STORYMIRROR

Sagar Gadhave

Romance

3  

Sagar Gadhave

Romance

"क्रश"

"क्रश"

4 mins
237

अरे कोण रे ही नवीन ?माहीत नाही नवीन आलीय office मध्ये. दिसायला काळी सावळी ऊंच ,केस मोकळे सोडलेले जणु हवेला सुध्दा तीच्या बटांना हळुवार गोंजारावे. एकदम साऊथ सारखी दिसणं तो पेहराव पण् तसाच पंजाबी ड्रेस गळ्यात ओढणी.


अरे सागर नाव काय र तीच ?कोण ती south indian , तस पाहील तर माहीत नव्हतच ती कुठुन आली नाव काय सगळ काही गुपितच होत पण म्हणतात ना काही गोष्टी मनातुन बोलल्या जातात .


"क्रश " हो नाव आहे तिचं .काही पन् सागर अस कुठ नाव असत का?


मग का नाही असु शकत .पुढ तेच नाव प्रचलित ही झाल. पण नाव होत तीच आंचल. . . . .


युनिव्हर्सल क्रश होऊन गेली होती ती.. . . . 


"क्रश "खुप काही लोकांना माहीती पन् नव्हत त्या शब्दाचा मिनींग ."क्रश "जी व्यक्ती मनापासुन तीच्यावर जीव जडतो मनात तीच्या विषयी फिलिंग येण. बघताक्षणीच मनात समथिंग समथिंग होण म्हणजे प्रेम होण वेगळ अनं क्रश होण वेगळ .

आवडणारी प्रत्येक गोष्ट मग ती आपली . . .


तशी ती साऊथ ची तीला त्यानंतर कोणीच नावान हाक नाही मारल .ये क्रश मदत कर ना मला माझ काम राहलय .करती हु ना तुम मत टेंशन लो.

माझ्या शी प्रयत्न करायची मराठी मध्ये बोलायची कारण खुप दिवसापासुन ती महाराष्ट्रत राहत होती.

मला कळती सगळी मराठी पण बोलताना शब्द सुचत नाही. तु प्रयत्न करतेस ना हेच खुप मोठ झाल मी बोलुन गेलो.


काय मग सागर टाका भिडा रहा का रे तु. . नही रे बाबा वो तो मेरी क्रश  हेै।


सागरची क्रश म्हणुन सगळ तीला चिडवु लागले.पण ती mature होती . पण कधी शब्दान बोलली नाही. . . .


जीवनात कोनाला ना कोनाला कोणतरी आवडत असत . आयुष्याच्या वाटेवर . . .कधी भावना च रुपांतर प्रेमात तर कधी असच. .विरुन जात . . .मला कधी नाही वाटल तीला विचारव . . .मित्र बोलायच सागर विचारुन टाक ना एकदाच . .


नको रे " प्रेमात पडण्यापेक्षा प्रेमाच्या काठावर राहण्यात जी मज्जा आहे ना ती कुठच नाही"

म्हणजे आत पण नको अन बाहेर पण नको.मनाला वाईट पण नाही वाटत की आपल्यासोबत अस झाल. . .पुन्हा तेच बे ऐके बे . .

म्हणुन मी काही गोष्टी हातभर लांबच ठेवतो . . .कोणाशीच जवळिक नको. माणुस एखाद्याच्या जवळ आला ना तो तेवढाच दुर पण जातो ,हा तर नियतीचा नियम आहे . . . .


मी कंपनी बदलली क्रश तसीच राहीली. . . .

शेवटच शब्द फक्त बोलली "Best of luck sagar"


शहर बदलल होत नविन माणस सगळ नविन जग ,कधी बेस्टीचा फोन झाला तर विचारायचो कशी आहे क्रश फक्त तेवढच. . . .

अरे सागर. . . . .


अचानक lockdown सुरु झाल,खुप दिवस घरीच बसुन होतो काय कराव सुचत नव्हत.विचाराने माणुस शुन्य होतो.मग जातो आठवणीच्या ठेवीत सार जीवनाचे पाढे वाचुन काढत होत.छान होते ते संस्मरणीय दिवस रायगड ,मुंबई ,पुणे आणि आता संभाजीनगर कंपनी बदलत मी सध्या पेैठण मध्ये काम करत होतो .तो प्रवास वेगळाच होता.ते नाथसागर धरण, पेैठण ऊद्यान,एकनाथ महाराज समाधिस्थ मंदिर हे आमचे फिरण्याचे स्पाँट .

जायकवाडी धरण म्हणजे आमच्यासाठी मरिन ड्राइव्ह सनसेट बघायला मजा यायची. . .


भानावर येत आपण तर खुप दुर चक्कर मारुन आलो .पाहतो तर जागेवरच . . .

अचानाक नविन मुलिचा मेसेज आ ओळखलत का मला. . 

नाही मी कधि अनोळखी व्यक्ती बरोबर बोलत नसे .हा बोला मी बोलतेय तुमच्याशी हे सांगु नका हा कोणाला .

अरे मी काय लहान आहे का .

तु नको लोड घेऊ मी ना आहे .

बोलता बोलता ती माझी कधी क्रश होऊन गेली मला कळलच नाही. . . .


क्रश वर प्रेम होण स्वभाविकच असत .पन खर अस होत तीला मी आवडलो होतो.तीचा मी "क्रश! होतो.


ती बोलायची जेव्हा तुमचा फोटो बघितला ना तेव्हाच मला तुम्ही आवडायला लागले!

मग मी विचार केला जर पुढची व्यक्ति आपल्यावर प्रेम करते तर पुढ विचार करायला काय हरकत आहे.


तीथच चुकलो!

जस दिसत तस नसत . . 

माणसांने किती ही मनापासुन जीव लावला ना त्याचे फळ नेहमी कडुच असतात. . . .


क्रश हे माझ्या जीवनातल कडु फळ ते मी खाल्ल अन जिंदगी शुन्य झाली .म्हणतात ना प्रेमात अन युध्दात सगळ काही माफ असत. . .

मी नाही सहमत ह्या वाक्याशी मनाला समजवत होत .

वेड्यासारख प्रेम कराव की वेड होण्याईतपत प्रेम कराव , जगात कोणतीच गोष्ट साश्वत नाही.


कोनाचा मनाचा ठाव कोणालाच लागत नाही. तुम्ही कितिही जीव लावा .


मेडिकल स्टोअर वर जरा कमीच वरदळ होती दुपारचे दोन वाजले आसावे .विचार मनात घोळत होते .

मन काय सांगत होत ते समजेना , खरच अस असेल ना ह्या जगात .मी विचारल मला गोळी भेटल का? 


हो बोला ना सर ! काय हवय तुम्हाला ?

 

मला माझ्या "क्रश" ला विसरायच .त्यासाठी काही गोळी वेैगरे भेटेल का?


अनं् तो माणुस माझ्याकड शुन्यात बघत हरवुन गेला . . .


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance