swati Balurkar " sakhi "

Inspirational

2.5  

swati Balurkar " sakhi "

Inspirational

याह अल्लाह . .!

याह अल्लाह . .!

8 mins
1.6K


(प्रिय वाचकहो , ही कथा १९९१ - ९२ काळातली आहे त्यामुळे यात कुठेही सोशल मेडिया किंवा मोबाईल फोनचा संदर्भ येणार नाही. आशा आहे तुम्हाला आवडेल. धन्यवाद !)


याह अल्लाह !



शर्वरी सभागृहातून निघाली. स्वतःबद्दलचा एक अभिमान तिच्या चेहर्‍यावर झळकत होता. व्यासपीठांवरून खाली उतरतानाच तिला जाणवलं होतं कि या स्पर्धेचं बक्षिस तिच्या समूहाला मिळणार आहे. लोकांच्या टाळ्यांच्या कडकडाट ती आसनावर बसेपर्यंत गुंजत होता.

श्रोतावर्गाच्या भावावरून तिला हेच जाणवलं.

विषय होता जातीयवादाशी निगडीत . ती आणि अभिरंग किती सुंदर बोल ले होते! पूरक! पण या स्पर्धेच्या रंगल्याने एक झालं होतं कि वादविवाद स्पर्धा सहाच्या ऐवजी रात्री आठला संपली.

काळोखाने सर्वत्र आपले हात पाय पसरले होते. प्रत्येकांच्या शुभेच्छा स्वीकारत अन् कौतुकाचे बोल ऐकतच ती सभागृहातून बाहेर आली.

आई घरी काळजी करत असेल या विचाराच्या घाईगडबडीत अभिरंगला बोलणंही राहुन गेलं होतं .

सिटीबसच्या भरवशावरच ती बस स्टॉपवर आली. तो थांबा जवळच होता. तिथे पोहोचेपर्यंत तिला या गोष्टीचं आश्चर्य वाट त होतं कि सर्वत्र अशी शांतता कशी काय? कुठेच वर्दळ नाही कि गर्दी नाही. या सार्‍या आश्चर्यातच ती स्टॉपवर पोहोचली .

सगळी दुकानं बंद , सर्वत्र स्मशान शांत ता.!.

एकटी थंडीत उभी होती तरीही घामात निथळ ली होती.

इतक्यात तिकडून एक वयस्कर स्त्री एकटी च येत होती. तिला विचित्र दृष्टिने पाहत ती स्त्री हळुच म्हणाली-

"कुणाची वाट पाहतीयस पोरी?"

"काय ?"

"रात्रीची एकटीच कशाला उभी हायस इथं?"

" मावशी , सिटीबसची वाट पाहतीय. घरी जायला थोडा उशीरच झाला. . . मावशी एक सांगा , आज इथे एवढी शांत ता का अाहे.

तुला माहित नाही कि काय लवकर घरी जा पोरी होईल तितकं लवकर इकडच्या बसेसपण बंद केल्यात.

अहो पण झालंय काय?

अगं संध्याकाळी जुन्या शहरात केवडी भांडणं झाली. लोकांनी उगीचच जाती धर्मावर नेली.

केव्हा काय होईल नेम नाही.

हो का बापरे . .पण आता?

जा पोरी जा. माझं घर इकडच अाहे मागं . जा बरं जपून.

आणि ती बाई आपल्या वाटेने पुढे चालायला लागली आणि दिसेनाशी झाली.

शांततेमुळे आधीच घामाने डबडबलेली शर्वरी पूर्णच गर्भगळीत झाली.

काय करावं , घरी कसं पोचावं हा प्रश्न?

डोक्यात तीची स्वतःचीच वाक्य चमकली. 

आपण जातीयवादा वर इतकं बोललो आता.

पण स्टेजवर बोलणं वेगळं आणि वास्तविकता वेगळी.

समोर उभी ठाकलेली समस्या बोलून हरणारी नव्हती.

कसंतरी, काहीतरी करून घरी जावं लागेल.

याच विचाराने रिक्षा शोधण्यासाठी तिने नजर वळवली. कुठेच रिक्षा किंवा टॅक्सी नव्हती.

एवढ्यात उजवीकडे तिला प्रचंड आवाज आणि गोंगाट ऐकू आला.

तिने मान तिकडे मान वळवली अन् जागच्या जागी काळजाचं पाणी झालं.

तिकडून लोकांचा मोठा जमाव येत होता. हातात दिवट्या , मशाली , काठ्या अन् काही हत्यारं असावीत , दिसत नव्हतं कारण त्या भागातला विद्युत पुरवठा बंद होता.

मी ओेरडले जिवाच्या आकांताने तरीही मदतीला येणारं कुणी नाही, मनात असा विचार आला आणि क्षणभर तर आपण आता संपलो असा विचार डोक्यात चमकून गेला.

स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यागत वाटलं तिला. ते लोक तिकडेच येत होते अन् आरडा ओरडा चालू होता.

"मार डालो! "

"काट डालो! "

"छोडना नही!!!"

ती एकटीच असहाय.

स्वतःच्या सुरक्षेसाठी ती धावली.

पळायला लागली. इकडे , तिकडे , डावीकडे, उजवीकडे!

रस्ता माहित नाही, गल्ल्या माहित नाहीत.

जीव वाचावा, एवढच ध्येय!

कुणीकडे चाललीय कळत नव्हतं . घराकडे कि विरूद्ध दिशेला. . . . . ?

तिने थंडीसाठी डोक्याला ओढणी गुंडाळली होती.

धापा टाकत टाकत ती एका रस्त्याजवळ येवून थांबली. तिथुन मोठ्या रस्त्याला जोडणारा एक रस्ता होता.

ती मोठ्या रस्त्याला पोहोचली अन् समोर काही ऑटोरिक्षा दिसल्या.

ऑटो ती ओरडली आणि इतक्यात मागुन कुठुनतरी पुन्हा तोच गोंगाट , आरडा ओरडा ऐकू आला.

तिने वळून पाहिलं , दृश्य हृदय पिळवटणारं होतं .

काही माणसं तीन चार जणांना निर्दयतेने मारत होते.

चेन्स हॉकी स्टिक्स आणखी काही हत्यारं बहुतेक. ती माणसं विव्हळत होती. प्रचंड गोंगाट.

डावीकडच्या दुकानांना आगी लागल्या होत्या. ती किंचाळता किंचाळता राहिली.

ती पटकन पळत सुटली अन् एका ऑटोत जाून बसली.

मागच्या लोकांनी हिला पाहिलं अन् आवाज आला,  "पकडो!!"

दुसर्‍या गल्लीतून मोठा जमाव येत होता, ते ओरडले " पकडा रे !"

नेमकं कोण ? कोण ? आहे कळत नव्हतं अन् हा हिंसाचार का ? तेही उमगत नव्हतं .

" चलो ना!" बस्स इतकच ती बोलली भेदरलेल्या अावाजात--

रिक्षाचालकाने लगेच रिक्षा चालू केली , थोडंसं पुढे गेल्यावर ती थोडी नॉर्मल झाली आणि घराचा पत्ता सांगितला.

"हाँ, अंकल ! अब इधर लेलो "

"अब लेफ़्ट " ती सांगत होती.

"अंकल ये सब क्या चल रहा है?"

"दंगे और क्या? वो छोडो तुम कौन हो?" त्याने करड्या आवाजात विचारले.

" कौन माने ?"

ती इतकच बोल ली आणि तिच्या रिक्षाला जोरदार धक्का बसला , तिला हादरा बसला, खड्डयामुळे ! अनाहुतपणे तिच्या तोंडून निघालं

" याह अल्लाह !?"

त्याने वळून पाहीलं वार्‍यामुळे चेहर्‍यावर ओढणी झाकली गेली, ती अजुनही घाबरलेली दिसत होती.

पुढे पाहिलं तर दुसर्‍या गल्लीत पुन्हा तशीच हाणामारी , धरपकडी चालली होती.

इकडे पोलिसाची जीप होती पण कुठे कुठे लोकच पोलिसांना भारी पडत होते.

रिक्षाचालकाच्या मनातही एकदम धर्म -रक्षा ईमान अश्या विचारांचं उठलेलं वादळ दाबुन त्याने भरधाव रिक्षा सोडली.

रिक्षावर ही काठ्या मारल्या गेल्या , जमाव मागे पळत होता , हातात मशाली आणि काठ्या होत्या.

अशा जमावातून जिवावर खेळून त्याने जिवघेण्या जातीय दंगलीतून रिक्षा आणि

शर्वरीला सुरक्षित काढलं .

मोठा शांत रोड लागला. त्यावर एकच रिक्षा धावत होती. मधेच पोलिसांच्या शिट्ट्या वाजत होत्या .

"और कहाँ है बेटा आपका घर ?" त्याने मायेने विचारले.

"अंकल बस सामनेवाले खंबे के पास रोक दो !"

"बेटे तुम्हारे वालिद क्या करतें हैं ?"

"जी वो कॉंट्रॅक्टर हैं "

इतकं बोलेपर्यंत रिक्षा थांबली होती. रिक्षातून उतरताच तिने पर्स काढली.

त्याने पैसे घेण्यास नकार दिला . तिने बळजबरीने दिले.

"आपके किराये की बात नही अंकल , पेट्रोल के पैसे समझकर रख लिजिए. वो तो आपके घर नही बनता . वैसे आपके एहसान का मोल तो मैं कभी चुका नही पाऊँगी!"

"नही बेटे . अहेसान की क्या बात है? इन्सानियत भी कोई चीज़ होती है! अपनी बच्ची समझके हिफ़ाजत से लाया था! घर पहुँच गयी ना बस्स. रख लेता हूँ।"

" शुक्रिया अंकल! खुदाहाफ़िज़!"

ती उपकाराच्या भावनेने म्हणाली.

तो भावनिक झाला. सलामत रहो बेटे . बडी तहज़ीब से बोल लेती हो. अल्ला तुम्हें

खुश रखे! "

त्याने ऑटो स्टार्ट केली आणि निघून गेला.

शर्वरीने घराचा दरवाजा वाजवला आणि आतुन भाउ व आई एकदाच ओरडले "कोण आहे?"

"अगं मी शर्वरी !!! दार उघडना पटकन !"

दार उघडून पटकन लावून घेतलं . ती आईच्या गळ्यात पडून रडायलाच लागली.

घरी सगळे घोर चिंतेत होते. गावात दंगल उसळल्याचं कळालं होतं . भावाने मैत्रिणींच्या घरी फोन लावले होते. आजोबा माळ जपत बसले होते.

बाबा नागपुरला गेले होते त्यामुळे जास्त काळजी वाटत होती.

आईतर देवासमोरच बसली होती प्रार्थना करत.

शर्वरी घरी येईपर्यंत जिवात जीव नव्हता . ती आली सुखरुप आणि जीव भांड्यात पडला.

आईने तर शर्वरीच्या अंगाला हात लावून पाहिला , प्रथमच पाहिल्यागत!

मग तिने पूर्ण घटना इत्थंभूत सांगितली , मग स्पर्धेविषयी सांगितलं.

" आई मला तर जिवंत परतण्याची आशाच नव्हती. निव्वळ दैवयोग आई. हिन्दु -मुस्लिम दंगे झाले कि कितीतरी निष्पाप जीव जातात गं! आपण पेपरमधे वाचतो. असच होत असेल ना . अगं मी ऑटोत बसले आणि तो जर विरूद्ध धर्माचा माणूस असेल तर. .आणि कट्टर असेल तर? मला तर कल्पनाच करवत नव्हती.

लपायला जागा नाही . ओळखीचं कुणी त्या भागात रहात नाही. बाप रे! पण ते अंकल देवदूताप्रमाणे अवतरले. लाठ्या - काठ्यातून आगी- दंगलीतून सुरक्षित घरी पोहोचवलं गं . शेवटी तर पैसे घ्यायला पण नकार दिला गं त्यांनी! "

" निव्वळ देवकृपा , दैवयोग बेटा . देवाने माझी हाक ऐकली गं !" आईचे डोळे पुन्हा भरून आले.

"आजच वादविवादामधे जातीयवादावर केवढं बोलून ,टाळ्या घेवून आले अन् बाहेर आले तर हे वाढून ठेवलेलं. पोलिसानी आटोक्यात आणल़य पण तरीही. . ती वेळ अन् त्या अंकलना कधीच विसरणार नाही मी! आई खरच गं--"

" शरू ,आता ते पुरे करा अन् जेवायला चला. आजोबा अन् दादापण थांबलेत तुझ्यासाठी. एक एक क्षण युगासारखा गेला गं बेटा , हे कळाल्यापासून. तुला माहित नाही गं तरूण मुलगी बाहेर गेल्यावर परत येईपर्यंत किती काळजी असते. पदरात निखारा. . "

"आई !! हे काय आता ?. आले ना मी सुखरूप? वाढ ना जेवायला."

या दैवयोगाने शर्वरी खूप भारावून गेली होती. तो माणूस तर मुस्लीम वाटला मग त्याने मला कशी काय मदत केली? पोटच्या पोरीगत सुखरूप मृत्युच्या दाढेतून परत आणलं . किती जिव्हाळ्याने बोल ला. दुसरा कुणी कट्टर असता तर . . !

दोन दिवस कर्फ़्यु लागला , मग चार आठ दिवसात वातावरण निवळलं .

शर्वरी त्या देवदूताला विसरली नव्हती. आनंदाच्या क्षणी तिला वाटायचं कि हे सर्व क्षण त्याच्यामुळेच आहेत .

१-२ महीने झालं . शहर जुनं सगळं विसरलं.

शर्वरी मैत्रिणींसोबत गप्पात रंगली होती. सिनेमा पाहुन परत येत होती. उन्हाळा असल्याने सहा वाजले तरीही ऊन पडलेलं होतं . लोक झालेली दंगल आणि तो हिंसाचार विसरून पूर्वीप्रमाणे गुण्यागोविंदानं रहात होते.

रुपाली म्हणाली " शर्वरी आई काऴजी करेल गं , अता पायी नको जायला. ऑटोने जाऊयात घरी.

" हो गं जाऊयात. पण रूपा , अाज पुन्हा माझे देवदूत अंकल भेटले तर मजा येईल ना गं . कमाल आहे , पूर्वी कधीच दिसले नव्हते , पुन्हाही अातापर्यंत दिसले नाहित. " असं बोलून शर्वरी आणि मैत्रिणी रांगेतल्या पहिल्या रिक्षात बसल्या.

"बोलिये क्या लेंगे?"

"पर जाना कहाँ है कितने सीट है?"

इतकं बोलून त्या रिक्षाचालकाने मागे वळून पाहिलं -

शर्वरी अत्यानंदाने ओरडलीच, " अंकल आप हो. . . कैसे हो?"

तो गोंधळला.

" भूल गये क्या ? अंकल आपने मुझे दंगल से बचाकर घर पहुँचाया था हिफ़ाज़त से. .??!!"

हाँ वो तो ठीक है पर . . याद है ना ! पर तुमने तो उस दिन . . ?"

त्याचा हात नकळत कपाळाकडे गेला . शर्वरीने तिच्या कपाळाला हात लावला. बोटाल टिकली लागली.

तिला कहितरी वेगळच वाटलं त्याचं बोलणं.

" अंकल आप इतने हैरान क्यों है . पूछिये मेरी सहेलियों से . . मैने कितनी बार आपका शुक्रिया अदा किया है. आप हैरान हैं , कुछ पूछना है क्या ? पूछिए!"

" हाँ बेटी, बुरा न मानो तो बताओ तुम कौन हो ? मतलब तुम किस धरम की हो? "

" बुरा मान ने की क्या बात है , हिन्दु हूँ! आपने नही पहचाना था क्या उस दिन ? मैं तो आपकी बोली से पहचान गई थी कि आप मुस्लिम हो. फिर भी आपने मुझे उस दिन बचाया था!"

तो अजुनही गोंधळल्या अवस्थेत होता . "पर बेटे उस दिन तो. . ?"

"खुदा का शुक्र है कि मै आज आपकी वजह से सलामत हूँ. ."

तुमने कहा था कि. .

"मैने क्या कहा था ? याद नही है . हाँ ! याह अल्लाह या खुदा कुछ कहा होगा!"

" वही तो. . और इसलिये मैं. . चलो कोई बात नही. "

"चलिये अंकलजी बताती हूँ. "

त्याने ऑटोरिक्षा स्टार्ट केली.

"अंकलजी लोगो ने भगवान को बाँटा है अपने हिसाब से. पर मेरे लिये तो वो एकही है. मैं हिन्दू हूँ लेकिन बचपनसे मेरी २-३ सहेलियाँ मुस्लिम हैं. बहुत जिगरी दोस्ती है. उनके साथ रहकर तो मैं हे भगवान कम बोलती हूँ और याह अल्लाह ज्यादा बोलती हूँ। फिर ये टिकली / बिंदी भी कभी कभी तय करती है कि इन्सान का धरम क्या है ?"

सगळेजण हसले.

गप्पा गप्पांमधे शर्वरी आणि मैत्रिणी घरी परतल्या.

आज रात्री अंथरुणावर पडल्यावर मात्र सिनेमाच्या स्टोरीऐवजी शर्वरीला तो दंगलीचा दिवस आठवू लागला.

घटनांचे संदर्भ लागात नव्हते. तो दैवयोग तिला चमत्कार वगैरे वाटला होता.

त्याने तिला त्यादिवशी का वाचवलं . . उतचतर होतं" याह अल्लाह !"

धावपळीत कपाळावर टिकली नसेल, ओढणी डोक्याला गुंडाळलेली, आणि तिचं आईगं च्या ऐवजी याह अल्लाह म्हणणं यामुळेवत्या धर्मभिरू माणसाने तोला सुखरूप घरी पोहोचवलं होतं!!

म्हणजे तिच्या महजबी मुळे तिला ही सवय लागली होती आणि तिनेच तिला त्यादिवशी वाचवलं होतं .

महजबीच्या सहवासाने जिभेला मिळालेल्या या अल्लाह आणि सुंदर उर्दुमिश्रित हिन्दीमुळे शर्व्रीचे प्राण वाचले होते.

अातामात्र तिला सगळ्या प्रकाराचं हसू आलं आणि शुक्रिया म्हणण्यासाठी तिने पटकन उठून लेटरपॅड घेतलं .

महजबी आता आजीकडे गेली होती महिनाभरासाठी. शर्वरीने पत्र लिहायला घेतलं .

सुरुवात केली- मेरी जान महजबी सलाम वालेकुम !

शुक्रिया तुम्हारा अौर तुम्हारे याह अल्लाह का! "



समाप्त



Rate this content
Log in