Kakade Tejas

Horror Tragedy Thriller

3  

Kakade Tejas

Horror Tragedy Thriller

जुगणं

जुगणं

10 mins
157


आज female narrator च्या नजरेतुन कथा लिहितोय कारण घटना जी घडली आहे ती त्या स्त्रीच्या बाबतीत च घडली आहे....

सातारा हे नाव आठवलं की नजरे समोर येतात ते तिथले प्रसिद्ध कंदी पेढे आणि तिथलं कास च पठार. खरंतर फक्त हीच ओळख नाहीये सातारची पण या दोन्ही गोष्टींमुळे सातारा जगात प्रसिद्ध आहे.

माझं बालपण सुद्धा सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावात गेलं म्हणजे माझ्या आजोळी. तिथ इयत्ता चौथी पर्यंत मी शाळेला होतो आणि शाळा म्हणजे फारच सुंदर,आजकालच्या शाळांना जिल्हा परिषदेच्या शाळेची सर येणार आहे का? चौथी नंतर मी पुण्याला आईबाबांकडे आले.पण पुण्यात येऊन पुढील शिक्षण घेतलं बारावी झाले बारावीला चांगले गुण मिळाले. पुण्याच्या नामांकित महाविद्यालयात मला प्रवेश मिळाला. कॉलेज life पासून मी फार दूर होते गेली 15 वर्ष मी शहरात आले होते पण माझा फटकळ स्वभाव आणि माझ्या भाषेतली सातारी लकब अजूनपर्यंत तशीच होती.

तसे माझे कॉलेज मध्ये मित्र मैत्रिणी फार काही नव्हते. मी नेहा आणि भावना आम्ही नेहमी सोबत असायचो. हळूहळू तर आमचं त्रिकुट फार प्रसिद्ध झाल. आम्ही कॉलेज मध्ये सतत एकत्र असायचो ह्याच्यात्याच्याबद्दल गप्पा गोष्टी करायचो. याच कोणासोबत चालुये त्याच कोणासोबत चालू आहे हे सुरू असायचं आमचं. आणि एखादं जोडपं जर जवळून गेलं तर आम्ही तिघी फिदीफिदी हसायचो. नेहा चा आमच्या तिघींच्या एकत्र असण्यावरून तिच्या प्रियकरासोबत वाद झाला होता आणि ती प्रेमकथा तिथे संपुष्टात आली होती तिच्या प्रियकराने तिच्या अब्रूचे धिंडवडे काढले होते त्यामुळे नेहा पार नैराश्यात गेली होती.

तिला मी आणि भावना ने फार समजून सांगितलं पण ती काही हसली नाही. आम्हाला तिच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखं हसू पाहायचं होत पण काही केल्या ते येत नव्हतं....

म्हणून मग मीच ठरवलं आपण कुठंतरी फिरायला जाऊया दोन दिवस पण प्रश्न होता घरच्यांचा ? तो पण लगेच मार्गी लागला. मी माझ्या घरी सांगितलं की मी मैत्रिणीच्या गावाला जाणार आहे म्हणून,सुरुवातीला बाबांनी नकार दिला पण नंतर तयार झाले. आमचा फिरायला जायचा प्लॅन झाला आणि आम्ही अलिबाग ला जायचं ठरवलं. रात्रीची ११ ची एस टी होती पहाटे चार पाच वाजता अलिबाग ला पोहोचवायची आम्ही त्या गाडीने जाणार होतो. दिवस ठरला मी घरून निघाले आई म्हणाली काळजी घ्या बाबा मात्र शांत च होते मी दोघांच्या पाया पडले आणि घरातून बाहेर पडले.

रिक्षा करून थेट स्वारगेट गाठलं. स्वारगेट ला नेहा आणि भावना आधीपासून च येऊन थांबल्या होत्या. आम्ही भेटलो आत स्टँड मध्ये गेलो गाडीची चौकशी केली गाडी on time होती. साडेदहा वाजून गेले होते गाडी फलाटावर लागली होती आम्ही सगळे गाडी मध्ये बसलो अकरा वाजले तशी गाडी स्टँड मधून बाहेर पडली. गाडीमध्ये जेमतेम 20 लोक होती. पुण्यातून ट्राफिक मधून बाहेर पडायला थोडा वेळ लागला पण नंतर गाडीने वेग धरला. रात्री च्या थंडीत आम्हाला झोपा कधी लागून गेल्या समजलंच नाही. सकाळी conducter ने आवाज देऊन उठवलं म्हणाला ताई उठा शेवटचा स्टॉप आलाय. सकाळचे पावणे सहा वाजले होते तसा गाडी पोचायला खूप उशीर झाला. आम्ही लगबगीने खाली उतरलो. काय मेल्यासारख्या झोपलो होतो आपण,नेहा म्हणाली. त्यावर मी फक्त हसले. आम्हाला रूम सुद्धा लगेच मिळाली. आम्ही फ्रेश झालो आवरलं आणि फिरायला निघालो तर कुठे जावं यावर चर्चा सुरू झाली. मी म्हणाले चला कुलाबा किल्ला पाहून येऊया चालत पाण्यातून जाऊया मस्त मज्जा येईल. यावर एकमत झाल आणि आम्ही अलिबाग समुद्रकिनारा गाठला. कुलाबा फिरून झाला यायला संध्याकाळ झाली. सूर्यास्त होत आला होता आम्ही अर्धे भिजलो होतो आता पूर्ण च भिजायचं ठरवलं. आम्ही खेळलो पाण्यामध्ये पूर्ण ओलेचिंब झालो होतो सोबत बदलायला कपडे आणले होते आमची बुद्धी चालली होती. तिथे जवळच एक वॉशरूम आणि चेजिंग रूम पण होती. मी पूर्ण भिजले होते त्यामुळे मी आधी कपडे बदलण्यासाठी गेले आणि आत गेले आणि जो असा कुबट जीवघेणा वास माझ्या नाकात गेला की मी पळत बाहेर येऊन उलटी च काढली बाहेरून एवढं स्वच्छ दिसणारे हे आतून एवढं घाण असेल वाटलं नव्हतं. उपाय दुसरा काहीच नव्हता मी एका मैत्रिणीला घेऊन आत गेले आतमध्ये दोन गोष्टी होत्या भयाण काळोख आणि तो कुबट वास. कसेबसे आम्ही तिघीनी चेंज केलं आणि तडक रूम गाठली. त्या दिवशी त्या वासामुळे मी जेवले च नाही. माझं डोकं च उठल होत तो वास आल्यापासून. दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होत त्यामुळं आम्ही आधी सकाळी शॉपिंग केली आणि दुपारच्या गाडीने पुणे गाठलं. या सगळ्यात नेहा मात्र फार आनंदी वाटत होती तिला खूप प्रसन्न वाटत होतं. नव्याने ती पुन्हा अभ्यासाला आणि तीच आयुष्य जगायला लागली होती. पण माझं आयुष्य त्याच काय त्याची वाट लागली ना पण......

आमचं सगळं रेग्युलर सुरू झालं कॉलेज वैगैरे तोच जुना दिनक्रम सुरू झाला.

एके दिवशी अचानक रात्री मी झोपेत असताना मला स्वप्न पडलं त्या स्वप्नात एक नाग मला दिसला तो नाग आमच्या च घरात मला दिसत होता दरवाज्याचा फटीमधून तो आत आला आणि माझ्या खोलीत त्याने प्रवेश केला तो मला दंश करणार एवढ्यात मी जोराने किंचाळले. ते ऐकून आई बाबा धावत आले.

काय झालं ग पोरी, बाबा म्हणाले.

वाईट स्वप्न पाहिले बाबा, मी उत्तर दिलं

त्यावर बाबांनी मला पाणी दिल आणि आईने थोपटत परत झोपवलं.

मला दुसऱ्या दिवशी फार अस्वस्थ वाटत होतं. सतत काहीतरी कोणीतरी माझ्या भोवती आहे असं वाटत होतं माझ्यावर नजर ठेवून आहे कोणीतरी अस वाटत होतं त्या दिवशी मी कॉलेज ला काही गेले नाही. पुन्हा दोन दिवस नीट गेले तिसऱ्या दिवशी तेच स्वप्न तो नाग दरवाजातून आत येताना माझ्या दिशेने येतोय पण मला हालचाल करता येत नव्हती अस वाटत होतं त्या स्वप्नात मला कोणीतरी बांधून ठेवलं आहे तो नाग जवळ आला माझ्यावर हल्ला करायला त्याने डंख मारला आणि मी ओरडले खूप जोरात ओरडले. आई बाबा आजी सगळे तडक माझ्या खोलीत आले पुन्हा वाईट स्वप्न पाहिलस का,आईने विचारलं

मी होकारार्थी मान हलवली.

आईची काळजी थोडी वाढली तिने मला पुन्हा थोपटत झोपवलं आणि त्या रात्री ती माझ्याशेजारी झोपली.

सकाळी उठल्यावर आईने विचारलं बाळा स्वप्नात नेमकं काय दिसत तुला? एवढी का घाबरतेस?

मी तिला स्वप्नांत घडलेली हकीकत सांगायला सुरुवात केली त्या नागाच येणं मला बांधून ठेवलं जाणं आणि त्याचा दंश हे सगळं सांगताना पण मला कापर भरलं होतं.

नंतर नंतर हा प्रकार सारखा होऊ लागला स्वप्न पडणं माझं दचकून ओरडत उठणं सार काही सतत घडू लागलं आणि एके दिवशी स्वप्नात तर नाग आणि नागीण दोघे मला दिसले माझ्याकडे येताना मि निपचित पडून होते माझ्यावर कोणाचातरी दुसऱ्याचा ताबा आहे असं वाटत होतं मला प्रतिकार करायला शक्ती मिळत नव्हती. ओरडायचा प्रयत्न केला पण तो आवाज मला माझा पण ऐकू येत नव्हता तव स्वप्न होत सत्य हेच कळत नव्हतं. मला जाणवत असलेली शक्ती आणि या नागांच काहीतरी संबंध होता हे नक्की....

त्या रात्री ते स्वप्न च होत पण हे सगळं जरा जास्त प्रमाणात होत आहे असं मला वाटत होतं म्हणुन मी आईला नको त्रास म्हणून आजीला सांगायचं ठरवलं. आजीला मी पहिल्या दिवसापासूनची ते कालपर्यंत ची सगळी हकीकत सांगितली. तिने सगळं ऐकून घेतल्यावर माझ्यावर प्रश्नांची सरबत्तीच सुरू केली. तू आता का सांगत आहेस? आणखी काय दिसत तुला? तू कुठं नको त्या झपाटलेल्या ठिकानी गेली होतीस का? मला उसंत खाऊ न देता तिचे प्रश्न सुरूच होते. मला तर काहीच आठवत नव्हतं कारण मी बरच पुणे पालथं घातलं होत. पुण्यात शनिवारवाडा सोडून झपाटलेली जागा मला माहित नव्हती आणि वाड्यात आमचं सारखं जाणं सूरुच असायचं तिथं काय डोंबल असणार दुनिया जाते सगळी तिथं त्यांना बर काही होत नाही आता नेहा आणि भावना ला तरी कुठं काय त्रास होतोय. हा त्रास फक्त मला एकटीला होतोय, मी स्वतःशी च पुटपुटत होते.

पोरी काय कोणी भानामती केली की काय तुझ्यावर हे असलं काय होतंय तुला. आईबापाला तुझ्या सध्या तरी काय सांगू नकोस,आजी म्हणाली.

त्या दिवशी त्या रात्री नाग माझ्या स्वप्नात आला पण तो फक्त दरवाजातून आत आला आणि एकसारखा माझ्याकडे पाहत राहिला. मागून नागीण आली दोघेपण एकाचवेळी माझ्याकडे पाहत होते. त्यातपन दरदरून घाम फुटला होता मला. मी जागी झाले पण यावेळी ओरडले नाही,फक्त पाणी घेतलं आणि झोपले तर मला झोप लागून सुद्धा गेली. त्या दिवशी शनिवार होता आजी सकाळी च कुठंतरी निघून गेली होती मी कॉलेज ला जायच्या गडबडीत होते. आईने डबा देताच मी निघून गेले. डबा देताना आईची नजर माझ्या चेहऱ्यावर खिळली होती. मला ते थोडं संशयास्पद वाटलं पण म्हटलं काळजीपोटी,मला होणारा त्रास बघुन तिनं माझ्याकडे पाहिलं असेल. तो दिवस खूप मस्त गेला. संध्याकाळी मी घरात पाऊल टाकताच सगळीकडे घरात धूर झालेला दिसला. धूप,उदबत्ती चा सुगंध आणि कसलातरी यज्ञ सुरू होता. समोर एक बाबा बसला होता त्याच्या बाजूला आजी होती. तिथेच बाजूला आईबाबा होते. आजीने मला पाहताच माझ्या जवळ येऊन मला ती म्हणाली, हे बघ बाबा आहेत न तेच तुला यातून मुक्त करतील. तो बाबा दिसायला खूप विचित्र होता. काळी पट्टी डोक्याला, दंडाला गुंडाळली होती. बुक्का कपाळावर फासला होता आणि एक काळ उपरण आणि एक काळ्या रंगाच सोहळ बस्स एवढंच होत त्याच्या अंगावर.

दाढी केस वाढलेले होते. मी त्याला न्याहाळत असताना आजी मला म्हणाली, हा त्या अमरधाम च्या मागच्या जंगलात ला बाबा आहे. आत्म्यांसोबत संवाद साधतो आणि मला अस वाटत की तुला हा जो त्रास होत आहे तो सगळा कोणत्यातरी एका वाईट शक्तीचा प्रभाव असू शकतो. तू जा आवरून ये आणि बाबा सांगतील तस कर फक्त. मी आवरायला आत आले आणि समोर पाहते तर काय ते ते स्वप्नातले नाग नागीण, माझ्या समोर होते. मी कावरीबावरी झाले. ते जुगण माझ्या खोलीत त्यांच्या खेळात रंगल होतं दोघानी एकमेकांना विळखा घातला होता आणि त्यांची झटापट सुरू होती ते सारं विचित्र चित्र पाहून मी किंचाळत बाहेर पळत आले. आजीपाशी जाऊन बसले आणि जोरजोरात रडायला लागले. आजी पण घाबरली, तेव्हड्यात त्या बाबाचा आवाज कानी पडला, छोकरी को क्या हुआ? क्या देखा उसने? कुछ बोलती क्यू नही? त्याचा जाडा भरडा आवाज ऐकून मला धडकी च भरली. मी स्वतःला सावरून खोलीकडे बोट दाखवलं. तो बाबा उठला आणि त्या यज्ञ केलेल्या अग्नीची गरम राख एका कागदावर घेऊन माझ्या खोलीकडे गेला. त्याने दार बंद केलं. तो खोलीत गेला आणि कदाचित त्याने नाग नागीण पाहिले असावेत. कारण त्याचा ओरडण्याचा आवाज येत होता. तो बाबा दरडावल्या स्वरात बोलत होता अस दिसत होतं. मी एकच विचार करत होते. रोज स्वप्नात दिसणारी ही जोडी आज प्रत्यक्षात समोर कशी काय आली. मला जी भीती असायची की, कोणीतरी पाळत ठेऊन आहे ते हेच तर नाही? मला आणखी घाम फुटला.

तेवढयात बाबा खोलीतून बाहेर आला, त्याच्या हातात नागीण आणि नाग होते अस वाटत होतं दोघांनी प्राण सोडले आहेत. बाबाने नाग नागीण यज्ञाच्या समोर ठेवले आणि अग्नी पुन्हा प्रज्वलित केला. आणि यावेळी धरणीकंप झाल्यासारखं घर हलू लागलं. काचेच्या वस्तू फुटू लागल्या आणि तिकडे विचित्र हास्याचे आवाज येऊ लागले. माझे आईबाबा खूप विक्षिप्त आणि विचित्र पद्धतीने हसत होते.त्यांची ती हालत पाहून मला रडू कोसळलं.आजीने मला जवळ घेतलं. तो बाबा फक्त शांत बसून होता. आता त्याने आपला मोर्चा आई बाबांकडे वळवला. त्याने पुन्हा राख घेतली आणि आईबाबांच्या दिशेने फेकली. चटके दिल्यासारखा ते दोघे ओरडू लागले. काही क्षणात सार होत्याच नव्हतं झालं होतं मला त्यांचे हाल पाहवत नव्हते. क्या चाहीये तुम लोगो को,बाबा गरजला...

माका ता चेडवा पायजे असा, दोघे एकसुरात बोलले.

कोणाला काही समजलं नाही. बाबा पुन्हा राख फेकून गरजला, बोल क्या मंगता आप लोगो को?

त्यांनी माझ्याकडे बोट करत,त्याका आमका घेऊन जायचा असा माका ती पायजे अस जोरात ओरडून दोघे बोलले. आणि मग आमच्या सगळ्यांच्या डोक्यात आलं. ते जे कोण आत्मे होते त्यांना मी हवे होते. आजी मध्ये पडुन म्हणाली, माझ्या सोन्यासारख्या नातीनी काय वाकड केलं तुमचं?

गुमान माझ्या लेक सूनच्या शरीरातून बाहेर निघा..

ती दोघे जोरजोरात हसू लागली, म्हातारे तू गप गो माय,

आमका काय बोलूचा नाय, नाहीतर ह्या बाईला जित्ती ठेवत नसते मी, आईच्या मुखातून शब्द बाहेर पडले आणि मी फक्त रडत च होते माझं रडणं थांबत च नव्हतं. बाबा स्वतःच्या मुठी वळून कसलेतरी मंत्र म्हणत होता. आणि अचानक बाबाने स्वतःजवळ असलेला चाकू बाहेर काढला आणि माझा हात धरून मला जवळ ओढले माझा हात त्या अग्नीवर धरला आणि सपकन वार केला,मी किंचाळले,आई....ग मेले. माझं रक्त जळत्या निखाऱ्यात पडत होत आणि रक्त थांबलं आणि बाबाने मला दूर हो म्हटलं. त्याने तो माझं रक्त मिसळलेली राख हातात घेऊन मंत्र म्हणायला सुरुवात केली, इकडे या दोघांनी, नाय तू असा नाय करू शकत, आमका आमचा चेडू पायजे असा,आमका नको असा करू आमका न्याय पायजे असा अस म्हणून आई बाबमधले आत्मे बाबाच्या हातापाया पडू लागले. मला हे सगळं विचित्र वाटत होतं. बाबा म्हटला,सांग ही पोरगी कुठं भेटली तुला? अलिबाग आईच्या अंगातली बाई रडत रडत उद्गारली. लग्नाक आमच्या सहा वर्षे झाली तरी आमका मूल होत नव्हता. त्याच तानातून आम्ही 3 वर्सापूर्वी थैसर त्या बाथरूम मध्ये आत्महत्या केली. पण आमका मुक्ती मिळाली न्हाई. बाथरूमला कायम टाळा लावण्यात आला. आमचे आत्मे तिथं अडकले होते संतान शोधत होते आणि त्या दिवशी टाळा तुटलेला होता वाटत आणि ही पोरगी आत आली. आणि पाहताक्षणी आमका आमचा चेडवा अशी असेल वाटलं म्हणून आम्ही तिच्या मागावर आलो. तिका त्रास देऊचय नव्हतय माका, आमका तिला आमच्यासोबत घेऊन जायचा हा... अस ती बाई म्हणताच माझ्या अंगावर काटा आला. आजी तर शून्यात पाहत होती त्या दोघांकडे. बाबाने पुढची कथा ऐकून न घेता त्यांच्यावर ती राख टाकली. दोघे पुन्हा ओरडू लागले. आईचे डोळे लाल झाले होते. सोडूची नाय सोडूची नाय अस म्हणत तिने मगाशची सूरी उचलली आणि स्वतःच्या गळ्यावर फिरवली मी डोळे मिटून घेतले आणि दोन मिनिटे स्मशान शांतता पसरली. मी डोळे उघडले आई निपचित पडली होती.फरशीवर तीच रक्त सांडलं होत. या सगळ्यात हकनाक माझ्या आईचा बळी गेला होता. मी काय करू मला त्या क्षणी काही सुचत नव्हतं. मी फक्त ओरडत किंचाळत होते. आजीपन आईच्या देहापाशी येऊन बसली होती. बाबा बेशुद्ध होऊन पडले होते. हा मांत्रिक बाबा उठून झोळी घेऊन लंगडत लंगडत निघून गेला. मगाशी हा नीट होता आणि आता हा असा का? मला विचार करायला वेळ नव्हता. मी आईकडे बघून जोरजोराने रडू लागले. स्वतःला दोष देऊ लागले. आजवर मी त्या साठी स्वतःला दोषी ठरवलं आहे. बाबा बेशुद्ध पडले खरे पण एक बाजू त्यांची पूर्ण अधू झाली. स्वतःच आयुष्य त्यांच्या सेवेत रुजु केलंय आता मी. नंतर मला स्वप्न किंवा कसलाच वाईट अनुभव आला नाही. शिक्षण सूरु केलं पण मन रमत नव्हतं. आजीला काम होत नाहीत जास्त ती पण आजारी च असते. त्या दिवशी आईच श्राद्ध होत आम्ही ते घरी छोट्या पद्धतीने पार पाडलं. आणि त्या रात्री मला पुन्हा एक स्वप्न आलं तीन नाग एका मागोमाग एक दोन नागिणी आणि एक नाग दरवाज्याच्या फटीतून माझ्याकडे येत होते.......

समाप्त...


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror