चित्र
चित्र
भक्ति आणि रोहन लॉन्ग ड्राइव्ह साठी बाहेर पडले. कितीतरी दिवसांनी इतका निवांत वेळ मिळाला होता.
नवीन रस्ता ट्राय करुयात म्हणून कधीही न गेलेल्या नैऋत्येला गाडी वळवली. थोडावेळ वर्दळ वगैरे होती पुन्हा विरळ होत गेली.
रस्ता सुन सान होता पण दोघांनाही छान वाट त होते. एकांत होता , शांति होती आणि सोबतीला सुफी टाइपची गाणी चालू होती
एक- दीड तासानंतर भक्ति म्हणाली कि
" परत फिरूया ना रोहन. घनदाट झाडी आहे, सुनसान पण! आपल्या साठी हा रस्ता नवीन आहे."
पण रोहनला ड्राइविंग मधे मजा येत होती.
"थांब ना गं! किती रम्य वाटतंय . सूर्यास्त झालाय. मस्त दोघंच . .शांती आणि सोबतीला निसर्गही ! अजून थोडावेळ , मग परत वळूयात"
ओके
थोड्या वेळानंतर खूप वारा सूटला , अंधारही पडला होता.
रोहन ने गाडी वळवली पण ती वळेचना .
मागे जाण्याऐवजी ती डावीकडे जंगलात वळायला लागली.
रिवर्स गियर , ब्रेक किंवा बाजूला काहिच काम करत नव्हतं . गाडी फक्त कुठल्यातरी शक्तीने ओढल्या सारखी रानातल्या कच्च्या रस्त्यावर आदळत आपटत चाल ली होती.
याप्रकाराने घाबरून भक्ति ओरडत राहिली , मदतीची हाक देत राहिली. पण आवाजाचा प्रतिध्वनी येत होता. ती मूर्च्छित झाली.
रोहन ने खूप संयम ठेवला पण भक्तीची अशी परिस्थिती बघून तो ही मनातून खूप भीतच होता.
फक्त गाडीचा ताबा तो सुटू देत नव्हता!
गाडी चालता- चालता अचानक थांबली.
रोहन ने दचकून पाहीलं , समोर एक पडीक बंगला होता .
त्याने पटकन दार उघडलं . भक्तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती काही होश मधे आली नाही.
पाणी ही संपलं होतं . मग तो बाहेर आला आणि अंदाज घेवू लागला. समोरचा बंगला पाहुन कळत होतं कि त्याकाळी खूप सुंदर आणि शानदार असेल तो.
आत जावं का हा विचार आला.
बंगला कि राजमहाल ? जुन्या ३००-४०० वर्षापूर्वी युरोपियन प्रकारचं स्थापत्य असलेली रेस्ट हाउस किंवा महाल होते ना त्या प्रकारची वास्तुकला होती.
मोबा
ईल च्या उजेडात त्याने पाहण्याचा प्रयत्न केला. बंगल्याच्या शेजारी झोपडीनुमा एक घर होतं. मंद दिवा ही दिसत होता. तिकडे जावं कि महालात जावं आणि पाणी मिळवावं हे कळेना. घशाला कोरड पडली होती अन भक्तिच्या चेहर्यावर पाण्याचा शिडकावा केला तर ती उठेल असा विचार.
इतक्यात महालात काहितरी हालचाल दिसली. तो तिकडे वळाला. सर्वत्र धुळीचं अन कचर्याचं साम्राज्य होतं.
तो चालत आत गेला. कुठल्यातरी हॉरर मुव्ही सारखं वाट त होतं त्याला. बुटामुळे वाळ ल्या पानांचा भयभीत करणारा आवाज येत होता.
तो ओरडला " कुणी आहे का इथे ? !
"पाणी मिळेल का पाणी?"
प्रतिध्वनी येत राहीला .
मोबाईलचा फ्लॅश टाकत तो न्याहाळत होता . . भव्य विशाल दालनात राजेशाही थाट. मधोमध वर जाऩार्या पायर्या .
भिंतीवर मोठ मोठी पेंटिग्ज , अॅंटिक!
ब्रिटिशांचा भारतातला सुवर्णकाळ दाखवणारी!
तो एक चित्रकार होता आणि त्याच्यासाठी तर हा शिक्षण आणि अभ्यासाचा
खजिनाच होता.
तो मंत्रमुग्ध होऊन पहात होता. एका पेंटिगवर त्याची नजर स्थिरावली.
"अद्भुत . . अद्भुत . .!" त्याच्या मुखातून आपसूकच निघाले. .
"तुम्ही पण चित्र काढता का ?!"
आवाजाने रोहन दचकला. एक म्हातारा हातात कंदील घेवून उभा होता.
"तुम्ही कोण ! तुम्हाल कसे माहित कि मी चित्रकार आहे?"
ह्या चित्राला पाहणारे चित्रकारच असतात साहेब .
"मी इथला रखवालदार.
तीन पिढ्यांपासून माझं कुटुंब या महालाची रखवाली करतात.
हया चित्रांची कहानी हाय ती सांगतो तुम्हाला. "
मग रखवालदाराने त्या गरीब मुलीची कहानी त्याने सांगितली. कसा अत्याचार झाला
इंग्रज अधिकार्यांनी कसे अन्याय केलआन ती मेली.
तिच्या भुताने कसा बदला घेतला.
अन एका तरबेज चित्रकाराने तो प्रसंग टिपला.
ती शक्ति कधी कधि अजुनही कुणा कुणाला ओढून आणते.
मग भक्ति पण शुद्धिवर आली.
दोघे सुखरूप परत निघाले.
रोहनच्या मनात ती प्रतिमा कोरल्या गेली पण कॅमेरात मात्र ते चित्र आले नाही.