आपली माणसं
आपली माणसं
खूप अंधार झाला होता किर्रर करणारी रात्र झोपु देत नव्हती.दिवसामागणं दिवस जात होते मनातुन विचार जाण्यास तयार होत नव्हते, दररोज रात्रीचा एक वाजला की जाग आलीच समजा .मग तिथुन पुढे चालु होतो विचारांचा खेळ "अस का झाल" एवढ आपल प्रेम होत मग शेवटच्या क्षणाला तीने माझा विचार का नाही केला.उत्तर शोधता शोधता नाकी नऊ आले विचारांची परीसीमा ओलांडली "माझच चुकल का नवरा म्हणुन जर ती मला समजु नाही शकली " कि बायको म्हणुन मी समजु नाही शकलो"|
अनआकलनीय गुढ ते तसच ....
आपली माणस आपली का नाही होऊ शकत , जर प्रेम मनातुन असेल तर त्याला कळतात कोण आपल अन् कोण परक? काही विचार मनाला झोपु देत नाही जोपर्यंंत सत्य समजत नाही.
आज घटना होऊन तीन आठवडे ऊलटुन गेले पण का? .... नाही पटत मनाला अस कस होऊ शकत ? दिलीप बोलत होता एवढ सगळ मनासारख असताना कधी शब्दान न बोलणारा तु सगळ विचार केला न मला नाहि समजत का? कोनता नवरा बायकोला जेवन बनवुन देतो ह्या जगात ?जे म्हणल ते कधी विचार नाही केला अाई च्या विरोधात जाऊन सगळ्यांच मन जपुन वागत होतास.
जीवनात संकट अालीच पाहिजेत त्याशिवाय आपल कोण आणि परक कोण कळत नाय . कोन कोनाच असत ह्या जगात सांगा तुम्हिच जीच्या साठी जगत होता तिनच सोडुन दिल तर काय राहिल ज्या व्यक्तिला माणुस म्हणुन जगात जगता आल त्याच ह्या जगात सोन झाल .जगात येऊन माणुस जगण्यासाठी किती धडपड करतो ज्याला हात नाय ज्याला पाय नाय डोळा नाय तरी माणुस जगतोच ना ! ज्याला सगळ असताना तो मरनाचा विचार करतो तो म्हणजे माणुस म्हणुन जगण्याचा लायकच नाही या भुतलावर .
आज काय आणु पगडे ? नको काही मला तुम्ही या लवकर बर.विचार माणसांना जगु देत नाही तुम्ही कसा विचार करता तस तुमच मन पन् बनत जात खुप खाईत.समजुन सांगुन माणुस त्याच वाटेवर जात असेल मनात फक्त तेच विचार असेल मला जगण्याचा खुप कंटाळा आलाय ,सगळे मरुन गेले पाहिजे ,हे जर विचार वेळोवेळी कोनाच्या मनात येत असतील तर ध्यानात ठेवा हि व्यक्ति depression च्या वाटेवर आहे,हे मला आता उमगायला लागल होत.कुठ चुकल समजायला लागल होत ।
माणुस मनातुन जर का तिरस्कार भावनेने बघायला लागला ना तो त्यामधुन बाहेर नाही पडु शकत तो त्याच्या सोयीनुसार बघायला लागतो.तो मला अाता पहिल्यासारख वागत नाही का? दुर राहण थोड बोलण कमी करण .जीथ संवाद संपतो ना तीथ नात संपत चालल असत .म्हणतात ना टाळी कधी ऐका हाताने वाजत नाही संसाराचा गाडा चालवायचा म्हटला की दोन्ही चाक फिरली पाहिजेत दोघांनी समजुन घेतल पाहिजे कुठ माघ घ्यायच कुठ पुढ जायच कळ ल पाहीजे.नुसत शारिरीक नाही तर मानसिक बदल ही खुप महत्वाचा आहे.
आपली कोण परक कोण जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत माणुस अधांतरीच असतो ना तो आपल्या स्वकियांचा होऊ शकतो ना आपल्या प्रियजनांचा।
आपल्या माणसांपासुन जर तुम्ही काही लपवत असाल तर तुम्ही जगातील खुप मोठे पापी म्हणाव लागेल.कोणतीही गोष्ट जीवनातली संवादाच्या रुपाने बोलकी केली पाहीजे,कुठ चुकतय ते सापडत जात त्याला उत्तर सापडली जातात.
तुम्ही असाल जर भुतलावर तर प्रत्येक गोष्टीला option आहे .मन भक्कम बनवा जीवनात कोनती ही घटना घडो शेवट आहेच ना तीला कोनतीच गोष्ट परमनंनट नसते तीला ही अंत असतो.
आज खुप मनात कालवाकालव झाली होती.काय करावे सुचत नव्हते पगु च चेहरा डोळ्यासमोर जात नव्हता.माझ माणुस मलाच का विसरल राहुन राहुन तेच विचार . . . . . . . .
नको विचार करत जाऊ सागर तु विसरुन जा । कस विसरु आपल्या माणसांना .कसली आपल माणसं तु चुकलास सागर माणस ओळखायला .
नाही मी कुठ चुकलो माझ्या परिने मी जेवढे खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा तेवढा केला मी.
सागर प्रत्येक व्यक्ती काही ना काही आपल्या पासुन लपवत असतो तो मग आपला कोनी हीअसो नाय ग मने काहीतरी चुकतंय . मी सगळ काही मनातल पगु ला सांगत होतो मन साफ होत त्यामुळ कधी वाटलच नाय की ती आपल्या पासुन लपवत असेल.
का अस वागतात आपली माणस का? कुठ चुकल माझ ! तुला depression चा त्रास होता तर का नाही सांगु वाटल तुला सागु ला तु परक करुन टाकल होत मनोमनी सांगू आपला नाही राहिला अस तिल वाट त राहिल पन् नाही वाटल कधी विचारमंथन कराव! अस का ?का देवा नशिब माझ फुटक का ?थोड्या थोड्या गोष्टिवरुन चिडत असे पण कधी नाही तुला त्रास दिला .पगु अस नाही तस समजुन घे . हा सागरु मी प्रयत्न करते पण नाही जमत यार मला .
मनोमनी खचनारे माणस बाहेर काढण खुप अवघड असत.त्यांची negativity ईतकी वाढलेली असते त्यांना आपली माणस परकी वाटायला लागतात.माणसच माणसाची दुश्मन वाटु लागतात मग विषय जातो शेवटाकड . . . . . .
आज स्वप्नात पगु आली होती .शांत बसली होती माझ्याजवळ मी बोलतोय माझी पगु आली पन् नाही कोनाला विश्वास बसला.तसच नाजुक धारदार पाणीदार डोळे ओठ .कसे दिसते सागु
मस्त च ना पगु . . . . . .
नको बोलु माझ्यासोबत तु . . . . .
मुकलीस तु मला . . . .
एकट पाडलस मला . . . .
कस लाज नाही वाटली तुला मला सोडुन जाताना. . .
शब्द बोलु नकोस माझ्याशी. . . .
सागु ऐका ना ! sorry ना . . .
"आपली माणस " नाही?
