STORYMIRROR

swati Balurkar " sakhi "

Romance

3  

swati Balurkar " sakhi "

Romance

केली पण प्रीती - भाग ८

केली पण प्रीती - भाग ८

7 mins
1.9K


कथा पुढे-----

त्या दिवशी ऑफिसमधून निघताना हर्षा केबिनमधे आला आणि म्हणाला,

" सर तुमच्या कडे इतका छान फोन आहे ना ! मग तुम्ही त्यात fb अॅप डाउनलोड करून घ्या , म्हणजे तुम्ही केव्हांही वापरू शकता."

"अरे बाबा नको. घरात असताना बायको आणि लहान मुलगी , दोघी पण वापरतात माझा फोन." माझं कारण मला माहित होतं.

"मॅडम ला दुसरा फोन घेउन द्या ना !काय सर

तुम्ही पण?" हर्षा चा उपदेश!!

"हर्षा ,माझ्या घरचं मला माहित. कितीदा म्हटलं तरी मॅडम ऐकत नाही. साधा डब्बा फोन वापरते तीे आणि घरी गेल्यावर माझा फोन वापरते. जाऊ दे ना कशाला डोक्याला ताण.! मुलींना पण दुसर्‍या मुलींसारखं इतकं वेड नाहिय फोनचं. "

"बरंय! तुम्ही लॅपटॉपच वापरा मग" तो हसला.

"पण थँक्यू बरं का रे"

"कशाबद्दल सर"

"एवढं शिकवलंस मला आज"

"सर त्याचं काय इतकं? तुम्हांला उद्या नवीन फेसबुक अकाउंट उघडून देईन तेव्हां थँक्यू म्हणा."

हर्षा मोठ्यांदा हसला .

"ओके! डन"

तो गेला .

पण मला आजचे शरयुला पाहण्यासाठी केलेले प्रयत्न काहितरी दिव्य केल्यासारखे वाटले.

इतक्या वर्षाँनंतर आयुष्यात काहितरी एक्साइटमेंट !!

खूप वर्षाँनंतर असं काहितरी वेगळं होत होतं.

मला छान वाटत होती ही फीलिंग !

तिचा चेहरा आठवत होतो , नकळत मन जुन्या चेहर्‍यांशी तुलना करत होतं.

फोटो मधे किती छान आणि सालस हसु चेहर्‍यांवर.

ऑफिसमधुन निघालो पण मनात तिचा चेहरा आणि तिचे विचार घोळत होते.

मनातल्या प्रतिमा कशा पक्क्या होऊन जातात.

शरयु मला जुनीच आठवते. नव्या शरयुचा फोटो पाहुनही मनात मात्र ती जुनीच प्रतिमा.

मी बदललोय , मालू बदललीय, काळानुरुप माणसं बदलतात ! शरिराने , कधी विचाराने , कधी मनाने .

मग शरयु तशीच असेल हा अटाहास का ?

तिला नुसतं पाहिलं तरी मला भेटल्याचा फील आला.

दोन दिवस मी त्याच आत्मिक आनंदात होतो.

मनातल्या मनात विचार करत होतो , कुणा सोबतच माझ्या भावना शेअर करू शकत नव्हतो.

.

पण माझ्या चेहर्‍यांवर एक तेज़ आलं होतं.

ते लपत नव्हतं .

मी खुश दिसत होतो , खुश रहातही होतो.. सगळे जण ते नोटिस करत होते.

कुणी कुणी विचारलही '" क्या बात है? चमक रहे हो अाजकल! "

"छान दिसताय "वगैरे पण. माझ्यासारखा सावळ्या रंगाचा माणुस चमकणार काय अन छान काय दिसणार या वयात.?

पण काहितरी छान होतं आत कुठेतरी.

आता मात्र तीव्रतेने तिला भेटावसं वाटत होतं.

हर्षाने फेसबुकचं अकाउंट उघडून दिलं एक दिवस, वेगळ्या नावाने पण. .

तिला रिक्वेस्ट पाठवण्याची हिम्मत झाली नाही.

मेसेंजर वापरण्याची पण भीती वाटायची.

लॅपटॉप मधे रोज तिचा फोटो एकदातरी बघण्याचा नाद लागला होता मला.

तेवढाच माझ्या अकाउंटचा उपयोग.

एकदा तिच्या अकाउंटवर रीमा दिसली, मित्र यादित. छान वाटलं !

कसली पॉश झाली होती अमेरिकेत जाऊन.

असेच काही दिवस गेले. रुटिनमधे पडलो. शरयूचा विसर पडला होता.

एक दिवस दुपारी जेवणासाठी घरी येत होतो.

पायर्‍या चढत होतो फोन वाजला ,अननोन नंबर होता.

"हॅलो , नाईक हियर" मी.

"श्रीधर तुम्हीच बोलताय ना " गोड आवाज आला.

"हो मीच . कोण??"

"मी शरयु ! शरयु पोतदार."

"अगं तू आता कसा काय कॉल केलास?"

"बिझि आहात का "

"बिझि नाही पण घरी पोहोचलोय जेवणासाठी."

"आता ३ वाजता ??"

"माझी कसली वेळ नसते गं . कामात पडलो कि काही नसते. पण प्लीज समजुन घे शरयु . मी आता नाही बोलु शकत. मी पुन्हा कॉल करेन. "

"ठीक आहे . इट्स ओके!" तिने पटकन फोन ठेवला.

खिशात कागद - पेन नव्हता .

नंबर मला लवकर पाठ होत नाहित.

दुसर्‍या हातात फाइल्स ची बैग होती.

घराच्या दोन पायर्‍या बाकी होत्या.

मी नंबर पाहिला , शेवटचे तीन अाकडे लक्षात ठेवले आणि कॉल लॉग डिलिट केला .

अन घराची डोर बेल वाजवली.

सुहास्य वदनाने मालूने दार उघडले. फोन आणि बॅग तिच्या हातात दिली अन फ्रेश व्हायला गेलो.

"का रे श्री , आज उशीर झाला ? तुलाच कॉल करणार होते आता. रोज तू कॉल करतोस ना येण्यापुर्वी ?"

"हो गं बिझि होतो खूप. बाहेर विजिटला गेलो होतो तसाच जेवायला आलो होतो."

मस्त ताट वाढलेलं होतं .

जेवायला बसलो पण राहुन राहुन खंत वाटत होती.

एकदा शरयु शी बोलू शकलो असतो तर बरं झालं असतं.

त्यानंतर ५-६ महिने असच होत राहिलं.

कधी कधी तिचा फोन यायचा पण माझं किंवा तिचं दुर्दैव ?!!

नेमकं तेव्हा मी घरी असायचो किंवा मग कुठल्या कार्यक्रमात फॅमिलीसोबत.

कधी प्रवासात , कुणीतरी सोबत असताना.

मी राँग नंबर म्हणून ठेवून द्यायचो.

या दरम्यान तिचं एक आवडलं मला, ती करायची , फोन कुणीही उचलला कि विचारायची "हाय सोनू ,कशी आहेस?"

म्हणजे सेफ रहायचं , कुणी असलं तर रॉंग नंबर म्हणायचे.

शेवटचे तीन नंबर ७८९ दिसले कि अंदाज यायवा कि तिचा फोन असेल. वेळ असेल तर बोलायचो नाहितर ठेवून टाकायचो.

यावर्षी माझ्या वाढ दिवसाला मला सकाळपासुनच धडधड व्हायला लागली.

जर तिला लक्षात राहिला माझा वाढदिवस आणि तिने नको त्या वेळेला कॉल केला तर कसं?

मी सुट्टी टाकली होती. फोन

दिवसभर मालूच्या निगराणीतच होता.

शरयुचा फोन आला पण मालू किचनमधे चहा आणि नाश्ता बनवत होती तेव्हा.

तिने विश केलं . मी थँक्यू म्हणालो., पुन्हा बोलतो. घरी आहे.' बस्स. इतकच.

कॉल डिलिट केला व रिलॅक्स झालो.

मी हळूहळू हे शिकत होतो.

माझे मित्र याबाबतीत खूप हुशार!! पण मी मित्रांच्या संपर्कातच नव्हतो.

मी आता हे सारं मॅनेज करायला शिकत होतो.

स्वतःची कंपनी सुरु केल्यापासुन वेळच नसतो मला मित्रांसोबत घालवायला.

कंपनी आणी परिवार एवढच माझं विश्व.!

माई नाना थकले होते आता . दादाकडे असायचे. कधी कधी २-४ महिने येवून राहायचे माझ्याकडे. कधी सणावाराला यायचे. मालूने छान अॅडजस्ट केलं होतं त्यांच्याशी.

* * * * * *

एकदा सकाळी माझा वीक अॉफ होता. मस्त आरामात पडलेलो होतो . तेचढ्यात सईचा फोन वाजला. (सई, माझी मोठी मुलगी. )

गौरी २ असं नाव पाहिलं . सई आली नाही , बहुतेक फ्रेश होत होती. मग काही अर्जंट असेल असं समजून मी फोन उचलला.

तिकडून मुलाचा आवाज आला." हाय सई, उद्याच्या सेमिनारचं काय झालं.? किती वाजता निघायचय आपल्याला?"

"हॅलो कोण बोलतंय ? "मी म्हणालो

हॅलो काका, मी गौरव बोलतोय. सईला फोन द्याना थोडं काम आहे."

"अरे ती फ्रेश होतीय."

"ठीक आहे काका ,तिला कॉल बॅक करायला सांगा. बाय" फोन कट झाला.

मी फोन ठेवला इतक्यात सई आली.

"कुणाचा कॉल होता का बाबा?"

"हो गं !. पण एक सांग गौरी २ म्हनून नाव आलं आणि. . "

" गौरव बोलला ना तिकडून, म्हणजे तुम्ही फोन

उचलला?" सई चिडून म्हणाली.

"अगं पण?. . "

"काय बाबा तुम्ही पण!! हळू बोला ना !आपला हिटलर ऐकेल. " ती वैतागुन म्हणाली.

"हे काय सई हिटलर???" मी आश्चर्यात पडलो.

"आपली आई हो.!! हिटलर. ? मी अाणि तेजु ने सेक्रेटली आईचं नाव ठेवलय आणि तो गौरवचाच नंबर आहे मी गौरी २ म्हणून सेव्ह केलाय. ओके. फोन द्या. उद्याच्या सेमिनारचं प्लॅन करायचयं.!"

"अगं पण असं का ?" मला खूप विचित्र वाटलं हे. मी माझ्या कामात गुंग असतो . मुलींचं सगळं मालूच बघते.

" बाबा तुम्हाला माहित नाही पण आई फार डोक्यात जाते . अहो ,हेरगिरी करते, पन्नास प्रश्न विचारते, मला नाही आवडत. वॉट्स अप चेक करते बाबा ती. आता काय मी लहान राहिले का? फोन चेक करते?? माझी काही प्रायवसी आहे कि नाही?"

सईला आज पहिल्यांदा वैतागुन बोलताना पाहिलं मी.

"पण बेटा तुझ्या भल्यासाठीच ना !! ती माझा पण फोन चेक करते!"

"हो करते कारण तुम्ही करु देता. तो तुमचा प्रोब्लेम आहे. तुमच्यावर तिला विश्वास नसेल. माझा फोन का ?"

"काय झालं सई? इतकं रूड बोलतीयस. अगं आईचं लक्ष हवं की नको मुलींवर?" मी.

"बाबा लक्ष असं ठेवतात का? मुलाचा फोन म्हटलं कि तिला शंका येते. अहो ५० क्लासमेट्स असतात. मग मी मित्रांचे नंबर मुलींच्या नावाने सेव करते. प्लीज तिला हे सांगु नका!!"

तिचं मला पटत होतं पण सवय लागली होती. मालूचही बरोबरच होतं.

"सई बेटा मालू काळजीपोटी करते ना हे?"

" बाबा मुलगा-

मुलगी बोलले कि तेवढच असतं का. मित्र, मैत्री असते कि नाही? तुमच्या कुणी मैत्रीणी नाहित का ? शाळेच्या , कॉलेजच्या? मग काय तुमच्यावर पण ती संशय घेते का? तुमचं तर लव्ह मैरिज ना बाबा ? मग तिला तुमच्यावर विश्वास नाही?? "

आता मात्र सई ने मूळ विषयाला हात घातला होता.

नशीब बलवत्तर म्हणून तेजु आणि मालू वरच्या हॉल मधे काहितरी कामात होत्या.

मला सईचं खरच पटलं आज. किती मॅच्युअर्ड विचार आहेत या पिढिचे!!

विसाव्या वर्षी तिला हे कळतय कि आई चुकतीय. आणि मी मात्र अजुनही तिच्या या नजर कैदेला कुटु्बाचं भलं समजून बसलोय .

"बाबा आईला काही बोलणार नाहित ना तुम्ही? " सई.

" नाही गं राणी. प्रॉमीस ! पण मग एक सांग , व्हाट्स अॅप कसं चालवतेस? अशा नावांनी?" मला खरच उत्सुकता वाटली.

" त्याचं काय बाबा आम्ही कुणीच डिपी आमचे फोटो कधीच ठेवत नाहीत. अॅक्चुअली असं आईसारखं कुणीच एवढी चेकिंग करत नाही. तरी ते दुसरे पिक्स ठेवतात . लक्षात राहतं कुणाचं कुठलं ते. आम्ही सगळे ईन्स्टाग्राम वर कनेक्टेड असतो.तिथेच फोटो वगरै शेअर करतो. "

"छान गं !! किती अडवान्स आहात तुम्ही लोकं. आमच्या वेळेला हे मोबाईल आणि हे अॅप्स नव्हते. पत्रांवर आणि लॅण्डलाईन फोनवर अामचे सगळे संपर्क!!" मला कौतुक वाटल तिच्या फ्री बोलण्याचं.

"बाबा तुमचं लव्ह मैरेज ना! मग तुम्ही कसे भेटलात एवढ्या बंधनात त्यावेळी? आणि अाई अशीच आहे का तेव्हंपासून?" सई दबकतच म्हणाली.

"राणी ' सांगेन कधीतरी आमची लव्ह स्टोरी तुला ! तू आता मोठी झालीस . आई फार गोड होती गं तेव्हा !! अशी नव्हती. !"

"बा बा sssssss" कसली ओरडली सई लाडात.

" ए sss जा अाता त्या गौरव ला कॉलबॅक कर जा " मी ओरडलो. ती पळाली.

मी दोन मिनिटे स्तब्ध झालो. या काळात , या वयात अापण बंधनात राहतोय असं वाटलं .मुलीकडून काहितरी शिकायला पाहिजे, मार्ग शोधायला पाहिजे.

मग मी ठरवलं , मला जर शरयुशी एखाद्या वेळी बोलावं वाटलं तर मी बोलणार इतकं का भ्यायचं? आता ४५ वर्षांच्या वयाला मी काय करणार आहे??

सईचं बरोबर आहे. प्रत्येकाला प्रायवसी असायला पाहिजे.

क्रमशः


Rate this content
Log in