Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Kakade Tejas

Horror Thriller


3.8  

Kakade Tejas

Horror Thriller


शॉर्टकट

शॉर्टकट

5 mins 394 5 mins 394

अस म्हणतात की आयुष्यात कधी कधी शॉर्टकट घेणं खूप महागात पडू शकत. सरळ मार्गाने जात राहाल तर नक्कीच तुमच्या ठिकाणावर जाल. 

मी खूप चकवा या विषयावर गोष्टी वाचल्या आहेत त्या बद्दल चे किस्से देखील ऐकले आहेत परंतु जे माझ्यासोबत घडलं तो नक्की चकवा होता की मी लवकर पोहोचण्याच्या नादात घेतलेल्या शॉर्टकट ची मला मिळालेली शिक्षा होती. 

मामाच गाव लहानपण माझं सगळं मामाच्या गावाला गेलं. मामाकडे शेती भरपूर होती. मग लहापणापासूनच मला शेती बद्दल भयानक ओढ होती. मामाकडे शेती होती ती पण बागायत होती पाण्याची काही तिकडे कमी नव्हती. 8 ते 9 वर्षे मी मामाच्या गावातच होतो त्यामुळे मला गावचे आणि रानातले सगळे रस्ते तोंडपाठ होते. शनिवारी दुपारी शाळा सुटली की तसच एकटाच रानात जायचो. छोटा होतो इयत्ता दुसरीमध्ये असेल मी गावाला लागूनच एक नदी होती. नदीच्या पलीकडल्या तिरावरून रानात जावं लागायचं त्याच तीरावर गावची स्मशानभूमी होती. तेव्हा ना तिला शेड होत ना काही अशीच मोकळी जागा होती कितीवेळा ठरवलं ना नाही लक्ष्य द्यायचं रानात जाताना त्या जागेकडे तरी ते लक्ष्य जायचंच त्या जागेकडे. गवत राख पडलेली असायची ते सगळं पाहून मला धडकीच भरायची पण आता शेड आहे तरीपण गेलं तरी धडकी भरतेच गावचे लोक तरी बाहेरच प्रेत जाळतात. वयाच्या १० व्या वर्षी मी गाव सोडून शिक्षणासाठी पुण्याला आलो. आता पुण्यातच शिकतोय पण जेव्हा पण मला सुट्टी लागते मी त्याच्या दुसऱ्या च दिवशी मामाच गाव गाठतो.

असच मी गेल्यावर्षी डिसेंबर च्या महिन्यात सुट्टी साठी आजोळी गेलो. शेतात ऊस भरपूर होता आणि त्याला पाणी वेळेवर द्यावं लागायचं आणि गावाला लाईट चा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे माझे आजोबा सकाळचे रानात निघून जायचे. आणि 12 पर्यंत घरी यायचे.काही दिवसांनी ऊसतोड सुरू झाली,आणि माझे आजोबा दिवसभर रानात असायचे. एक दिवस डबा तयार नव्हता आजोबा सकाळी निघून गेले. आणि डबा घेऊन जायची जबाबदारी माझ्यावर आली. मी थोडा घाबरलो कारण स्मशानभूमी च्या इथून जायचं होतं. ठरवलं मनाशी एखाद्या मित्राला फोनवर बोलत जाऊया. आजीने डबा दिला. मी निघालो डबा घेऊन,नदीच्या पुलावर आलो आणि पहिली नजर स्मशानभूमी च्या शेड कडे गेली. आणि पाहून धडकी भरली. थंडीचे दिवस जरी असले तरी ऊन मात्र जबरदस्त होत. मित्राला फोन लावला आणि निघालो. स्मशानभूमी पाशी आलो तिथे शेड पाशी एक भला मोठा पिंपळाच झाड होतं. जास्त भीती ते झाड पाहून वाटायची.

फोनवर बोलता बोलता परत तिकडे लक्ष्य स्मशानभूमी कडे गेले. तिथे लाल की गुलाबी रंगाचा एक कपडा पडला होता,राख दिसत होती आणि काही वैरण पडलेली दिसत होती. तो गुलाबी कपडा तर अजून माझ्या डोळ्यासमोर दिसतो मला. थोडस पुढे आलो आणि सुटकेचा निःश्वास सोडला. चला काही झालं नाही बाबा निघालो फोनवर बोलत बोलत असाच पुढे जात राहिलो जवळपास 15 ते 20 मिनिटे फोन चालू शेवटी मित्र च बोलला ठेव... म्हणून मग काय नाईलाजाने ठेवावा लागला. कच्ची वाट होती बाजूला बाभळीची झाड होती. रस्त्याला कोणीच नव्हता. कुठेतरी ट्रॅक्टर चालू होता त्यावरच 'जीता था जिसके लिये' गाणं स्पष्ट ऐकू येत होतं. असच इकडे तिकडे बघत चालू लागलो आणि एका वळणावर येऊन पोचलो. तिथे 2 रस्ते होते एक सरळ गेला होता जो रानात जाताना थोडासा लांब पडायचा आणि एक उजवीकडे गेला होता जो शॉर्टकट होता पण कोणीही एकटा त्या वाटेने गेलं नव्हता. मला पण सक्त ताकीद दिली होती त्या वाटेने कधी एकट्याने यायच नाही. तिथे मी जरा थांबलो मागे कळकाच बेट होत. थोडासा मी गोंधळात पडलो होतो नक्की काय करावं. दोन वर्षांपूर्वी मामासोबत या शॉर्टकट ने गेलो होतो आणि लवकर पोचलो होतो. सरळ गेलो तर लांब पण पडेल आणि मला आला होता एकट चालायचा कंटाळा. मग म्हणलं चला घ्या शॉर्टकट अस म्हणत चालू लागलो उजवीकडच्या रस्त्याने. मोबाइलला गाणे लावले आणि चालू लागलो आजूबाजूला झाडावर मव्हाळ दिसतंय पाहत होतो.

खूप दिवस झाले होते रानातला मध खाऊन. या वाटेने फक्त 3 वावर पालथी घातली की चौथ का पाचवं शेत आमचं होत. आणि त्याच्या खालच्या अंगाला विहिर होती त्या विहिरीपाशी असलेल्या शेतामध्ये ऊसतोड चालू होती. 10 मिनिटामध्ये मी पोचनार होतो मी त्या वाटेने. डोक्यावर ऊन होत एकटाच चालत होत. ढेकळ तुडवत बराच वेळ मी चालत होतो पण वाट संपत होती ना ते वावर संपत होत. नेमकी फोन मध्ये वाजणारी गाणी बंद झाली. पाहतो तर काढून रानात होतो नेटवर्क नव्हतं. आता मात्र भीती वाटायला लागली होती 10 मिनिटांचा चांगला अर्धातास झाला होता पण मी अजून पोचलो नव्हतो. आता मात्र माझी चांगलीच तंतरली होती. आणि अचानक जाणवलं की कोणीतरी पाठलाग करतय माझा. हे माझ्या लक्षात यायला आणि माझ्या मागून 'शुक शुक इकडे बघ' असा आवाज यायला एकच वेळ. पळू की मागे वळून पाहू काही कळत नव्हते,शेवटी काही विचार न करता मी पळू लागलो मी हातात डब्याची पिशवी आणि मी नुसतच पळत होतो. पळत येऊन एका उसाच्या शेतापाशी येऊन थांबलो. आणि जरा हायसे वाटले. वाटलं कदाचित आपण तीन वावर पालथी घालून आलो असेल. पण आजूबाजूला पाहिला तर तो संपूर्ण परिसर मला नवखा वाटत होता या आधी कधी मला अस झालं नाही पण आजच का अस होतय कुठे आलोय मी काय झालंय नक्की? काय घडतंय? कोण होत माझ्या पाठलागावर? कोणाचा आवाज होता तो? असे असंख्य प्रश्न माझ्या मनात गोंधळ घालत होते. आणि तेवढ्यात पुन्हा तोच आवाज "शुक शुक इकडे बघ". आता पळायची पण ताकत माझ्या अंगात उरली नव्हती. तरीही पळायचा मी प्रयत्न करत होतो आणि तो आवाज माझ्या जवळ येताना मला माझ्या जवळ येताना जाणवत होता. फक्त आवाज एवढाच येत होता शुक शुक! मी जिवाच्या आकांताने ओरडलो वाचवा पण कोणीही तिथे मला माझ्यासोबत दिसत नव्हतं. 

आणि आवाज जवळ येत होता आणि शेवटी मी त्या ढेकळात डोळे झाकून पडलो. आणि दुसऱ्या दिवशी त्याच गावच्या स्मशानभूमीत शेड च्या बाहेर एक सरण रचलं गेलं होतं. आणि त्या सरणावर मी शांत झोपलेला होतो. लोक आपापसात चर्चा करत होती,सरळ वाटेने यायचं तर कशाला त्या वाकड्यात शिरला. आता त्या मुंजाने आणखी एक बळी घेतला............


Rate this content
Log in

More marathi story from Kakade Tejas

Similar marathi story from Horror