Shital Thombare

Others

4  

Shital Thombare

Others

एक साठवणीतील आठवण

एक साठवणीतील आठवण

3 mins
109


(वर्ष 2005) बी.ए च शेवटचं वर्ष अन् शेवटच्या वर्षातील शेवटचा पेपर. इतक्या दिवसांचा अभ्यासाचा थकवा, दगदग आणि माझ्या मुळे इतके दिवस वडीलांची होणारी ससेहोलपट सगळ आज संपणार म्हणून मी आज जाम खुश होते


कारण ...... माझी फायनल परीक्षा सुरू झाली आणि वडीलांनी रात्रपाळी स्विकारली त्याला कारण ही तसेच होते माझा परीक्षेसाठी नंबर आला होता तो ठाण्यातील ज्ञानसाधना कॉलेजात. माझी मैत्रीण तिच्या वडिलांबरोबर स्कूटी वर जाणार होती त्यामुळे एकटीने प्रवास करण्याच फारच दडपण आलं होतं पण माझ सगळं टेंशन पळाल जेव्हा वडीलांनी मला परीक्षेला सोडण्याची आणि आणण्याची जबाबदारी उचलली. ठरल्या प्रमाणे रात्रपाळी करुन वडील सकाळी आठ साडेआठ वाजता घरी यायचे अंघोळ नाश्ता करून साडे नऊला हातात एक पिशवी त्यात पाण्याची बाटली आणि वाचण्यासाठी पेपर घेऊन मला सोडण्यासाठी निघायचे साडे दहाला मी परीक्षा हॉलमध्ये गेले की वडील कॉलेजच्या बाहेर असणारया एका झाडाखाली बसत व माझ्या पेपर सुटण्याची वाट बघत. विरंगुळ्यासाठी वर्तमान पत्र होतेच.

    

दोन वाजता पेपर सुटला की पुन्हा तीन साडेतीन पर्यंत घरी. रोज च्या प्रमाणे आज पण वडील लवकर येतील अस वाटत असताना नऊ वाजले तरी त्यांचा काही पत्ता नव्हता कुठे तरी कामात अडकले होते बरोबर सव्वा नऊ ला ते घरी आले माझ्या जिवात जीव आला आज घरातून बाहेर पडायला उशीरच झाला होता नेहमीची बस केव्हाच निघून गेली होती त्यामुळे आम्हाला दोन बस बदलून जावं लागणार होतं . 


बापरे! म्हणजे आणखीन उशीर. मला तर धडधडायलाच लागलं. कसे बसे कोर्ट नाकया पर्यंत पोहोचलो तिथे उतरून दुसरी बस धरायची..... बस आली आणि पाटी न वाचताच वडील बसमध्ये चढले मागोमाग मी सुद्धा. कंडक्टर ने बेल वाजवली आणि बस सुरू झाली. आम्ही पुढे सरकणार तोच कंडक्टर ने लास्ट स्टॉप चे नाव घेतले आणि आमच्या लक्षात आलं आमची बस चुकली क्षणाचाही विलंब न करता मी बसमधून उडी मारली आणि डोक्यावर पडले. काय झालं वडीलांना काहीच कळाल नाही आपली मुलगी पडली हे पाहताच त्यांनी ही बस मधून उडी मारली पण....बसच्या दरवाज्यात त्यांचा शर्ट अडकला आणि ते बस बरोबर फरफटत जाऊ लागले लोकांनी एकच गलका केला आणि झाला प्रकार ड्रायव्हरच्या लक्षात आला त्याने बस थांबवली इकडे मी पडले पण मला फारसं काही लागलं नव्हत वडीलांना मात्र चांगलच खरचटले होते..... बाजूच्या पेपर विकणाऱ्या मावशी आणि एक फळवाला आमच्या मदतीला धावून आले.


थोडं रीलॅक्स होतं आम्ही दुसरी बस पकडली वडील सारखं विचारत होते कुठे लागलंय का? पण मी चांगलीच हादरले होते. माझ्या एका चुकीमुळे काय प्रसंग ओढवणार होता आमच्या वर ......एक क्षण भर काय झालं समजलंच नाही वडीलांच्या हाकेने भानावर आले मला चक्कर आली होती वडील डॉक्टर कडे जाण्यासाठी समजावत होते पण माझ्या नजरेसमोर माझा शेवटचा पेपर होता....आम्ही कॉलेजात पोहोचलो समोर माझी मैत्रीण हेमांगी माझीच वाट पाहत उभी होती तिला पाहताच इतका वेळ दाबून ठेवलेले अश्रू बाहेर पडले .....तिला सगळी हकीकत सांगितली तिने धीर दिला आणि जरा हायसं वाटलं. प्रश्न पत्रिका हातात आली आणि मी काय वाचत होते काय लिहीत होते काही समजत नव्हतं.....कारण मला फक्त वडीलांचा चेहरा समोर दिसत होता....


परीक्षेचा निकाल लागला आणि वडीलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान दिसला ते पाहून मीहि सुखावले कारण कॉलेजात मी दुसरी आले होते फक्त एका मार्काने माझा पहिला नंबर हुकला होता. पण माझ्या त्या आणि त्या पुढील प्रत्येक यशाचे मानकरी माझे वडील होते...


Rate this content
Log in