कॉर्पोरेट कल्चर
कॉर्पोरेट कल्चर


एक छोटी मुंगी होती. ती एका कारखान्यात काम करायची. ती रोज सकाळी लवकर कामावर यायची. मेहेनतीने, मनापसुन, प्रामाणीकपणे काम करायची. आनंदाने घरी जायची. तिची प्रॉडक्टिव्हिटी उच्च पातळिची व दर्जाची होती.
तिच्या कंपनिचा चीफ एक वाघोबा होता. त्याने पाहिले की कोणत्याही ‘सुपरव्हीजन’ शिवाय ही मुंगी एवढे चांगले काम करते. तिला जर एक सुपरव्हायजर दिला तर ती आणखी चांगले काम करील.
त्याने एका झुरळाची सुपरव्हायजर म्हणुन नेमणुक केली. या झुरळाला सुपरव्हायजर म्हणुन बर्याच वर्षांचा अनुभव होता व तो ‘एक्सलंट रिपोर्ट्स’ लिहिण्यामधे एक्सपर्ट होता. त्याचा पहिला निर्णय हा घड्याळ्याची सिस्टीम (Clocking System) बसविणे हा होता. त्याला रिपोर्टस लिहिण्यासाठी व टाईप करण्यासाठी एका सेक्रेटरिची गरज होती. त्याने यासाठी एका कोळ्याची नीवड केली. त्याचे मुख्य काम झुरळाने निर्माण केलेला कागदांचा ढीग संभाळणे व टेलिफोन कॉल्स घेणे हे होते.
झुरळाच्या रिपोर्टसवर वाघोबा खुश होता. त्याने झुरळाला प्रॉडक्षन रेट्स व त्यात होणारे बदल यावर निरनिराळे ग्राफ्स काढायला सांगीतले. कारण वाघोबाला पुढच्या ‘बोर्ड मिटींग’ मधे प्रेझेन्टेशन देण्यासाठी या ग्राफ्सचा उपयोग होणार होता.
त्यामुळे झुरळाला एक कॉम्युटर व लेझर प्रींटर वीकत घ्यावा लागला. त्याचे आय.टी. डिपार्टमेन्ट मॅनेज करण्यासाठी त्याने एका माशिची नेमणुक केली.
मुंगिच्या लक्षात हे नवीन बदल कांही केल्या येत नव्हते. तिचा जास्तीत जास्त वेळ रिपोर्टरुपी कागद निर्माण करण्यामधे व फालतु मिटींगमधे वाया जाऊ लागला. तिला मनातुन या सगळ्याचा तीटकारा येत होता. खरे काम राहिले बाजुलाच आणि फालतुगिरीच जास्त असे व्हायला लागले होते.
वाघोबाला वाटले की मुंगी ज्या डिपार्टमेन्टमधे काम करते त्या डिपारमेंटसाठी ‘हेड’ नेमण्याची गरज आहे. त्याने एका मुंगळ्याची या जागी नेमणुक केली. मुंगळ्याने पहिले काम काय केले असेल तर आपल्या केबीनसाठी उत्तम कार्पेट व स्वतःला बसायला एक उत्तम, आरामदायी खुर्ची खरेदी केली. त्याला पण कॉम्युटरची व असिस्टंटची गरज होती. म्हणुन त्याने आपल्या पहिल्या डिपारमेंटमधील आपल्या असीस्टंटला आणले. त्याच्यावर ‘वर्क कंट्रोल आणि बजेट कंट्रोल स्ट्रॅटेजीक ऑप्टीमायझेन प्लॅन’ (म्हणजे काय कोणास ठाऊक) बनवण्याची जबाबदारी सोपवली.
आता ज्या डिपार्टमेन्ट्धे मुंगी काम करते ते एक दुःखी डिपार्टमेन्ट झाले आहे. आता तेथे कोणी हसत नाही. चेष्टा मस्करी करत नाही. पुर्विचे खेळिमेळिचे वातावरण लोप पावले आहे. सगणेजण उदास दिसु लागले आहेत.
मुंगळ्याने त्याच्या बॉसला म्हणने वाघोबाला कनव्हीन्स केले आहे की मुंगिच्या डिपारमेंट मधील एकुणच वातावरणाचा गंभीरपणे अभ्यास करण्यात यावा.
वाघोबांच्या पण लक्षांत आले की नवीन चेंजेस नंतर मुंगिच्या डिपारटमेन्टमधील प्रॉडक्षन खुपच खाली आले आहे.
त्याने एका घुबडाची नीवड केली. हा घुबड एक अत्यंत नावाजलेला कंसल्टन्ट होता. कारखान्यातील कामांचे ऑडीट करुन त्याला सोल्युशन्स सुचवणे हे त्याचे प्रोफेशन होते. घुबडाने तीन महिने रीसर्च केला. भली मोठी फी उकळली. अनेक खंड असलेला, हजारो कागद असलेला एक भला मोठ्ठा रिपोर्ट तयार करुन वाघेबाला सादर केला. त्या रिपोर्टचा मतितार्थ एका ओळीत सांगण्यासारखा होता. ‘मुंगिचे डिपार्टमेन्ट ओव्हरस्फाफ आहे. स्टाफ कमी करणे आवश्यक आहे.’
वाघोबाने कोणाला सर्वात पहिल्यांदा फायर केले ठाऊक आहे?
मुंगिला! कारण तिच्यात मोटीव्हेशन कमी आहे आणि निगेटीव्ह ऍटिट्युडस आहेत म्हणुन.
एका मेहेनतिने, मनापसुन, प्रामाणीकपणे काम करणार्या मुंगिच्या करीयरचे मात्र वाटोळे झाले.
‘कल्चर’ म्हणजेच संस्कृती हा फार फसवा शब्द आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक कंपनिला एक कॉर्पोरेट कल्चर असते त्याचप्रमाणे प्रत्येक कुटुंबाला पण एक ‘कल्चर’ असते. पण पुष्कळवेळा ही ‘कल्चर्स’ नुकसानकारकच असतात.
आपल्या कंपनिचे व कुटुंबाचे कल्चर असे नाही ना याची खात्री करुन घ्या!