Ajay Nannar

Romance Tragedy

4.1  

Ajay Nannar

Romance Tragedy

खर प्रेम

खर प्रेम

3 mins
832


माझाही या डोळ्यातसुद्धा पाणी आल लिहिताना.......????? आवडले तर कमेंट लिहा.


आज पहाट जरा मस्तच भासत होती,

त्यालाही जराशी धुंदी चढली होती, बाहेर पाउस रिमझिम पडत होता,

वाराही कुंद जाहला होता......


 तो आज खूप खुश होता, अगदी मनातून भारला होता....

कारणही तसच होतं, आज तिच्या अन

त्याच्या लग्नाला एक वर्ष झालं होत...


ती तर त्याहुनही खुश होती,

अगदी मनाच्या हिंदोळ्यावर झोके घेत होती,

लग्नाला एक वर्ष तर झालंच होत, पण

ती त्याला आज "गुड न्यूज" देणार होती.....


सकाळी नाश्ता चालला होता,

तिने आज,

मोगरा माळला होता आणि सुवास

मंद दरवळत होता.....

तिने आज त्याचे आवडते बटाटे

पोहे केले होते,

तोही प्रत्येक घासाबरोबर

तिला डोळे मिटकावून दाद देत होता.....

त्याच्या आईलाही हे कळत होत,

ती पण मुद्दाम

मधेच खाकरून त्यांचा नजरभंग

करत होती.....

आणि तो अगदीच प्रेमाने तिच्या हातावर मधेच

एखादी थाप मारत होता...


संध्याकाळी आईकडून त्याने खास

  "परमिशन"

घेतली होती,

आईनेही अगदी हसून

ती दिली होती....

"इविनिंग शो" ची दोन तिकिटे काढली होती,

मग घरी तिघांचा डिनर असा मस्त बेत ठरला होता,

दोघे भलतेच खुश होते, आई देखील त्यात सामील

झाली होती....


दृष्ट लागू नये असा त्यांचा संसार होता, पण

संसाराच काय

त्याला कधी कधी प्रेमाचीच

दृष्ट लागते.....


त्याने पैसे वाचवून हफ्त्याने तिच्यासाठी स्कुटी बुक

केली होती, तिला ऑफिसला जायला गर्दीत

त्रास होतो ना.....

तीही काही कमी नव्हती पाच महिने पैसे वाचवून

एक हिऱ्याची अंगठी घेतली होती,

जणू संध्याकाळी ती घेऊन एका हिरयावर

दुसर्या हिरयाचा कळस चढवणार होती.....

ऑफिस मधून संध्याकाळी एकमेकांना फोन केले,

तिने त्याला त्यांच्या सोनाराच्या दुकानासमोर

भेटायला बोलावले....

त्याला कळून चुकलं होतं काहीतरी महागडी भेटवस्तू

मिळणार, तो हि नवीन कोरी करकरीत

स्कुटी घेऊन

तिला भेटायला निघाला होता....


तो तिथे पोचला त्याने स्कुटी लपवून पार्क

केली, म्हटलं "सरप्राईज" देईन, ती त्याच्या आधीच तिथे पोचली होती,

आणि हिऱ्याची सुरेख अंगठी आपल्याच मुठीत

लपवली होती.....

तो क्षण आला दोघांची नजरानजर झाली,

त्याने तिला दुरूनच हात केला,

तिनेही त्याला हात हलवून प्रतिसाद दिला,

दोघे एक-एक पाऊल पुढे सरकू लागले....

ती तर दोन-दोन पावले उडी मारून चालत होती,

तो आपल्या नेहमीच्या हास्यात

तिच्यावरची नजर ढळू देत नव्हता....

दोघांच्याही मनात एक पूर्ण

वर्ष तरळत होतं,

आयुष्य भराची साथ हेच फक्त

दिसत होतं.....


ती पुढे आली दोघांमध्ये फक्त वीस-एक पावलेच

राहिली, ती वीस पावले पण आज

कोसभर वाटत

होती. पण अचानक तो मटकन

खाली बसला, काय

होतंय हेच त्याला कळत नव्हतं...


.... त्याचा कानाचे पडदे

फाटले होते?

नाही नाही धरणीकंपच

झाला होता,

कि आभाळ फाटलं वीज

पडली त्याला काही काही उमजत नव्हतं,

नाही नाही हा तर बॉम्ब-

स्फोट होता.....


क्षणभरात तो भानावर आला,सगळी कडे फक्त

धूर कल्लोळ आगीचे लोट

आणि अस्ताव्यस्त

भंग झालेली माणसे, त्याला त्याची "ती" कुठेच

दिसत नव्हती,

त्याची भिरभिरलेली नजर फक्त

तिलाच शोधत

होती... आणि त्याला ती दिसली ती तीच

होती का..?


साडी फाटलेली, अंग रक्ताने

माखलेलं,तिचं पूर्ण सौंदर्य रक्ताने

लपलेलं होतं, अंग-

अंग छिन्न-विच्छिन्न झालं

होतं.....

तो धावला जीवाच्या आकांताने

धावला, त्याने

तिचं डोकं मांडीवर घेतलं,,तिला जोरजोरात हाक

मारली, अजून

थोडी आशा दिसत होती तिने

डोळे उघडले.....


त्याचे अश्रू तिच्या गालावर पडत होते, तेच

अश्रू तिचा अबोल

चेहरा दाखवत रक्त दूर सारत

होते...

तो काही बोलणार इतक्यात तिने मुठउघडली,

आणि ती हिऱ्याची अंगठी जणू

काही खुलून

हसली...


तिने मुठ उघडली, त्याला काय बोलावं काहीच

कळत नव्हतं,तिच्या मुठीत ती चमकदार

अंगठी लकाकत होती,

जणू घे मला बाहुपाशात खुणावत

होती.....

तो रडत होता थांब थांब म्हणत

होता, पण

तिच्या डोळ्यातून अश्रू येत

नव्हते...

तिच्या चेहऱ्यावर होतं ते फक्त

हलकसं स्मित,

कदाचित मरणापर्यंत साथ

का हीच..?


तिने ती अंगठी हळूच त्याच्या हातावर ठेवली,

त्याने तीचा हात घट्ट

धरला होता,हळूच तिची मुठ बंद झाली फक्त

"टेककेअर"

म्हणून तिचे नाजूक ओठ बंद झाले,

पण

तिच्या चेहऱ्यावरच ते

जीवघेण "स्माईल" आजही तसच होतं,, तसच होतं......?


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance