Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Ulhas Joshi

Inspirational


3  

Ulhas Joshi

Inspirational


जपानी कसे काम करतात?

जपानी कसे काम करतात?

4 mins 809 4 mins 809

ताज हॉटेल ग्रुपने जपानधील श्री. मसाकी इमाई यांना हॉटेलच्या स्टाफसाठी एक कार्यशाळा (Workshop) घेण्यासाठी आमंत्रीत केले होते.

 

हॉटेलमध्ये काम कारणार्‍या लोकांच्या मनात अनेक शंका कुशंका होत्या. त्यांच्या मते ताज ग्रुपमधील सर्व हॉटेल्स उत्तम कामगीरी करत होती. तसेच मसाकी यांना हॉटेल इन्डस्ट्रीचा कसलाच अनुभव नव्हता. मग ते काय शिकवणार, वेगळे काय सांगणार असे सगळ्यांना वाटत होते. तरी सर्वजण सकाळी 9 वाजता कॉन्फरन्स हॉलमध्ये जमा झाले.

 

आधी श्री. मसाकी यांची ओळख करून देण्यात आली. अत्यंत साधी पर्सनॅलिटी. इंग्लीशसुद्धा साधारणच. अनेक वेळा इंग्लीशमधून बोलताना अडखळत होते.

 

‘गुड मॉर्निंग! मला सांगीतले आहे की इथे एक वर्कशॉप घ्यायचे आहे. पण मला वर्क पण दिसत नाही आणि शॉपपण दिसत नाही. तर ज्या ठिकाणी प्रत्यक्ष काम चालते तेथुन सुरवात करुया. आपण पहिल्या मजल्यावरच्या पहिल्या रुमपासून सुरवात करूया!’ मसाकी म्हणाले

 

हॉटेलचे सिनियर मॅनेजर्स, वर्कशॉपला आलेले सर्व कर्मचारी, व्हिडिओ शुटींगसाठी आलेले कॅमेरामन सगळे मसाकींच्या मागोमाग बाहेर पडले आणि पहिल्या मजल्यावरील पहिल्या रुमपाशी आले.

 

ती लॉन्ड्री रूम निघाली.

 

मसाकींनी खोलीत प्रवेश केला, खिडकीतून बाहेर पाहीले आणि म्हणाले, ‘वा! काय सुंदर दृष्य दिसते नाही?’

 

अर्थात हॉटेलच्या सगळ्या स्टाफला हे माहीत होते. हे सांगण्यासाठी एखाद्या जपानी कन्सल्टंटची आवश्यकता नव्हती.

 

‘इतक्या सुंदर रुमचा उपयोग लॉन्ड्रिसाठी करून तुम्ही ही रुम वाया का घालवता? लॉन्ड्री खाली बेसमेन्टमध्ये शिफ्ट करा आणि या रुमचे रुपांतर गेस्ट रुममध्ये करा.’ मसाकींनी सांगीतले.

 

मॅनेजर म्हणाले, ‘होय असे करता येईल!’

 

‘मग चला! तसे करूया!’ मसाकी म्हणाले.

 

‘होय! मी वर्कशॉपच्या रिपोर्टमध्ये हा मुद्दा आवश्यक घालीन.’ मॅनेजर म्हणाले.

 

‘माफ करा! हा मुद्दा रिपोर्टमध्ये लिहिण्यासाठी नाही. लगेच आपण ही गोष्ट करूया! आत्ताच्या आत्ता!’ मसाकी म्हणाले.

 

‘काय? आत्ता लगेच?’ मॅनेजर म्हणाले.

 

‘होय! या खोलीतील सामान लगेच खाली शिफ्ट करा. बेसमेन्टमध्ये जागा शोधा. दोन एक तसात हे काम होऊ शकेल नाही का?’ मसाकी म्हणाले.

 

‘होय’ मॅनेजर म्हणाले.

 

‘आपण लंचच्या आधी येथे भेटुया. तोपर्यंत या रुममधील सर्व सामान खाली शिफ्ट झाले असेल! तसेच ही रूम फर्निचर, कार्पेटसह तयार व्हायला हवी. आज रात्रीपासून तुम्ही ही रूम भाड्याने देऊन पैसे कमवायला सुरवात करायला हवी.’ मसाकी म्हणाले.

 

‘ठीक आहे सर!’ मॅनेजर म्हणाले कारण त्यांना दुसरा कोणताच ऑप्शन नव्हता.

 

नंतर ते सगळे पॅन्ट्रीमध्ये गेले. तेथे दारातच दोन भले मोठे सिंक होते व त्यात न धुतलेल्या प्लेट्सचा ठीग पडला होता. मसाकींनी जॅकेट काढले आणि प्लेट्स धुवायला सुरवात केली.

 

‘सर! तुम्ही हे काय करता आहात? ‘ मॅनेजरने विचारले. तो बिचारा पार गोंधळून गेला होता.

 

‘काम! मी प्लेट धुतो आहे!’ मसाकी म्हणाले.

 

‘सर! पण आमच्याकडे प्लेटी धुण्यासाठी वेगळा स्टाफ आहे.’ मॅनेजर म्हणाले. त्याकडे दुर्लक्ष करत मसाकी म्हणाले, ‘ हे सिंक प्लेट धुण्यासाठी आहे. शेजारीच धुतलेल्या प्लेटी ठेवण्याचे स्टॅन्ड आहेत. या सर्व प्लेटी धुऊन, स्वच्छ करून त्या स्टॅन्डमध्ये गेल्या पाहीजेत!’

 

सगळ्यांनीच प्लेट्स धुवायला सुरवात केली. थोड्याच वेळात सर्व प्लेट्स स्वच्छ धुवून, पुसून स्टॅन्डमध्ये गेल्या सुद्धा. ऑफीसर्सना वाटले की हे आम्हाला जपानी कन्सल्टंटने सांगायची पाळी यावी!

 

प्लेटी धुण्याचे काम संपल्यावर मसाकींनी विचारले, ‘ तुमच्याकडे अशा किती प्लेट्स आहेत?’

 

‘पुष्कळ! शॉर्टेज पडु नये म्हणून.’ मॅनेजरने उत्तर दिले.

 

मसाकी म्हणाले, ‘जपानी भाषेत एक शब्द आहे ‘मुडा’! मुडा म्हणजे दिरंगाई! मुडा म्हणजे वेळेचा आणि पैशांचा अपव्यव. मुडा म्हणजे वायफळ खर्च. तुमच्याकडे जर पुष्कळ प्लेटस असतील तर प्लेट धुण्याच्या कामात दिरंगाई होऊ शकते. ही परिस्थिती सुधारण्याचे पहिले पाऊल म्हणजे ज्या जास्त प्लेट्स आहेत त्या काढुन टाकणे.’

 

‘होय! मी माझ्या रिपोर्टमध्ये हे लिहीन.’ मॅनेजर म्हणाले.

 

‘नाही! रिपोर्ट लिहिण्यामध्ये वेळ वाया घालवणे हे सुद्धा ‘मुडा’चेच लक्षण आहे. आपण आत्ताच्या आत्ता ज्या जादा प्लेट्स अहेत त्या एका बॉक्समध्ये घालुया आणि या हॉटेलच्या ज्या इतर डिपार्टमेन्ट्सना याची गरज आहे त्यांना देऊन टाकूया. आता या संपूर्ण वर्कशॉपमध्ये हा ‘मुडा’ कोठे कोठे दडुन बसला आहे हे आपण शोधुन काढणार आहोत.’

 

त्यानंतरच्या प्रत्येक सेशनमध्ये सर्वजण हा ‘मुडा’ शोधण्यात आणि तो कसा काढून टाकता येईल याचा विचार करण्यात दंग होते.

 

शेवटच्या दिवशी मसाकींनी एक गोष्ट सांगीतली.

 

‘शिकारीची आवड असलेले एक जपानी आणि एक अमेरिकन जंगलात भेटले. ते दोघे घनदाट जंगलात शिरले आणि अचानक त्यांच्या लक्षात आले की बंदुकीच्या गोळ्या संपल्या आहेत. तेवढ्यात त्यांना सिंगर्जना ऐकु आली आणि दोघांनी पळायला सुरवात केली. पण जपानी मधेच थांबला आणि त्याने स्पोर्ट शूज चढवले.

 

अमोरिकन म्हणाला, ‘हे तु काय करतो आहेस? आपण आधी माझ्या कारपाशी पोचायला हवे.’

 

जपानी म्हणाला, ‘ मी सतत पुढे असेन याची काळजी मला घ्यायला हवी.’

 

कारण जपानी माणसाला ठाऊक होते की जर सिंहाने हल्ला केला तर तो मागे राहिलेल्या माणसावर करेल. मग त्याची भूक शांत झाल्यावर तो पुढे असलेल्या माणसावर हल्ला करणार नाही आणि पुढे असलेला माणूस सुरक्षीत राहील.

 

‘याचा अर्थ असा की हल्लिच्या जगात स्पर्धा एवढी तीव्र झाली आहे की तुम्ही ईतरांपेक्षा, दोन पावले का होईना, सतत पुढे राहिलात तरच तुमचा निभाव लागेल. आज तुमच्याकडे भरपूर नैसर्गीक संपत्ती असलेला प्रचंड मोठा देश आहे. तुम्ही जर तुमचे खर्च कमी केलेत आणि सतत उत्कृष्ट ते देण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही ईतर देशांच्या मानाने कितीतरी पुढे रहाल!’

 

एवढे बोलुन मसाकी यांनी या वर्कसॉपचा समारोप केला.Rate this content
Log in

More marathi story from Ulhas Joshi

Similar marathi story from Inspirational