काय झाडी,काय डोंगार,काय हाटील!
काय झाडी,काय डोंगार,काय हाटील!
काय डोंगार!!काय हाटील !! काय झाडी!! काय माज !काय ऐंश !काय लबाडी.जनतेच्या पैशावर नेत्यांची कुरघोडी.सत्तेचा हव्यास खुर्चीचा माज जनतेचा खेळ नि लोकशाहीचा इतका बट्ट्याबोळ आजवरच्या इतिहासात कधिही झाला नसेल इतिहासाने अनेक सत्ता, राजेरजवाडे,संस्थान त्यातली कटकारस्थान पाहीली असतीलही पंरतु या घडीला गेले काही दिवसापासुन महाराष्ट्रीय जनतेसह समस्त देशवासिय व संपुर्ण जग आपल्या राज्यातील आमदार खासदार लोकप्रतिनिधी म्हणविणारे महानालायक षंढ कारभारी यांनी जो काही खेळ मांडलाय ना ते पाहुन काय विचार करत असेल याची कल्पनाच केलेली बरी!आपल्या राज्यापुरते बोलायचे झाले तर इतक्या भयानक घडोमोडी नी कावेबाज डाव टाकुन एकमेंकाना शह प्रतीशह देत पाठीत खंजीर खुपसुन गटातटाचे हिन राजकारण पाहुन आधीच परीस्थितीने पिचलेल्या समस्यांनी घेरलेल्या नी हातावर पोट घेऊन मरमर करणार्या सामान्य जनतेच्या डोळयात नक्कीच पाणी तरळले असेल आणि लाजही व कीव वाटत असेल की कोणाला निवडुन दिलयं आपण खरोखर लायक आहेत का ?आपल्या जगण्याचा मार्ग सुकर होइल माणुस म्हणुन किमान स्वकष्टार्जित दोन घास सुखाने पोटात घालुन शांत पणे डोळे मिटुन पुन्हा नव्या दिवशी नव्या दमान कामाला लागतो तो सामान्य माणुस कोमन मॅन.सततापिपासु घरोघरी मताची भीक मागत फिरतात मोठमोठी अशवासने मोठाले दावे,ऊदधाराची स्वप्ने नि वंचिताला न्याय. नळ पाणी स्वच्छतागृह शिक्षण, रोजगार काय काय आणि किती मोठमोठे जाहीरणामे काढतात गरीब जनता यांच्या फसव्या बोलणयाला भुलते कधी शेपाचशेच्या नोटेला भुलते नी करोडो रूपयांचे घबाड मिळविण्याचा या नेत्यांचा मार्ग सुखर करते अगदी वाजत गाजत गुलाल ऊधळत यांच्या विजयाचा जल्लोश होतो पुढे हा भाऊ ,दादा सरकार खिशात घेऊन फिरतो लोकशाही बासणात गुंडाळतो.कोण जनता नी कसली लोकशाही जिकडे माल तिकडे तो जाई! मग तिथं स्वताचा स्वाभिमान विकला तरी चालेल आत्मसन्मान गहान ठेवला तरी चालेल कारण असत फकत हव्यास कसला पक्ष नी कसली निष्ठा?पैशाच्या जोरावर मिळालेली खोटी प्रतिष्ठा चारचौघात दाखवणं जमेलही मात्र आपण ज्याचे दलाल आहोत विकले गेलो आहोत त्यांचे तळवे चाटत असतील हे पांढऱ्याशुभ्र कपड्यातले काळे कर्म करणारे बिभत्स वृत्तीचे नालायक यांना नेता म्हणायची पण लाज वाटतेय आणि मतदान केल्याची सुद्धा! .....................आणि न्यायव्यवस्था कसली?असे राजकारणी जे जनतेचे लोकशाही लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य आणि आम्ही भारतीय लोक या वाक्याने सुरवात होणारी आपली घटना व त्याला अनुसरून चालणारी आपले न्यायालयं शासन व्यवस्था मग सरकारमान्य लोकाना वर्षानुवर्षे न्यायासाठी तारीख पे तारीख आणि या चाटुगिरी करणार्या षंढासाठी सुटीच्या दिवशी अर्ज स्वीकारते तातडीची सुनावणी करते. मग कुठल्यातरी हतरस ची बेटी बलात्कार करून रातोरात जाळली जाते तेव्हा कुठे जाते?कुण्या शेतकऱ्याची विद्ववा टाहो फोडते दुष्काळाने पिचलेला अन्नदाता, बेरोजगारीने खचुन गेलेला परीक्षांमध्ये झालेल्या घोटाळ्याने हतबल होऊन आत्महत्या करणारा तरूण हजारो बलात्कारीत आसिड हलल्यात पिढीत न्यायाच्या प्रतिक्षेत खेटे घालणाऱ्या स्त्रीया यांच्यासाठी का नाही धावुन येत? न्यायालय का तीही विकली गेलीत असेच मानायचे का?करोना काळात लाखो लोक हजारो किलोमीटर ऊपाशी उन्हातान्हात पाय झिजवत पायपीट करीत होते तेव्हा कुठे होती चार्टर्ड विमाने?का ती सर्वसामान्यांसाठी त्यांना त्यांच्या घरी सुकरूप पोहचविण्याची तातडीची सुविधा तेव्हा नव्हते करू शकत सरकार जै आता या दलबदलु चोरांच्या बडदास्त ठेवायला रात्री अपरात्री उपलब्ध केलेय.अरे होय!शेवटी सारे काळे कर्म शेवटी अंधारातच चालतात ना!रोजचा लाखो रूपयांचा कोटा कोणाच्या वैयक्तिक मालकीच्या संपत्तीतला आहे?जाऊ द्या प्रश्न? उद्रेक! आक्रोश! राग !आहे. ......मात्र फक्त सामान्य जनतेच्या मनात मनात तो व्यक्त होइल तेव्हा मात्र या सार्याच नेत्यांना पळता भुई थोडी होइल आणि हो!हे नक्कीच होइल!
