STORYMIRROR

Priya Satpute

Fantasy Inspirational Others

3  

Priya Satpute

Fantasy Inspirational Others

काही मनातले...

काही मनातले...

2 mins
185

आज बऱ्याच दिवसांनी मनाला फोन लावला…


मन- हेल्लो!

मी- हाई…

मन- ओह तू…हाय

मी- मग काय? माझ्याशिवाय दुसरं कोण फोन लावणार तुला?

मन- ह्म्म्म! तसं तुला वाटत…

मी- बर बाबा सॉरी!

मन- ह्म्म्म!

मी- बस ना आता, माझ्या मना कसा आहेस तू?

मन- मी एकदम झक्कास, तू बोलं तू बरी आहेस ना?

मी- हो, मी सुपर झक्कास आहे…

मन- पक्का ना??

मी- हो रे! तुला काय वाटलं फक्त रडायलाच तुझी आठवण काढते का मी?

मन- नाही ग, पण…

मी- पण, काय हा?

मन- आता भांडणार आहेस का माझ्याशी तू?

मी- नाही रे…

मन- मग, बोल काय सुरुय तुझ्या मनात?

मी- तू न अगदी मनकवडा आहेस बघ!

मन- माहितेय मला…आता बोलशील का?

मी- हो रे, पण तू का इतकी घाई करतोयस!

मन- अग! मी मूवी पाहता पाहता आलोय तुझ्यासाठी

मी- मग ठेव ती बाजूला

मन- ठेवली।

मी- ऐक ना

मन- सांग ना

मी- मला ना असं वाटतंय की आज मी मुक्त झालेय…

मन- मुक्त? कशातून प्रिया?

मी- स्वतःच्याच भावनांतून, स्वतःच्या चक्रातून, स्वतःच्या विचारातून

मन- असं का वाटतंय तुला ?

मी- वाटेत आलेला सागर पार करून पुढे निघून गेल्यासारखं वाटतंय, सगळ्याच्या पलीकडे…प्रत्येक गोष्टीपासून अलिप्त झाल्यासारखं वाटतंय, जिथे कोणीच मला दुखवणार नाही, ना कोणीच मला स्पर्शू शकणार ना पाहू शकणार…

मन- वाह! हे तर छानच झालं ना, ना आईने ओरडल्यावर तू मुळूमुळू रडशील, ना बाबांनी फोन कट केला म्हणून डाफरशील, ना तू मैत्रिणींच्या अडचणीत त्यांना मदत करशील, ना तू तुझ्या फुलपाखराला पाहशील…

मी- खरंच किती शांती असेलं ना?

मन- वेडाबाई जागी हो, हा तर आयुष्यातला पहिला चिमुकला तलाव पार केलास तू, ज्याला तू सागर समजत आहेस, ते तर डबकच आहे असं म्हणेन मी…आता कुठे नव्या मार्गावर पहिलं पाऊल पडलंय तुझं…असं समज आज खऱ्या अर्थाने तुझा गृहप्रवेश झालाय नव्या आयुष्यात…

मी- ह्म्म्म

मन- अलिप्त का नाही वाटणार तो मनुष्याचा स्थायीभाव आहे, एखाद्या नव्या ठिकाणी गेल्यावर मिक्स अप व्हायला थोडा वेळ लागतोच बेटा…भावना तर क्षणाक्षणाला बदलत असतात, स्वतचे चक्रव्यूह असं जे काही तू बोलते आहेसं तेच तर तुझे विचारच आहेत ना? आता मला फोन लाऊन सुद्धा तू विचारातूनच तर बोलतेयस ना? मी आणि तू अलिप्त होऊ शकतो का कधी? तुला माहितेय ना मनुष्य देहाचा तुझा अंतिम श्वास सुद्धा आपल्याला वेगळा करू शकत नाही!

मी- बाप रे! किती बोलतोयस तू? तू तर चक्क प्रवचनच दिलं आज मला…

मन- ह्म्म्म…

मी- मला वाटायचं फक्त मीच प्रवचन देऊ शकते, तू तर सॉलिड निघालास!

मन- आवडलं ना पण? तिलांजली मिळाली ना तुझ्या विचारांना?

मी- हो ना…अर्थात त्यात तर तू एक्स्पर्ट आहेस!

मन- ते तर मी आहेचं…

(दोघेही खूप हसतो)

मी- अरे तुला मूवी पहायची आहे ना?

मन- अरे हो, विसरलोच मी!

मी- बर ठिक आहे, मी पळते झोपायला, तीन वाजत आलेत आता, पप्पा आले तर माझी खैर नाही, तुझं आपलं बर आहे इनविझीबल!

मन- (हसून) ओके! जा पळ…गुड नाईट!

मी- गुड नाईट! एन्जॉय द मूवी…

मन- ओके मेडेम!

मी- आणि हो…आज जरा वर्ल्ड टूरचं स्वप्न दाखवं!

मन- हो राणीसाहेब! जशी तुमची आज्ञा…

मी- (हसून) बाय…भेटू पुन्हा!

मन- बाय…लवकरच!


स्वत:च्याच मनाशी बोलून स्वर्ग ठेंगणा होतोय.


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy