलेजंग सोसायटीत फ्लॅट घेतलाय.माझ्या काही मैत्रिणीही त्या सोसायटीतील आहेत. खूप छान दादा... दोघांनचही अभिनंदन दादा,अपूर्वा चल ठेवतो फोन अजून सगळ्यांना कॉल करायचे आहेत. अपूर्वा नेहमी वाहिनीच कौतुक करत, पण तिला आज असं वाटत होतं, की आज वाहिनीच कौतुक करावं तेवढ कमीच आहे.कारण वहिणीमुळेच तिचा दादाचा संसार सुखाचा, आनंदाचा झाला होता. ही कथा आजची वास्तविक परिस्थिती दाखवते. यात खर्च करू नका असं नाही किंवा तुम्ही छान राहायलाही हवं पण कोठे थांबलं पाहिजे हे कळायला हवं.आपल्या आवाक्याबाहेर तर आपली आर्थिक परिस्थिती जाणार तर नाही ना,याची काळजी घायला हवी एवढंच सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.कोणाचंही मन दुखावण्याचा इथं उद्देश नाही.
