Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

3.5  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

कोरोना जगातील चमत्कारीक आजार

कोरोना जगातील चमत्कारीक आजार

3 mins
88


चीन देशातून बाहेर पडलेला वायरस म्हणजे कोरोना होय. हा आजार इतका जीवघेणा आहे की दुर्लक्ष केल्यास तो वाघाच्या जबड्यात आपली मान म्हणजेच मृत्यु होय.जगात या आजाराने इतका हाहा:कार माजवला की त्याला नियंत्रणात आणणे महासत्ता असलेल्या देशाला सुद्धा जमले नाही.त्या देशात मोठ्या प्रमाणावर जीवीतहानी व वित्तहानी झाली.आर्थिक संकट जगात आले.जगात आर्थिकमंदी प्रचंड वाढली.


अनेकांनी या आजाराचे अनेक महिने संशोधन केले;पण कुणालाही त्याचे निदान करता येत नव्हते.अनेक देश जागतिक आरोग्य संघटना (WHO)सुद्धा वेगाने कामाला लागली.अनेक देशांना ही प्रत्यक्ष जैविकहानी परवडणारी नव्हती. मानवाला वाचविणे नियंत्रणाबाहेर जाऊ लागले.अनेक देशात मृत्युचे सडे पडले.साधनसामुग्री कमी पडू लागली.ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला.व्हेन्टिलेटर कमी पडू लागले.अनेकजण भीतीपोटी कोरोना चाचण्या करू लागले.काहींना कोरोना शापित वाटू लागल्यामुळे अनेकजण तो आजार लपवू लागले.आपली बदनामी होईल म्हणून ते नातेवाइकांना सांगत नव्हते.त्यामुळे संसर्ग असलेला हा आजार अनेक रोगांचा एकत्रित मिलाफ होता.कुटुंब त्याला बळी पडू लागले.भीती,चिंता यामुळे गरीबकुटुंबे खाजगी दवाखान्यात भरती होऊ लागले. त्या आजारामुळे अनेक जन कर्जबाजारी झाले.


अनेकांच्या नोकऱ्या सुटल्या.कोरोना पैसे कमावण्याचे साधन झाले.एकीकडून कुटूंबाचा मासिक आर्थिक खर्च,त्यात नोकरी गमावलेली व त्यात कोरोनाच्या विळख्यात सापडलेले सामान्य कुटूंब कर्जबाजारी होऊ लागले.घरभाडे थकले होते.रेशन संपले होते.त्यामुळे मिळेल त्या साधनाने गरीब मजूर,नोकरदार कुटूंबे शहर सोडून गावी जाऊ लागले.काहीजण पैसे नसल्यामुळे पायी,पायी चालत होते.त्यांच्यासोबत त्यांची लहान मुले होती. वाटेत काही जन पाणी,जेवन द्यायचे तर काहीजण कोरोनाच्या भीतीमुळे प्यायला पाणी देत नव्हते.मग एखाद्या तलावाजवळ पाणी प्यायचे.तिथेच कपडे धुवायचे.रात्र काढायची व परत प्रवास करत होती. काहींची रक्तांची नाती त्यांच्या या कोरोनाच्या ऐकण्यामुळे त्यांची साधी चौकशी सुद्धा करत नव्हते.

अनेकांची वडिलोपार्जीत शेती व घर होते.पण त्यांना गावात प्रवेश नव्ह्ता.चौदा दिवस गावातील सार्वजनिक ठिकाणी रहावे लागायचे.त्यानंतर त्यांना घरी गेली की घरात भाऊ व इतर लोक अक्षरशः हाडतूड करत होती.तुच्छतेची वागणूक देत होते.ज्या चाकरमान्याना वर्षानुवर्ष आपली वाटत होती


त्यांनी वेगळाच रंग दाखवायला सुरुवात केली.सख्खे भाऊ सख्ख्या भावाना घरात येऊ देईना.गावात नेहमी असलेली माणुसकी संपलेली होती.गावातील लोक शहरातील लोकांकडे संशयाच्या नजरेने पाहत होते.नेहमी आपुलकीने बोलाविणारी माणसे दारे बंद करू लागली.काही लोक, आपल्याकडे शहरातील माणसे येऊ नये म्हणून गावाच्या वाटा बंद करू लागले.खेडेगाव व तेथील माणसे,नातेवाईक काय आहे हे शहरातील मध्यमवर्गीय माणसाला कोरोनाच्या संकटातून कळून आले.गावात भावाभावांच्या जमीनीवरून व घरामुळे वाद सुरु झाले.अनेक कुटूंब वेगळी झाली.जीवापाड प्रेम करणारी नाती संपली. साधे पाणी कोणी कुणाला पाजेना तर जेवण दूरच राहिले.त्यामुळे अनेक कुटूंब उपाशी मेले.काहीनी आत्महत्या केल्या.त्या काळात काही समाजसेवी संस्था पुढे आल्या व त्यांनी गरीब कुटुंबाना उपासमारीतून वाचविले.ज्यांच्याकडे अती पैसा होता तो घरात ठेवला;पण गरीबांची पोटाची खळ्गी भरेल एव्हढे अन्न दिले नाही.


अनेक लॉक डाउन झाली.नियम,शिस्त लागू झाले.परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली. कोलमडलेली दळणवळण व्यवस्था पूर्वपदावर येऊ लागली;पण धोका अजूनही टळलेला नाही. आपला रोजगार टिकावा व कारखाने, कंपन्या चालू रहाव्या यासाठी कोरोनाकाळातील नियम पाळावेच लागेल.मास्क अती गर्दीच्या ठिकाणी वापरावे.समूहात एकत्रित न जाने.घरातच आयुर्वेदीक उपचार सर्वांनी करावे.ते उपचार आहारातील पदार्थच असावेत.गरम पाण्याने अंघोळ केली पाहिजे.गरम पाण्यात लिंबू रस पिणे,आदरक रस चमचाभर,काळीमिरी चूर्ण 2मिलीग्राम व मध दोन चमचे असे एकत्रित मिश्रण आठवड्यातून दोन दिवस घ्यायला काहीही हरकत नाही.गर्दीच्या ठिकाणी काम नसेल तर टाळावे.कोरोना लस प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे.आजार लपवू नका.उलट कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सन्मान करा.अनेक आजार असलेल्या व्यक्तीला कोरोनाचा धोका अधिक आहे.त्याला वयाचे बंधन नाही.तो कोणत्याही वयात अनेक आजार असलेल्या लोकांशी मृत्यू लवकर येण्यासाठी मैत्री करतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational