श्री. उल्हास हरी जोशी यांची थोडक्यात माहिती
उल्हास हरी जोशी यांचा जन्म 24 मे 1946 चा. शिक्षणाने ते मेकॅनिकल इंजिनिअर आहेत पण त्यांचे सर्व करिअर मार्केटींग व सेल्स मध्ये घडले असून त्यांना 48 वर्षांचा मार्केटींग व सेल्सचा अनुभव आहे. त्यांनी किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, किर्लोस्कर न्युमॅटीक, मायको... Read more
श्री. उल्हास हरी जोशी यांची थोडक्यात माहिती
उल्हास हरी जोशी यांचा जन्म 24 मे 1946 चा. शिक्षणाने ते मेकॅनिकल इंजिनिअर आहेत पण त्यांचे सर्व करिअर मार्केटींग व सेल्स मध्ये घडले असून त्यांना 48 वर्षांचा मार्केटींग व सेल्सचा अनुभव आहे. त्यांनी किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, किर्लोस्कर न्युमॅटीक, मायको (बॉश), स्वराज माझदा, साई सर्विस, बाजाज, टाटा मोटर्स इत्यादी कंपन्यांमध्ये काम केले.. सन 2002 पासुन ते आर्थिक सेवा क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी भरपूर प्रवास केला असून अनेक वेळा परदेशात जाऊन आले आहेत.
एक छंद म्हणुन त्यांनी लोखनाला सुरवात केली. त्यांचे ‘मार्केटिंग’ या विषयावरचे ‘Marketing For Everybody’ हे इंग्रजी पुस्तक 2005 साली अमेरिकेत प्रसिद्ध झाले. त्यांचे अनेक लेख सांगलीहून प्रसिद्ध होणार्या ‘आम्ही उद्योजिका’, पुण्याहून प्रसिद्ध होणार्याअ ‘ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका, व्यापारी मित्र, उत्तम कथा’ तसेच नाशीकहून प्रसिद्ध होणार्याा ‘अमृत’ या मासीकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. तसेच पुण्याहून प्रसिद्ध होणार्याा सकाळ, महाराष्ट्र टाईम्स, प्रभात या वर्तमानपत्रांमधून त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात. नुकतेच त्यांचे पुण्याचे यशस्वी उद्योजक ‘डी. व्ही. ब्रह्मे’ यांच्या चरित्रावर आधारीत ‘कर्मयोगी’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. ई-साहित्य प्रतिष्ठान तर्फे त्यांची ‘हिंमते मर्दा, यशोयुतांम वंदे, निती संपदाची, पाऊल पडते पुढे, मिसेस बी-नाबाद 104 ही पुस्तके प्रकाशीत झाली आहेत.
हल्लीच्या मराठी तरुण तरूणींनी नोकरीच्या मानसिकतेमधून बाहेर पडून उद्योग व्यवसायाच्या मानसिकतेमध्ये शिरावे या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालु असतात. तसेच मराठी माणसाची आर्थिक साक्षरता वाढावी या दृष्टीने पण ते प्रयत्नशील असतात.
Read less