Sagar Gadhave

Others

3  

Sagar Gadhave

Others

अनपेक्षित

अनपेक्षित

4 mins
211


"वांग्याच तेल वड्यावर नको काढु".नाही काढत !

चुप नको बोलु ,हो मीच कायम गप्प राहते .मला कोणी समजुनच नाय घेत ह्या घरात कस राहु मी मला समजत नाही मी खुप प्रयत्न करते मन जपायच पण त्यांच्या अपेक्षा वाढत जातात मी काय करु.माझ्या भावनांचा खिलवड होतय हित.मला पण तुमच्याशिवाय करमत पण नाही.तुम्ही या ना घरी!


तुझ माझ जमेना अन तुमच्यावाचुन करमेना असच झालय आमच.मनाचा थांग लागना ना माणुस सगळ काही समजु शकतो .पण मी काय मनकवडा आहे का?नाय ना मग दे ना सोडुन . . . .


"माझ्या काळजाची तार आज छेडली, माझ्या नशिबानं थट्टा आज मांडली".अस म्हणणं वावग ठरणार नव्हत,कारण अनपेक्षित घटना अपेक्षा नसणारर्‍या व्यक्तिकडुन घडुन गेली होती.


कधीकधी काळरात्र होत असते तर कधी दिवस पण काळरात्र होतो हे प्रत्यक्षात अनुभवल होत.जीवनाच्या वाटेवर अनेक खाच खळगे येनारच ते चुकवत पुढ जाव लागत.शेवटी आपल्या हातात काय असत "जस पत्ताच्या डावात जे पत्ते हाती येतात ते घेवुनच डाव खेळला जातो तस जीवनात जे हातात आहे ते घेवुनच पुढ जावा लागत.एकदा का नशिबाचे फासे उलटे पडायला लागलेना ते कधी लवकर बाहेर पडु देत नाय.मनाला समजवत होतो बाहेर पडण्याचा प्रयास करत होतो.ऐकला चलो रे ! नाही कुणी ह्या जगात आपल बस्स एवढच. . . .


कातळ खडकातुन जसा प्रवाह खळखळतो ना पाण्याचा तसा ह्रदयातुन हुंदका फुटत होता अन डोळे त्याला प्रतिसाद देत होते "आठणीच्या हिंदोळ्यावर"


ऊगवत्या सुर्यास नमस्कार करायाच आणि मावळत्या 

सुर्यास धन्यवाद द्यायचा .आजचा दिवस आपल्या सहवासात गेला यामध्येच माझी धन्यता. कसा दिवस काढतोय ना माझं मलाच माहिती. . .


म्हणतात ना कधी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नाही जायच .का? तर प्रवाहाच्या दिशेने सगळेच जातात विरुद्ध बाजुने जाण्यास पण धमक लागते आणी जिगर पण . . .

"ती पण आता माझ्यात अनपेक्षितपणेच आलीच होती"


तुम्ही नेहमी माझेच राहतान ना ? विषय का !

तुम्ही अस बोलने मला कस स्वर्गात गेल्यासारख वाटत.अखेरच्या श्वास असेपर्यंत मी फक्त आणी फक्त तुझाच असेल. तु असेल या नसेन हे मला नाय माहीत . पण ऐक गोष्ट खरी तुमच्या आधी मीच देवाघरी जाईन.तोंडाला बोट ठेवत अस परत बोलु नकोस मी तुला कधी मरुच देणार नाही.जीवन मरणाच्या आणाभाका घेतल्या होत्या.का? कुणास ठाऊक नजर लागावी आमच्या जोडीला.


कुठ चाललो तरी लोक बोलायची काय जोडी आहे.माझा विश्वास नाही असल्या गोष्टीवर गप तु .काल पासुन डावा डोळा लवलव करत होता.काही केल्या राहीना ,आई बघ ना दोन दिवस झालेत ह्या डोळ्याला काय झालय समजना.

अरे त्याला सोन लाव होईल ठिक .मग लग्नातली अंगठि लावुन बघितली काही फरक नाय पडला.खर असत का अस कुठ? डावा म्हणजे वाईट ऊजवा म्हणजे चांगला .देवालाच माहीत खर काय अन खोट काय!


आज आनंदाचा दिवस होता.कारण माझा आज वाढदिवस होता त्यात weekly off खुप शुभेच्छा भेटल्या हितचिंतकाचे मनापासुन आभार! अरे आज काय मग गोड धोड.आज स्पेशल अस्सल महाराष्ट्रीयन पुरण पोळी.

सगळ पुरण वेैगरे बनवुन झाल होत.खमंग वास सुटला होतो .मस्त ताव मारायच ठरवल होत .

सागु !पुरणात पाल पडली .तिचा बांध फुटला किति दिवसातुन प्रयत्न केला होता यार मी.असच का होत मला नाही समजत. नको लोड घेऊ मी आहे ना तुझाच . 

दे सोडुन . . . 


अनपेक्षित काय घडु राहीलय ते पण समजेना .दिवसेंदिवस नात्यात पण तणाव वाढत होता.बोलण थोड कमी झाल .कामाचा व्याप वाढला होता .कुठ तरी थांबल पाहीजे यार. . . .


बोलल तर सगळ काही प्रश्न सोडत जातात .तुम्ही राहिलात तर खुप पर्याय उपलब्ध असतात .पन त्यासाठीं तुम्हाला जगात रहाता आला पाहीजे.

आपल मन मोकळ करता आल पाहीजे.


मनाला खुप समजावत होतो.अस का? ते पण माझ्या जीवनात .कधी कुणाचे वाईट चितंले सुध्दा नाही.शब्दान कुणाला न दुखवणारे सगळे घरातले माणस .कधी कधी जीवन गाड्यात प्रेम हळुहळु कमी होत जात.अपेक्षा वाढत जातात ,तोल फक्त सांभाळता आला पाहीजे.सध्याची परिस्थतीत अशी झालीय .लग्न झालेल मुलगी आणि तिची सासु यांच्यात जो संगोपनाच्या फरक म्हणा किंवा बदलता राहणीमान ,जे सासुला अपेक्षित असत ते सुनेला पटत नाही.जे सुनेला अपेक्षित असत ते सासुला पटत नाही.

हा फरक आहे जनरेशन चा आत्ताच्या मुली लाडात वाढलेल्या कधी संसार काय हे कधी समजुन सांगीतलं जात नाही.आई वडिल फक्त लग्न करुन मोकळ होतात पण त्यांची जी जबाबदारी आहे त्यांनी पार पाडलेलि नसते.


तुम्ही पाहु शकता मुलींचे पालक डायरेक्ट बोलतात आमच्या मुलीला आम्ही फुलात वाढवल .खुप लाडाची आहे कधी स्वंयपाक सुध्दा नाही केला .मुलगी म्हणुन नाही तर मुलगा म्हणुन वाढवलं आहे.पापाची परी कधी समरस झालीच नाही घरच्या वातावरणात.लग्नाआधी आणी नंतर किती फरक असतो हे समजावण गरजेच आहे.मग आचानक लग्न होत .ताण वाढतो कधी माहेरी केलेल नसत .माणसिक तणाव चिडचिड संसारात मन लागत नाही.मग विचार येतो कुठ तरी चुकतय सध्यस्थितीत मुलिचे पालक सुध्दा समजुन सांगत नाही मुलीला .तुझा संसार आहे ,तुलाच बघायच सगळ विचार करु नको आम्ही आहे ना सोबतीला.घर आल म्हणजे आदळ आपट आलिच .


सध्या भारतातील किति तरी लोक मानसिक तनावात आहेत .त्यामुळ आत्महत्या करण्याच प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल आहे.त्यात मध्यमवर्ग गट खुप मोठा आहे त्यात  स्वप्न पुर्ण करत असताना होणारी त्याची ओढाताण घरचे बघु की पत्नी .दोघांचा ताळमेळ घालणे कठिण होऊन जात.मग सुरु होतो विचारांचा खेळ . .


अनपेक्षित वाटचालीकडे . . . . . .


लग्न करण सोप्पं आहे पण संसार करण अवघड आहे.लग्न करताना विचार केला पाहीजे स्वभावाचा ,स्वभाव पटला तरच पुढ जा कारण पुढची पन्नाशी तुम्हाला एका बंद खोलीत काढायची आहे.समजदार लोक खुप कमी झाले समाजात .फक्त एकट्यान समजदार आसुन नाही चालत तर दोघ ही सांमजस्य हवेत.कुटुंब व्यवस्था खुप बदलत चालली आहे .ज्या घरात चार माणस होती आता दोन झाली मग वाद झाला तर सांगणार कोणी नसत बोलणार कोणी नसतं.समजवणार नसतं त्यामुळ होणारे वाद सोडचिठ्ठी चे प्रमाण ,आत्महत्येच प्रमाण किती वाढल हे तुम्ही समजु शकता.मरण किती सोप्प वाटत जो पर्यंत दोरीवर लटकत नाही.जेव्हा फास आवळला जातो ना तेव्हा खुप वाटत असाव मला वाचवाव कुणी पन् वेळ निघुन गेलेली असते. .

कायमचीच. . . .


नको देवराया ,अंत आता पाहू ।

प्राण हा सर्वथा,जाऊ पाहे।।


Rate this content
Log in