STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

3  

Shila Ambhure

Inspirational

क्षण एक पुरे .....

क्षण एक पुरे .....

1 min
340

अलक (अतिशय लघु कथा)


म्हाताऱ्या आईवडिलांना तिथेच ठेऊन तो बायकोसह नवीन घरात रहायला निघाला. साश्रू नयनांनी आई आपल्या पिलाला निरोप द्यायला अंगणात आली. त्याचेही मन भरून आले होते. खिशातून रुमाल काढून त्याने आईचे डोळे पुसले. आईला समजावण्याचा प्रयत्न केला. इतक्यात वारा आल नि रुमाल उडून गुलाबाच्या झाडामध्ये अडकला. त्याने कसाबसा रुमाल ओढून काढला. क्षणभर थांबून बायकोला म्हणाला," निशा,आईबाबांची बॅग भर. आपण सारेच नवीन घरी राहणार आहोत."


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational