swati Balurkar " sakhi "

Romance

3  

swati Balurkar " sakhi "

Romance

केली पण प्रीती - भाग ३

केली पण प्रीती - भाग ३

5 mins
1.7K


जुने दिवस आठवताना शरयु सोबतचे कितीतरी प्रसंग आठवायला लागले.

इतकी वर्षे मी जाणीवपूर्वक हे सारं विसरून बसलो होतो.

आज मात्र एक - एक घडी उघडावी तसं आठवणीचा पदर उकलत चालला.

तिच्या एका फोन ने जसा गतायुष्याचा चित्रपट उलगडला गेला !

माझ्या या गुंतण्याच्या दिवसांमधे एकदा माझी तब्ब्येत बरी नव्हती, तिने त्यावेळी बरीच काळजी घेतली अर्थात मूकपणे!!

मी तेही विसरलो नाही.

त्यानंतर आठवडयाभरात साइटला जावे लागले.

तिथल्या सुपरवायजर बरोबर माझं भांडण झालं .

ऑफिसला परत आलो तर बॉस ला माझे म्हणणे पटेना. त्याच्याशी वाद घालू शकत नव्हतो.

मी वैतागलो होतो. पहिलाच जॉब आणि एक महिनाच बाकी होता प्रोबेशनचा .

थोडक्यासाठी रिमार्क नको. सिनियरने समजावले.

डोके भणभणत होते. सरळ डोकेदुखीचे कारण सांगुन त्या दिवशी लवकर घरी आलो .

"आत्या , प्लीज थोडा चहा दे ना गं, खूप डोकं दुखतय " अस म्हंणत मी हॉलमधे आलो आणि बॅग सोफ्यांवर फेकली .

माझ्या रूमकडे निघालो.

सहज बाहेर लक्ष गेलं तर आत्या आणि रीमा बागेत काहितरी करीत होत्या.

मग नवी झाडं मागवली होती की मशागत करत होत्या कळंलं नाही.

मी सरळ खोलित गेलो आणि पलंगावर डोळे मिटुन पडलो.

पाच दहा मिनिटांनी आवाज आला. . .

" श्रीधर ,अहो, श्रीधर . . चहा!!

मी स्वप्नात उठल्या प्रमाणे उठलो.

किती गोड हाक होती ती.!!!

शरयु लेमन कलरच्या ड्रेसमधे आल्याचा चहा घेवून समोर उभी होती.

किती साधी , किती गोड. ते टपोरे डोळे काहितरी आर्जव करतायत कि काय असं वाटलं.

स्वप्न कि सत्य असा विचार करत उठुन बसलो.

तिने लगेच चहा साइड टेबल वर ठेवला अन् बोलली.

"आल्याचा गरम चहा घ्या . डोकं दुखायच थांबेल."

ती परत निघाली आणि मी एकदम तिच्या समोर उभा राहिलो.

माझ्या मागे दार होतं . . ती जाउ शकत नव्हती.

ती मागे सरकत गेली आणि मी पुढे पुढे.

एका क्षणी ती भिंतिला टेकली.

"हे काय!!! चहा घ्या ना."

ती अस्पष्ट बोल ली.

"हो घेतोय ना" मी मिश्किलपणे म्हणालो होतो .

अजुनही मला आठवतय . . ती खूप घाबरली होती.

पण तिचे रोखलेले टपोरे डोळे मला अजुनच बेचैन करत होते.

"शरयु,. . . प्लीज काही बोलु नकोस . मी खूप टेंशनमधे आहे.

तुला माहित आहे ना अशावेळी मी. . "

ती खूप जवळ होती।

माझे हात भिंतिशी लागले आणि ती घाबरून म्हणाली--

" अगं रीमा तू इथे????"

मी पटकन बाजुला झालो आणि वळलो.---

तेवढ्यात ती निसटली.

चपळपणे नाहिशी झाली.

स्त्रियांना ही चतुराई जन्मताच असते.

हे आता कळतंय मला!

तो क्षण निसटला याचे खूप वाईट वाटले मला.

पण चहा घेताना लक्षात आले कि मी किती रिलॅक्स झालो होतो . ताण कमी झाला. डोकं दुखायचं थांबलं.

त्या रात्री मी शरद दादाच्या खोलित गेलो .

वाचायचं असं ठरवलं. त्यांच्या दाराजवळ चटई टाकली.

तिकडे नेहमीप्रमाणे गाणी चालू होती.

मी पडून ऐकायला लागलो.

ती छान जुनी गाणी ऐकायची.

कधी गज़ल ऐकायची.

या दरम्यान अरुण दातेंची हळुवार भावगीतं ऐकायची.

"शुभ्रफुले वेचित रचिला चाँद तू जुईचा

म्हणालीस चंद्रोत्सव हा सावळंया भुईचा"

कसं मधाळ वाट त होतं ---

"दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला अाहे"

मग ती सुध्दा सोबत गायला लागली.

"दिवस तुझे हे फुलायचे , झोपाळ्यावाचुन झुलायचे."

पुन्हा "दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही

क्षण एकही न ज्याला तुझी आठवण नाही "

कसली सुंदर भावगीतं अरूण दातेंची. !!!!

शरयु तल्लीनतेने टेप सोबत गात होती.

मग नोट्स काढताना गात होती कि नुसती गात होती . . कळलं नाही.

माझं टेंशन, डोकेदुखी-- सर्वकाही जणु विसरलो होतो.

"या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे"

शुक्रतारा ची कॅसेट लावली असेल बहुतेक.

मला वाटले पण. .ही एवढी भावूक असेल वाटले नव्हते.

"अहाहा!!!वाह ! क्या बात है?!!"

एकदम दाद ऐकु अाली तिकडून. .

"" रिमा तुला सांगते. हे बेस्ट गाणं आहे अरुणजींचं!! काय लिहिलंय ! काय म्हणलंय.! माझं फेवरेरेरेरेरेट गाणं गं रिमा""

मी कधीच शरयुचा हा टोन , असं बोलणं एेकलं नव्हतं

ही मुलगी अशी पण आहे. . दिलखुलास , भावूक, व्यक्त!!

तिकडून चिडवाचिडवीचा आवाज येत होता मग हसण्याचा.

मी कान देवून ऐकत होतो.

कुठलं गाणं आवडतं असेल हिचं???

" रिमा प्लीज ऐकू देना यार। असं काही नाहिय""

मी लक्षपूर्वक ऐकत होतो. . .गाणं होतं--

"अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी

लाख चुका असतील केल्या. . .

------ केली पण प्रीती !!"

"क्या बात है.! " आपसुकच माझ्या तोंडुन निघाले.

माझ्या खोलित आलो आणि तिचाचा विचार करत झोपलो.

दरम्यान बर्‍याच गोष्टी घडल्या . त्या सगळ्या क्रमवार लक्षात नाहित आता.

त्यादरम्यान एकदा विवेक , माझा कॉलेजचा मित्र दोन दिवस रहायला आला होता.

दोन मुली या घरात राहतात हे पाहुन तो चक्रावला.

त्यातहि मी इतका शिस्तित राहतो हे त्याच्या पचनी पडले नाही .

कॉलेजमधे माझी प्रतिमा फुलपाखरासारखी होती.

हिरवळ बघायची, नेत्रसुख घ्यायचे, कुणाला तरी छेडायचे, उगाच मुलींना सतवायचे.

पण नोकरी लागल्यापासून मी स्वतःला बदलत होतो.

इथे आल्यावर तर सभ्य राहणे गरजेचे होते.

एकतर आत्याची नज़र असायची- रिपोर्ट माई नानांना जायचा.

आणि या मुलींसोबत रहायचं म्हणजे सरळ राहणं गरजेचं होतं !

विवेक तर रिमाला बघून खल्लास झाला होता.पण रिमाने काहितरी झटका दिला असेल कारण पुन्हा तो तिच्या नादी लागला नाही.

" आयला सॉलिड लकी अाहेस लेका दोन -दोन आयटम सोबत एका घरात राहतोयस."

"ए ए ए माइंड युवर लैंगवेज. . आयटम काय???. आणि शरयु ला तर असलं काही बोलायचं नाही."

मला का कुणास ठाऊक ते रुचलं नाही.

"ओहो असं आहे होय. तरीच म्हटलं एवढे का झोंबले.? म्हणजे रिमाला म्हणु शकतो"

"विवेक , काय यार ! सरळ साध्या मुली अाहेत ह्या आणि आपण आता कॉलेजात नाही अाहोत."

"स र ळ . . साध्या !! बापरे , काल तू दूध आणायला गेलास तेव्हां तिने मला रूम मधे कोंडलं होतं . खतरनाक अाहे यार ती रीमा. तसं चुकुन झालं ते , पण घाबरलो मी! तसाच पडून राहिलो . म्हटलं सुंदर मुलीने दिलेली शिक्षा आहे. पुन्हा तिनेच उघडलं दार . सॉरी पण म्हणाली."

मी खूप हसलो.

"हाँ तुझी शरयु सरळ आहे असं वाटतं बुआ. .

मालूवहिनीसारखी"

"विवेक शू------अरे इथे कुणालाच माहित नाही तिच्याबद्दल ! सांगितलं नाही अजुन."

"ओके ओके."विवेक शांत झाला.

आणि त्याचदरम्यान तिचे आईवडिलच इथे आले , दोन दिवस रहायले.

नेमका मी मुंबई ला गेलो होतो.

परत आल्यावर पाहिलं शरयु आकाशी साडीवर होती .

केवढी सुंदर दिसत होती. ती पाणी घेवून आली---

तर वाटलं कि तिला मिठी मारावी अन सांगावं,' तुझ्या साधेपणात गोडवा अाहे. त्या टपोर्‍या डोळ्यातली निरागसता मला खेचत असते.'

"काय विशेष आज साडी बिडी. ? तुझे आईवडिल कुठेत? " मी शेवटी विचारलेच.

"ते गेलेना आत्ताच . आणि बाहेर गेले होते ना त्यांच्यासोबत म्हणून साडी."

केवढी लाजत होती. पण काहितरी गूढ़ होतं जे मला कळत नव्हतं .

तेवढ्यांत आत्या आली. तिने ऐकलं असावं बहुतेक अमचं बोलणं ! वाती करत बसली हॉलमधे .

"श्री ,आता शेवटचं वर्ष पोरींचं ! तिच्या आईवडिलांना काळजी लागलीय रे लग्नाची. आतापासून सुरु करतील तर वर्षभरात जमेल. म्हणून आले होते चौकशी साठी."

आता मात्र मला वाटलं काहितरी शिजतयं .

काल माईनानां पण आत्याकडे फोन करून बोलले.

मी एकदम भानावर आलो.

अरेच्चा!! शरयुचे शिक्षणाचे शेवटचे दोन महीने !

मला पण एखाद्या महिन्यात पोस्टिंग मिळेल. मग हे सगळं थांबेल.

अकरा महिने कुणीकडे गेले कळालच नाही.

मी सोफ्यांवर बसलो. एकदम गंभीर झालो.

एकीकडे शरयुला स्थळं पाहणार म्हणल्यावरची बेचैनी!

ती बेचैनी का होती ते अजुनही कोडंच आहे माझ्यासाठी??

दुसरीकडं माझी नोकरी त्याची पोस्टिंग . . . कुठली ब्रँच देतील? ही काळजी.

आणि तिसरीकडे मालुचं व माझं प्रेमप्रकरण आणि लग्नाबद्दल तेच घरी सांगण्याचं टेंशन !!

मी इतक्या तनावात असताना तो दिवस आला ,जो अजुनही फिल्म सारखा मनात जपलाय मी !

तो अविस्मरणीय दिवस अजुनही तसाच आठवतो ,ज्यामुळे मला आजही कुठेतरी वाटते कि मी शरयुवर अन्याय केला.

---- क्रमशः


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance