Click here to enter the darkness of a criminal mind. Use Coupon Code "GMSM100" & get Rs.100 OFF
Click here to enter the darkness of a criminal mind. Use Coupon Code "GMSM100" & get Rs.100 OFF

Shital Thombare

Romance


3  

Shital Thombare

Romance


कथा तुझी अन् माझी - भाग 3

कथा तुझी अन् माझी - भाग 3

4 mins 456 4 mins 456

इकडे शामलची उत्सुकता शिगेला पोहोचलेली...कसा दिसत असेल बरं मुलगा...काळा ..गोरा..उंच..की बुटका..ताईला शोभेल असाच असेल ना?? एक ना अनेक विचार शामलच्या डोक्यात पिंगा घालत होते... काहीही करून नवऱ्या मुलाची एक तरी झलक पहायचीच असं शामलने मनाशी पक्कं ठरवलं... इकडे शामलच्या घरात पाहुण्यांची गर्दी झालेली...दाखवण्याचा कार्यक्रम सुरु झालेला... पण शामलची मात्र नुसती घालमेल सुरु होती...सरळ घरी जाता येत नाही...बाबांना ते पटलं नसतं..उगाच बोलणी खावी लागतील... शामल ज्या काकूंच्या घरी अभ्यासाला बसली होती...त्यांच्या दारातून शामलच्या घराची बाल्कनी दिसत होती...दरवाजाच्या अगदी समोरच नवरा मुलगा बसला होता... शामल कंटाळा आल्याचा बहाणा करत बाहेर आली...तोच समोरच बसलेल्या नवऱ्या मुलाशी तीची नजरानजर झाली... बाप रे! शामलने जीभ चावत काकूंच्या घरात धूम ठोकली.... 'काय विचार करेल नवरा मुलगा माझ्याबद्दल... मला असं चोरून त्याच्याकडे पाहताना नेमकं त्याने पाहिलं... त्याला आत्ताच बाहेर पाहायचं होतं... बाबांना समजलं तर चांगलाच ओरडा बसेल.. जाऊ दे ओरडू देत ...थोडा वेळ बोलतील मग गप्प बसतील...' शामल स्वत:शीच पुटपुटली...


पण शामल जाम खुश होती...ताईला पहायला आलेला मुलगा ती पाहू शकली...मुलगा पाहून तिला हायसं वाटलं...कारण मुलगा तिने कल्पना केलेला त्यापेक्षा खूपच छान होता... गोरा रंग, भरदार शरीरयष्टी, एकदम ऐटबाज, रूबाबदार दिसत होता... त्यात त्याने घातलेला डार्क निळ्या रंगाचा शर्ट...काय खुलून दिसत होता त्याला... 'आपल्याला तर जीजू पसंत आहे'...शामल मनाशीच म्हणाली... पाहण्याचा कार्यक्रम उरकला...पसंती कळवतो म्हणत पाहुणे मंडळी गेली... घरात नुसती मुलाबद्दलच चर्चा सुरु होती...मुलगा सगळ्यांनाच पसंत होता...आता फक्त मुलाकडच्या होकाराची प्रतिक्षा होती...पाहुणे मंडळींचा एकून अंदाज घेता त्यांचा ही होकारच असेल असं सगळ्यांच मत होतं... शामल मात्र मनातल्या मनात खुश होती...आपल्या ताईचा नवरदेव आपणही पाहिला...पण कोणाला काही समजलं नाही याचीच तिला भारी मज्जा वाटतं होती... रात्री झोपताना शामलची आपल्या ताईजवळ नुसती कुजबुज सुरु होती...

'ताई तुला पसंत आहे ना मुलगा...उगाच आई बाबा म्हणतात म्हणून नको चढू बोहल्यावर'...

'आई बाबांची पसंती तीच माझी पसंती आहे '...रेश्मा म्हणाली...

'हो का? सरळ सरळ सांग ना मुलगा पसंत आहे म्हणून'...शामल रेश्माला छेडू लागली...

'ए ताई पण एक सांगू का? निळ्या रंगाच्या शर्टमध्ये काय हँडसम दिसत होता मुलगा..' रेश्माने हे ऐकलं अन् ती जोरजोरात हसायला लागली...शामलला समजेना हिला नेमकं काय झालं??

'ए ताई लग्न ठरण्याच्या आनंदात वेडबिड तर नाही ना लागलं तुला...' रेश्माचं हसू काही केल्या थांबेना मग मात्र शामल चिडली...

'ताई काय झालयं मला काही सांगशील का? तू अशीच हसत राहिलीस तर मी बोलणारच नाही मुळी तुझ्याशी... असं म्हणत शामलने गाल फुगवले अन कुस बदलली... मग मात्र रेश्मा आपलं हसू दाबत शामलला म्हणाली...'अगं वेडाबाई तू ज्याला चोरून पाहिलसं तो नवरा मुलगा नव्हता काही... नवऱ्या मुलाने तर ब्राऊन रंगाचा शर्ट घातलेला... आणि तू ज्याच्याबद्दल बोलत आहेस तो मुलाचा मावसभाऊ होता.. नवऱ्या मुलाला सोबत म्हणून आलेला...आणि तू त्यालाच नवरा मुलगा समजलीस'...असं म्हणत रेश्मा पुन्हा हसू लागली... मग मात्र शामल जागेवरच उडाली...काय? म्हणजे मी चुकीच्या मुलाला नवरा मुलगा समजले... अरे! देवा ...मी किती खुश होते...तुझ्या नवऱ्या मुलाला पाहिलं म्हणून...माझा तर चांगलाच पोपट झाला म्हणं की... आता मात्र दोघी बहिणींना हसू अनावर झाले...

'ए पण त्याला काय गरज होती असं नवऱ्या मुलासोबत यायची... त्याच्यामुळे मी माझ्या होणाऱ्या जीजूंना नाही पाहू शकली...' थोडा वेळ शांत होतं..

शामल पुन्हा म्हणाली..'ए ताई पण तो दुसरा मुलगा पण भारी होता हा...मी तर पाहिल्याबरोबरच पसंत केला...जीजू म्हणून... पण काय यार तो राँग नंबर निघाला...'

'इतका आवडला का आमच्या शामलबाईंना...मग आईशी बोलून तुझ्या लग्नाचं ही ठरवूयात...एकाच मांडवात दोघी बहिणी..काय बोलू का आईशी बोल! बोल!'...रेश्मा शामलला चिडवू लागली... इतका वेळ दोघींची बडबड चाललेली बघून...

आईने आवाज दिला...'काय गं झोपायचं नाही का आज...का रात्रभर गप्पाच मारत राहणार आहात...' मग मात्र दोघींनी पांघरूण घेत डोळे मिटले...रेश्मा झोपली पण शामलला आज काही झोप लागेना...तिने दुपारी पाहिलेल्या मुलाची झलक काही तिच्या नजरेसमोरून जाईना... रात्री कितीतरी वेळ शामल जागीच होती...तिची अन् त्याची झालेली नजरानजर...त्याने तिला पाहिलं तशी शामलने धूम ठोकली... हेच सगळी रात्रभर तिच्या नजरेसमोर नाचत होतं...रात्री उशिरा कधी झोप लागली तिचं तिलाच कळलं नाही... सकाळी जाग आल्यावर... रात्री आपण त्या मुलाचा इतका का विचार करत होतो बरं म्हणून शामलला स्वत:चाच राग आला... कोण कुठला मुलगा मी एवढा काय विचार करतेय त्याच्याबद्द्ल जाऊ दे नको तो डोक्यात विचार म्हणतं शामलने त्या मुलाचा विचार पुन्हा करायचा नाही असं स्वत:लाच बजावलं...


दुसऱ्याच दिवशी रेश्माला पाहायला आलेल्या पाहुण्यांचा होकार आला...शामलची बारावीची परिक्षा होती...त्यामुळे परिक्षा होऊ द्यावी मगच लग्नाची तारीख ठरवायची... असं निश्चित करण्यात आलं... शामलची परिक्षा झाली... अन् रेश्माच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु झाली... लग्नाचा दिवस उजाडला...हॉलवर जिकडे तिकडे सगळ्यांची गडबड सुरु होती... शामलने आज हिरव्या रंगाची, बुट्ट्याबुट्ट्याची साडी नेसली होती...त्या साडीत ती खूपच खुलून दिसत होती... स्टेजवर रेश्माच्या आसपासच ती वावरत होती... अचानक तिचं लक्ष कोपऱ्यात बसलेल्या एका घोळक्याकडे गेलं... काही मुलं मुली तिथे बसले होते... त्यांचा दंगा सुरु होता... बहुतेक मुलाकडची मंडळी असतील असा विचार करत असतानाच... शामलला जाणवलं त्या घोळक्यातून कोणीतरी नजर रोखून तिलाच पाहत आहे... त्या नजरेला नजर भिडली अन् शामलच्या काळजात धस्स झालं....तीच नजर, तोच चेहरा... अरे! हा तर तोच आहे... जीजूंचा मावसभाऊ...ज्याच्यामुळे माझा पोपट झाला...ज्याची नजर मला रात्रभर त्रास देत होती... आता मात्र शामलची हिम्मत झाली नाही पुन्हा तिकडे पाहण्याची... लग्न लागलं अन् शामल आपल्या मैत्रिणींसोबत जेवणासाठी गेली... तोच मागून एक अपरिचित आवाज आला... 'हाय!' शामलने मागे वळून पाहिलं... तर तोच मुलगा...पुन्हा तिच्यासमोर उभा होता... काय बोलावं... शामलला काही सुचेना... 'हाय! मी प्रशांत'...तुझ्या जीजूंचा भाऊ...त्याने आपली ओळख सांगितली... (क्रमशः)


Rate this content
Log in

More marathi story from Shital Thombare

Similar marathi story from Romance