Jyoti gosavi

Romance

3  

Jyoti gosavi

Romance

खाईन तर तुपाशी

खाईन तर तुपाशी

10 mins
2.1K


. खाईन तर तुपाशी


शैला एक मनस्वी मुलगी , एकदा एखादी गोष्ट मनावर घेतली की मग ती काळया दगडावरची रेघ मग कोणी कितीही डोके आपटले तरी ती आपले म्हणणे सोडत नसे. लहानपणी तिला पिवळा रंग आवडतो म्हणून सगळे ड्रेस पिवळेच, आपल्या मैत्रिणीचे बघून एकदा तिला शाळेत असताना बॉयकट करण्याची इच्छा झाली म्हणून ती आईच्या मागे लागली पण आई ऐकत नाही असे बघून तिने स्वतःच्या हातानेच वाकडेतिकडे केस कापले 

असच एक खूळ आता तिच्या डोक्यामध्ये भरलेलं होतं ते म्हणजे तिला डॉक्टरच नवरा पाहिजे होता मग त्यासाठी ती कितीही तडजोड करण्यास तयार होती. अगदी तिला कसला म्हणजे कसला देखील नवरा चालणार होता. अगदी काळा, बेंद्रा सुकडा ,मुकडा ,जाडा, भरडा ,गरीब ,अति गरीब कोणत्याही जातीचा नवरा तिला चालणार होता. फक्त त्याच्या नावापुढे डॉक्टर हे डिग्री असायला पाहिजे होती. शैलाच्या कुटुंबात जुन्या काळाप्रमाणे चार भावंडे होती, एक भाऊ, व दोन बहिणी, त्यात शैला मोठी पाठोपाठ दोन बहिणी व भाऊ शेंडेफळ होता. शैला स्वतः एम ए बी एड होती. मराठी विषय स्पेशल घेतलेला होता, तिच्या पाठच्या बहिणी देखील शिकत होत्या, पण हिच्या अशा विचित्र हट्टामुळे तिचे लग्न ठरत नव्हते कारण ज्याप्रमाणे शिक्षकाला शिक्षिका, क्लार्क ला क्लार्क, इंजीनियर ला इंजीनियर, तशी डॉक्टरला देखील डॉक्टरच बायको पाहिजे असते. तो जर एमडी असेल तर किमान एमबीबीएस बायको त्याला पाहिजे असते. त्यामुळे एम ए बी एड केलेल्या मुलीला डॉक्टर नवरा मिळेना. हळूहळू पाठच्या बहिणी लग्नाला आल्या आता मोठ्या बहिणींची लग्न झाल्याशिवाय पाठच्या बहिणींची लग्ने कशी काय करायची ,असा आई बापाला प्रश्न पडला सर्वांनी तिला समजावलं आपला हट्ट सोडण्यास सांगितलं पण ऐकेल तर ती शैला कसली? तिने सरळ आईला सांगितलं करून टाक यांची लग्न!

 त्यावर आई म्हणाली "अगं उद्या पाठच्या बहिणींची लग्न झाली तर तुला नवरा मिळणार नाही "लोक म्हणतील की तुझ्यातच काहीतरी खोट आहे .त्यावर "आई मला काही फरक पडत नाही त्यांना जर चांगली स्थळे आली असली तर त्यांचे लग्न करून टाका "मी मात्र डॉक्टर नवरा मिळाल्याशिवाय लग्न करणार नाही .शैला ने परवानगी दिली पाठीच्या दोन्ही बहिणींची उषा आणि मंजुषा यांची लग्न ठरली एका मांडवात उरकली. त्यांना चांगली स्थळे चालून आली मुला-मुलींची पसंती झाली दोन्ही मुलगे एकमेकाचे मावस भाऊ असल्याने एकाच मांडवात दोन्ही लग्न उरकण्यात आली.

 मुलींच्या सासरच्या मंडळींना शैला का लग्न करत नाही त्याची कारणमीमांसा सांगितली, व त्यांना देखील तिच्यासाठी डॉक्टर नवरा शोधण्याची विनंती केली. आता शैला साठी तिचे मित्रमंडळी ,नातेवाईक, यात अजून बहिणीच्या सासरच्या माणसांची वर संशोधन करण्यात भर पडली.

शैला तशी रसिक होती, तिला नाटक, सिनेमा, कला ,प्रदर्शन चित्रप्रदर्शन इत्यादी गोष्टी बघायला आवडत.कधी मैत्रिणीसोबत ,नाही मिळाल्या तर एकटीच जात असे.अशीच एकदा जे जे आर्ट गॅलरीला चित्रांचे प्रदर्शन बघण्यासाठी गेली होती. शैला तशी दर्दी होती त्यातील एक चित्र तिला खूपच आवडले त्यातील शुभ्र वस्त्रा तरुणी अर्धोन्मिलीत नेत्रांनी आपल्या प्रियकराची वाट पहात असलेली दाखवली होती , तिचा कमनीय बांधा चेहऱ्यावरचे प्रणयोत्सुक भाव  शैलाला खूपच आवडले. तीची स्वतःची अवस्था तशीच नव्हती का? तिला ते चित्र विकत घ्यावं असं वाटलं , बराच वेळ ती त्या चित्रापाशी रेंगाळली तिच्या शेजारी एक तरुण केव्हाचा तिच्याकडे बघत उभा होता .शैला होती तशी देखणी, गोरीपान, नाकेली, पाणीदार डोळे खरे तर इतर कितीतरी मुलांनी तिला मागणी घातलेली परंतु तिच्या डॉक्टर नवऱ्याच्या हट्टा पाई  सार अडलं होतं

का हो तुम्हाला हे चित्र फार आवडलेल दिसतंय 

हो ना ! ती उत्तरली 

" मला तर ते विकत घ्यायची इच्छा झालेली आहे "

मग समोरच्या काउंटरवर जाऊन चौकशी करा ना तो बोलला 

अरे हो माझ्या लक्षातच आलं नाही ती लगेच काउंटरवर गेली त्या चित्राची व चित्रकाराची चौकशी करू लागली मॅडम, त्याचे चित्रकार येथेच कोठेतरी आहेत त्यांचं नाव शशांक निमकर, काउंटरवर ची मुलगी बोलली , अहो ते पहा तुमच्या मागेच असे ती मुलगी म्हणेपर्यंत त्या पाठीमागच्या तरुणाने तिला हाताने गप्प राहण्याची खूण केली. त्याबरोबर ती गप्प बसली शैला मागे वळली तर, तो मघाचा तरुण तिच्या मागे उभा होता

चित्राची किंमत 50000 रू ऐकल्यानंतर शैलाचा चेहरा उतरला व ती परत फिरली, मॅडम तुम्ही किती पर्यंत घेऊ शकता? त्या तरुणाने विचारले मी जास्तीत जास्त 17000रु देऊ शकते ते पण मी आत्ता आणलेले नाहीत पण मी क्रेडिट कार्डाने पेमेंट करू शकते .

ठीक आहे घ्या ते चित्र तुम्ही सतरा हजारात तो बोलला

अहो पण त्याचा चित्रकार कोण त्याची नको का परवानगी घ्यायला ?

 अहो मॅडम तेच तर त्या चित्राचे चित्रकार आहे मी मघाशी तुम्हाला तेच सांगत होते काउंटर वरची मुलगी म्हणाली

 अय्या ! तुम्हीच आहात? मगाशी बोलला नाहीत कसे?

 अहो मॅडम मी जर आधीच सांगितले असते, तर तुमची एवढी सुंदर प्रतिक्रिया मला मिळाली असती का ? 

त्याने प्रतिप्रश्न केला माझ्या चित्राचा एवढा सुंदर चाहता मला मिळाला असता का ? त्याच्या या प्रश्नावर ती लाजली व गोरीमोरी झाली, कोणी पण आपली तारीफ तोंडावर केली तर माणूस गोरामोरा होतोच , त्यातून ही सुंदर तरुणी

 तिने ऑनलाइन पैसे भरले व त्याने स्वतः ते चित्र व्यवस्थित बॉक्समध्ये बांधून तिच्या हाती दिले 

"धन्यवाद मॅडम माझे चित्र घेतल्याबद्दल"

 अहो मी तुम्हाला धन्यवाद दिला पाहिजे ते माझ्यासाठी तुम्ही ही त्या चित्राची किंमत अर्ध्याहून कमी केलीत !

नुसतं एखाद्या पैसेवाल्यांच्या दिवाणखान्यात माझे चित्र जाण्यापेक्षा, एखाद्या रसिकाच्या हाती हे सोपवताना मला जास्त आनंद वाटला , माझी चित्रे  काही फक्त पैसे कमावण्यासाठी नाहीत, तो माझा छंद आहे! मी त्यात माझ्या भावना ओतलेल्या असतात ,त्यामुळे अशा रसिक व सुंदर चाहतीच्या हाती चित्र देताना मला आनंदच वाटेल!

 त्याने तिचा नाव व नंबर घेतला व आपला नंबर देखील तिला दिला. शैलाने ते चित्र घरी हॉलमध्ये लावले घरी येणाऱ्या प्रत्येकांनी त्या चित्राची तारीफ केली, शैला च्या रसिकतेला दाद दिली, कुठून घेतले ? कोण चित्रकार आहे ? इत्यादी विचारले अर्थात चित्राच्या खाली चित्रकाराचे नाव असतेच म्हणा

शेवटी न राहवून शैला ने एक दिवस त्याला फोन केला "अहो मिस्टर चित्रकार तुमचे चित्र सर्वांना आवडले बर का! सर्वजण तुमची तारीफ करत आहेत

 या देहाचे नाव चित्रकार नसून, शशांक आहे बरं का शैला! तो एकेरीवर आला

म्हणजे माझे नाव देखील तुम्हाला पाठ आहे तर आवडलेल्या व्यक्तीचा नाव आणि नंबर मी कधी विसरत नाही म्हणजे अशा किती लोकांचे नाव आणि नंबर तुम्ही पाठ केलेत?

 नाही गं फक्त तुझाच त्याने पॉज घेतला फक्त तुझाच नंबर पाठ केलाय मी तुझ्या फोनची वाट बघत होतो  

ए शैला भेटू या ना एकदा त्याचा स्वर आर्जवी झाला  

अरे पण मी कशाला भेटू? मला चित्र आवडलं तुम्हाला ते विकायचं होतं ते मी घेतलं , इतकाच आपला संबंध !

आता घरी सारेजण तुमच्या चित्राची तारीफ करत होते म्हणून मी तुम्हाला फोन केला

तरी पण माझी इच्छा म्हणून भेट ना एकदा तो काकुळतीला आला. तुझा फोन मला येणार असं माझी मनोदेवता मला सांगत होती शेवटी त्याच्या इच्छेला मान देऊन ती भेटायला तयार झाली दोघांची भेट एका मॉल मध्ये ठरली ,शैलाला त्याने पावभाजी व आईस्क्रीम खायला घातले

" शैला तुला खरं सांगू ? मला दिसल्या क्षणी तु आवडली होतीस! अगदी लव्ह अँट फस्ट साईट मी तुझ्या प्रेमात पडलो म्हटले तरी चालेल ! फक्त तू काय म्हणशील ? तुला काय वाटेल ? म्हणून मी काही बोललो नाही खरे तर पहिल्या भेटीतच असं काही कोणी सांगणार नाही .

जरा घाईच होते माझ्याकडून पण मी हा असाच आहे, मला जे काही वाटलं ते मी प्रामाणिकपणे बोललो, आता तू हो म्हण ,नाहीतर नाही म्हण तुझी मर्जी,

ये चित्रकार !, मी काही तुझ्या प्रेमाबिमात पडलेली नाही. 

तसा तू वाईट नाहीस म्हणा ! पण माझी डॉक्टर नवऱ्याची अट नसती ना ? तर मी तुझा विचार केला असता, पण मला डॉक्टरच नवरा हवा या अटीवर मी आजपर्यंत लग्न केलेले नाही. नाहीतर अशी कितीतरी स्थळे मला आली होती, पण मी ती नाकारली, पण आता हा माझा डॉक्टर कुठे लपलाय कोणास ठाऊक?

 असे बोलताना शैला जरा भावुक झाली, तिने आता वयाची पस्तिशी गाठली होती. पाठच्या बहिणींचे फुललेले संसार व त्यांची मुलेबाळे पाहून त्यांच्या नवरा-बायकोतील प्रेम पाहून शैला ला त्यांचा हेवा वाटे. तिला पण लग्न करावेसे वाटत असे ,पण लगेचच तीला आपल्या अटीची आठवण येई

छे, छे नवरा करीन तर डॉक्टरच, अन्यथा मी बिनलग्नाची राहीन खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी अशी तीची गत झाली होती तसे पण आई-बाबांनी तिच्या लग्न या विषयातून लक्ष काढून घेतले होते. आता एवढ्या मोठ्या पस्तिशीत आलेल्या मुलीला काय समजावणार?शिवाय नातेवाईकांनी देखील तिला स्थळे आणणे बंद केले होते. मात्र पाठीमागे सर्वजण तिची खिल्ली उडवत असत .मॅरेज ब्युरो मध्ये नाव नोंदवले होते पण तेथून देखील काही प्रतिसाद नव्हता. आज-काल तिला स्थळे चालून येणे बंद झाले होते. आज पर्यंत शैलाला देखील असं कोणी प्रपोज केलं नव्हतं , तिच्या सौंदर्याची तारीफ तिच्या तोंडावर कोणी केलेली नव्हती. कारण इथे आपली डाळ शिजणार नाही, तिला डॉक्टरच नवरा पाहिजे हे सर्वांना ठाऊक होतं

 ठीक आहे आपण चांगले मित्र बनू शकतो ना ? त्याने सुवर्णमध्य काढला, आपल्याच विचारात असल्यामुळे, तिच्या नकळत तिने मान डोलावली.

घरी गेली खरी, पण बाण वर्मी लागला होता त्याच्या विचारांची बीजे तिच्या हृदयात पेरली गेली.

शैला !आता बास झाल , किती दिवस तू अशी बिन लग्नाची राहणार ? डॉक्टर नवऱ्या पायी, आता तुझी पस्तिशी आली तू काही तडजोड करणारच नाहीस काय ? काय हरकत आहे शशांकच्या प्रपोजल वर विचार करायला ?

नाही! नाही !"मला डॉक्टरच नवरा पाहिजे माझे लहानपणापासूनचे स्वप्न आहे" उगीच काय मी इतके दिवस बिनलग्नाची राहीले तिचा स्वतःचाच स्वतःची संवाद सुरू झाला


शशांक तेवढ्यावरच गप्प बसला नाही तर घरी जाऊन तिच्या आई-वडिलांना देखील भेटला "अहो आमची खूप इच्छा आहे" तिने लग्न करावं चार मुलींसारखं संसार करावा पण तिच्या बालिश हट्टापुढे आम्ही हात टेकले आता जर ती तुमच्याने वळत असेल तर बघा! आम्ही खुशी खुशी ने तिचा हात तुमच्या हाती देऊ"

 आई बाबा असे स्वतःची मुलगी जड झाल्यासारखे बोलू नका आधी मुलाची माहिती तरी काढा मी स्वतः एम  ए बी एड आहे, एका नामांकित कॉलेजात प्राध्यापक आहे, सांपत्तिक स्थिती उत्तम आहे, घरी आई-वडील व दोन बहिणी आहेत. तुमची मुलगी मला आवडलेली तर आहे पण ती देखील माझ्या प्रोफेशनमध्ये आहे. चित्रकारी हा माझा छंद आहे, पोटापाण्याचा धंदा नाही .तुमची हो असेल तर तिला कसं वळवायचं ते मी बघतो.

तो अधून मधून तिला फोन करत राहिला साध्या साध्या विषयांवर गप्पा मारत राहिला आणि एक दिवस त्याने अचानक फोन करणे बंद केले. शैला आता त्याच्या फोनची वाट पाहू लागली त्याचा फोन येत नाही म्हटल्यावर तिची चिडचिड झाली शेवटी न राहवून एक दिवस तिने त्याला फोन केला त्याला हेच अपेक्षित होते तो असा तसा नव्हता तर मानसशास्त्राचा प्राध्यापक होता समोरच्याला कसे हाताळावे, त्याची सायकॉलॉजी कशी जपावी हे त्याला चांगलेच अवगत होते. पण आज पर्यंत तोदेखील कोणाच्या प्रेमात पडला नव्हता जसा काही आजपर्यंत शैला साठी थांबला होता.

हळु हळु दोघांच्या गाठीभेटी वाढल्या पण अजून शैला च्या तोंडून हो म्हणून येत नव्हते तिचे डोळे हो म्हणत होते व त्या डोळ्यांची भाषा त्यांला चांगलीच अवगत होती. त्याने तिच्या कलाने घ्यायचे ठरवले. तो शैलापेक्षा दोन वर्षांनी लहान होता पण त्याचा समंजसपणा मात्र मोठा होता. शैला तू माझ्याशी लग्न करशील का? त्याने डायरेक्ट विचारले हे बघ मी पहिल्या भेटीतच तुझ्या प्रेमात पडलो असल्याचे तुला सांगितले आहे ती गप्प बसली हो नाही आणि नाही पण नाही तिचे गप्प बसणे हिच तीची मूकसंमती समजून त्याने त्याच्या घरच्यांनी आई-वडिलांनी साखरपुड्याची तारीख ठरवली.

 कसं का होईना पण घोड गंगेत नहातय ना ? यातच त्यांना समाधान होते मंडळी तयारीला लागले हॉल बुक केला सर्व तयारी केली तरी पण शैलाच्या मनातील डॉक्टर काही जाईना ती थोडी गप्प गप्पच होती आई बापाने किंवा शशांकने देखील याबाबत तिला छेडले नाही हॉल नातेवाईकांनी गच्च भरला होता 

"अग्गोबाई " अखेर शैला तयार झाली का लग्नाला ? मिळाला का डॉक्टर नवरा ? अहो कसला डॉक्टर आता वयाची पस्तिशी आली डॉक्टर ची वाट बघत बघत म्हातारी झाली असती मग झाली एकदाची तयार खुळचट कुठली! अशी कुजबूज नातेवाईकांमध्ये चालू होते लाल रंगाच्या शालू मध्ये नथ वगैरे घालून केसांची लेटेस्ट स्टाईल, मेकअप, या सर्वांनी शैला एकदम खुलून दिसत होती हॉलमध्ये सनईचे सूर चालू होते सुगंधित सुगंधी गुलाब पाणी फवारले जात होते 

ऑफ व्हाईट कलरच्या शेरवानी मध्ये शशांक देखील एकदम राजबिंडा दिसत होता आज-काल साखरपुडा म्हणजे दुसरे लग्न असतं फक्त मंगळसूत्र व सप्तपदी सोडता सारे विधी करतात. दोघांचा जोडा अगदी लक्ष्मीनारायणासारखा दिसत होता सर्व पारंपारिक विधी झाल्यानंतर दोघांना शेजारी शेजारी राजाराणीच्या खुर्चीत बसवले आता एकमेकांना अंगठी घालायची होती पहिली शैलाने त्याच्या बोटात अंगठी घातली व पेढा भरवला लोकांनी टाळ्या वाजवल्या त्यानंतर आता त्याची पाळी होती पण अंगठी घालण्या ऐवजी त्याने तिला डोळे मिटण्यास सांगितले मी तुला आता एक सरप्राईज देणार आहे सर्वांना वाटलेआता हे आणखी काय नवीन फँड? आजकाल काही भरवसा नाही बाबा नवीन पिढीचा! सर्वांना वाटले एखादा दागिना असणार. एका तबकामध्ये एक कागदाची गुंडाळी होती त्याने हळूहळू शैला च्या तोंडासमोर उघडली सर्वजण श्वास रोखून काय आहे ते बघत होते शैला आता डोळे उघड त्याने ऑर्डर दिली, त्याबरोबर तिने हळूहळू आपले डोळे उघडले व त्याच्या हातातला कागद वाचतात तिचे डोळे आनंदाने विस्फारले. त्यातच गुंडाळलेले हिऱ्याचे नेकलेस त्याने तिच्या गळ्यात घातले काय झाल? काय झाले? काय आहे ?आम्हाला देखील दाखवा नवीन पिढीचे प्रेम पत्र आहे का ? ते कसं असतं ? आम्हाला देखील पाहू द्या लोकांनी एकच गलका केला .

तुम्हाला तर सांगितलेच पाहिजे या घटनेचे तुम्ही साक्षीदार आहात, असे म्हणत त्याच्या मित्रांनी त्याच कागदाच्या झेरॉक्स सर्वांना वाटले सर्वांनी ते वाचल्यावर कुणाचे डोळे कुणी आनंदाने हसू लागले तर आता मी दोन शब्द बोलतो शशांक म्हणाला या शैला ला डॉक्टर नवरा पाहिजे होता, मंडळी, हो मी डॉक्टरच आहे! पण औषधे देणारा किंवा ऑपरेशन करणारा डॉक्टर नसून मी सायकॉलॉजी मध्ये एम ए पी एचडी केलेल आहे त्यात ह्यूमन सायकॉलॉजी या विषयावर मी डॉक्टरेट मिळवलेली आहे. त्यामुळे मी माणसांची मने वाचणारा , बरी करणारा , डॉक्टर आहे म्हणूनच मी तिला कन्व्हेन्स करू शकलो आणि आज माझ्याकडून तिला सरप्राईज !

त्याच्या या बोलण्यावर सर्व मंडळी मी मंडळींनी जोरदार टाळ्या वाजवल्या 

काय रे शशांक तुला आधी सांगायला काय झालं होतं ? तू म्हणजे ना अगदी अस्सा आहेस  शैला लाडीकपणे बोलले आता अगदी अस्सा म्हणजे कस्सा हे समजायला पुरुषच व्हाव लागतं अशा रीतीने शैलाची अट पूर्ण झाली आणि शशांकला मनपसंत बायको मिळाली


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance