कल्पनिक पत्र
कल्पनिक पत्र


रंग महाशय...
सप्तरंगी कमान..
रंग लाल, पिवळा, निळा, हिरवा अशा अनेक रंगांनो तुम्हाला मनःपूर्वक नमस्कार...
आज जीवनात विविधरंगी कमान आहे त्यामुळे जीवन सुखकर झालेय.
निसर्गातील पानांचे,फुलांचे,भाज्यांचे किती विविध रंग पाहायला मिळतात.सृष्टी ही सप्तरंगात नहाली असल्याने जीवन पण सप्तरंगी रंगतदार झालेय.
आज तर रंगांनो तुमचाच सण आहे. मानव या रंगात रंगून गेलाय.खरेचच रंग जीवनात भरल्याने जीवन कसे आनंदाने भरून गेलेय.
रंग जीवनी
उधळले सृष्टीने
आनंद त्याचा
घेतला मानवाने..
लाल गुलाब
निळा वाडा,हिरवी गल्ली
गुलबकावली.....