Sagar Gadhave

Inspirational

3  

Sagar Gadhave

Inspirational

कन्यादान

कन्यादान

4 mins
314


कधीकधी खूप वाईट वाटत मला ,जेव्हा कन्यादान हा शब्द लग्नामध्ये कानावर पडतो. खुप प्रकारचे दान आहेत. पण कन्यादान हा शब्दच मुळात माझ्या विचारसरणीत बसत नाही.म्हणजे ते दान घेऊन काय करावे मुलीला कस वागवावे की मुलीप्रमाणे वागावे?भारतात पाहीले तर कित्येक सुना आज आत्महत्या करतात कारण काय तर खुप शुल्लक असते.मला अस जमत नाय मी कधी केलच नाही.मला माझ्या आईने साधा स्वयंपाक सुध्दा करायला नाही लावला माझे पप्पा ने खुप लाडात वाढवल .जे पाहीजे ते लगेच हातात


सासर माहेर हे कळाल पाहीजे .जरी मुलीन कधी नाही जेवन बनवल पण तुझी आई तर बनवते ना, तरी आई म्हणुन जर प्रत्येक मुलीला काही गोष्ट करायला शिकवल्या पाहीजे.समजुन घ्यायला शिकवता आल पाहीजे ,आणी समजवता पण आल पाहीजे.चुक तिथ चुकच म्हणा आणी जिथं बरोबर तिथं बरोबरच म्हणा.


सध्या सासू सुनेच पटत नाही कारण काय ?विभक्त कुटुंब व्यवस्था घरी कोण बोलणार नाही दोघेच घरात नवरा अन बायको थोड भांडण झाल तर काय करायच सोडवणार कोण कोणी कमीपणा घ्यायचा .माहेरी कधी कोण बोलत नव्हत आजपर्यंत अाता अचानक थोड काम कराव लागण .मग होणारी चिडचिड मग राग व्यक्त करण रुसण फुगण मानसिक स्वास्थ्य बिघडण  छोट्या गोष्टीचा प्रमाणाबाहेर विचार करण मग त्यांच्या मनात येतो मुलीचा जन्म नको .सगळ मलाच कराव लागत कोण समजुन घेत नाही.शेवटी मी पणा मध्ये येतो.


या विरुद्ध विचार करा, मुलगा कामाला जातो त्याला कामाचा ताण घरी पत्नीचा ताण , घरचा ताण प्रत्येक गोष्ट पुरुषाला विचार करुण करावी लागते.तो कधी मरणाचा विचार नाही करत जरी आला तरी त्याला जबाबदारी भाग पाडते नाही हे चुक आहे.जबाबदारी ही खुप मोठी गोष्ट आहे ती जीवनात पाहीजेच.आपल घर आपला संसार आपला प्रवास. . . .


दुसरी एक बाब तुमच्या ध्यानी असल नसेल पण ती मान्यच करावी लागेल.आपली पिढी आणी आपल्या आई वडिलांची पिढी यात खुप फरक झाला.त्यांनी तसे वाईट दिवस काढलेत ते मान्य आहे पण आताची पिढी त्यांना त्याचा काही मागमूस ही नाही.मी का त्यांच्या विचाराने जगु, झाल मग सुरु होतो तुझा माझाचा खेळ .यात मरण कोणाचा होत माहीत आहे का?फक्त आणी फक्त पतीच तो बायकोला समजावु शकतो ,घरच्यांना कस सांगणार ना? मग समजदार असण खुप महत्त्वाच आहे.


जीवनात  छोट्या गोष्टी  share करा .ह्या जर मनात ठेवत गेलात तर भविष्यात खुप  भीषण परीणाम भोगावे लागतात.पुरुष प्रत्येक गोष्ट आपली पत्नी ला सांगत असतो.पण ती नाही सांगत ती दुसर्‍या कोनाला सांगते जे तीच्या जवळचे असते.कधी तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तिला सांगुन पहा विषय सुटत जातील.


आज लग्नाचा वाढदिवस होता.तसाच गेला निघुन काय करणार .जर कन्या हे दानाची वस्तु जर असेल तर ती घेणारा सुध्दा कसा पाहिजे?सध्या मुलिच लग्न झाल म्हणजे वडिलांची जीम्मेदारी संपते आता काही टेंशन नाही .पण खर तर पुढे चालु राहते खरी जबाबदारी, दान केल म्हणजे सगळ संपल अस माणल जात तुझ आहे तु पहा कस करायच .मग हे दान काय कामाच ?


संथ वाहणारी हवा त्यात मंद प्रकाश सनई तुतारीचा आवाज प्रत्येकाची लगबग नवरीचा मेकअप खुप काही करतो.तो फक्त समाजासाठी चा दिखावा असतो तो मनाला शांती देत नाही.जेव्हा संसार सुखाचा पुढ जात असेल पावलोपावली तो दिवस म्हणजे आई वडिलांचा खरा कन्यादान चा दिवस ठरेल.यात जबाबादारी खुप महत्वाची आहे मानसिक धिर देण.मुलीला भेटण विचारण काही विषय फक्त पेैसाने सुटत नाही ते जीवाभावाच माणसाने समजवण खुप महत्वाच ठरत .जेवढ आईच मुली ऐकताता तेवढ पतीच ऐकत नाही हे तेवढच खर.


जर मुलगी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली तर तीला तुम्ही जगात कस वावरायच याच कल्पना नाही दिल तर काय फायदा.माझी मुलगी तुम्हाला दान नाही तर मी तुमच्याकड माझा जीव गहाण ठेवत आहे जेव्हा कधी अडचण ऊभी राहिल तेव्हा बाप म्हणुण नेहमी ऊभा राहिण.जीथ तुम्ही चुकाल तीथ तुम्हाला माफी नाही जीथ मुलगी चुकल तीथ तीला माफी नाही.संसार करण ह्या गोष्टीच सुध्दा काही दिवसांनी प्रशिक्षण देण गरजेच ठरणार आहे.


बदलते राहणीमान वयाची निम्मा भाग सुखात गेलेला मग आचानक होणार बदल .मग त्या बदलाच भाग होण जमल पाहीजे .काही म्हटल तरी भारत देश हा पुरुषप्रधान देश आहे. पुरुषांची मानसिकता बदलली पाहीजे पत्नी म्हणुन जीवापाड प्रेम करणारे भरपुर लोक आहेत पण पती म्हणुन पत्नीपण खुप प्रेम करते. कधी प्रेम खुप झाले आचानक काही कारणास्तव हळुहळु ते प्रम कमी पण होत.जस मुल झाली मग ते प्रेम मुलांमध्ये जाते ते पण समजुन घेता आल पाहीजे. आपल म्हणुन जगता आल पाहीजे.


बायकोशिवाय मुलाला आई वडिलांना बघायच असत.दोन्ही बाजु सांभाळाव्या लागतात.त्याच मेळ घालावा लागतो.तुम्ही पाहात असालच आई वडिल वेगळे मुलगा सुन वेगळे राहतात.का? तर पटवुन घ्यायला कोणतरी कमी पडत.पुरुषाला रडता पण येत नाही घुटत जगत असतो नेहमी तो त्याला कोन संभाळणार त्याचा मनाचा ठाव कोण घेणार.


लग्न झाल्यापासून खूप बदल झाला तुझ्यात.तुला बायको सोडुन काय सुचत नाही.तुला आमची काही किम्मत नाही. पैशाची चणचण भासू लागते. बिचारा हो ला हो म्हणत पुढ जात असतो. तिकड बायकोचं चालू असतं मला कोण समजुन नाय घेत .त्यांची खुप अपेक्षा वाढल्यात मला माहेराला जाता येत नाही. तुम्ही मलाच समजुन सांगता नेहमी.तुम्हाला माझीच चुकी दिसते. अरे मी मोठ्या माणसांना कस बोलु तुला जस जमतय तस कर बाकी नाही म्हणुन सांगत जा .मी ना कात्रित सापडलोय कोणाला बोलू. मनातल्या मनात झुरत जगत असतो पुढं चालत असतो.


नको वाटतो तो संसार नको ते तेच तेच लग्नासाठी घर बांधण त्याचे स्वप्न मग लग्न मग सुखाचा संसार मग छोट मुल बाळाचा आवाज अंगाई गीत मुलाच रडण खिदळण पुढ बागडण. जीवनात ह्या गोष्टी हव्यात पण माणूस समाधानी नसतो.जर मध्येच कुणाची देवाघरी जाण झाल तर? काय बरच प्रश्न बाहेर डोकवतात.बघण्याचा प्रवाह विचार सरणी कोण काय बोलण सांगता येत नाही.


मला तर लता मंगेशकर ,दादा कोंडके, कलाम सर यांचा विचार येतो का बर यांनी लग्न नसेल केले.कधी मानसिक विचार ध्येय्य उदिष्ट यांचा विचार सुरु होतो मग बाकी गोष्टी शुल्लक होऊन जातात.नको ह्या लग्नबेडीत अडकायला .म्हणतात ना ऐकटा जीव सदाशिव.


कोण परकं कोण आपल कळायलासुद्धा काही अघटीतच घडाव लागत. ज्याला आपण आपल मानतो तो आपल्याला मानलच अस नाही.कलियुग आहे म्हणतात ते हेच ! दान करायला दानत लागते अन दान घ्यायला पण मोठ मन.


मी ते दान म्हणून स्वीकारल होत. माझ्या परीन खूप प्रेमाने संभाळल होत. मी माझं कर्तव्य पार केलं कोण कमी पडल कोण चुकलं सासरकडच्या त्यांचं काळीज माझ्याकडं सोपवलं पण पुढ कधी समजवताना चुक झाली. म्हणतात ना बाळाचे कान सोनाराने टोचावेत ते ठीक होतं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational