जन्म आधीच नाव ...
जन्म आधीच नाव ...
एक गमतीदार गोष्ट अशी आहे ,एक मजवी बहिणीचे नाव मी जन्म आधीच ठेवला आहे .कसा तर... आईला सातवा -आठवा महिने झाले होते पोटात शव हालचाल करीत होता .आई म्हणायची या बाजूला डोक्स आहे आता मुलगी येऊ शकते .मी त्याप्रमाणे गाणे म्हणता म्हणता एक नाव सापडला ( आगांता ) हे नाव ह्या आधी होता की नाही माहिती नाही ,पण मी नाव मुखपाठ केला व आईला म्हटलं ' हिच्या नाव आगंता आहे वो ' व तसेच नंतर ही जन्म आल्यानंतर तेच नाव ठेवण्यात आला .मी लहान असताना खूप मोठा गायकच होतो जणू ..शेतात जवळ जवळचे पाखरा माझ्यामुळे उडून परायचे ,एक सागवानच्या पानाचे वर्णन करून त्याच्यावर पण गीत रचला होतो आजही आठवते ते गीत .आई मला खूप शिव्या द्यायची ' तुझं तोंड घाव होईल तुला माहिती आहे का ' ? म्हणायची पण मी तिच्याकडे दुर्लक्ष करायचे आपल्या धुंदीत राहायच्या मोकळ्या वेळी .
पूर्वी हेड कुर्या माणसांची खूप दब दबा असायचे .म्हणजे लहान मुलांना पळवून नेऊन देवाजवळ बली चढवणारे ,गैरसमज अशी होती की शेतात किंवा देवांना माणसाची बळी दिल्याने खूप उत्पादन वाढ येतो .यांच्या भीतीने आम्ही जर खेळत असताना कुणी अनोळखी व्यक्ती वाटेवरून येताना दिसला की ,झाडाच्या आड आम्ही सर्व एकामागे एक लपायचे आणि तो माणूस निघत वरी सर्व थोडा थोडा सरकत राहायचे .अशी आमची जीव वाचवण्याची युक्ती असायची .भोवा लोकं खूप येत होते ,पंधरा- दहा दिवसांनी ' जय गंगा जय गंगा 'ची गाणी मनात येत असत .कधी हत्ती वाले तर कधी साप वाले कधी गुंग असल्याची सोंग करून बिल पावती बुक पकडून यायचं आणि इसराने पैसे मागून पावत्या द्यायची .पण कुणाला वाचता येत नसल्याने काही अर्थच समजत नव्हता आणि तो माणूस गावाबाहेर गेला की त्यांच्या माणसासोबत बोलत होता .कधी अस्वल वाले तर कधी नाही नंदीबैलवाले कधी जादू वाले आणि यांना प्रत्येक ाची घरातून एकेक खुळो धान्य ,शेरसीदा ,पैसे द्यावे लागत असे .आणि आमचे लोकांना त्यांची भाषा पण बोलता येत नव्हता ,म्हणूनच तरी गरिबी दूर होत नव्हती वाटते .राशी भविष्य सांगणारे कुणाला डाव पाहून ,तू होळीच्या चित्तेत उडी मारणार आहेस असेही ज्योतीष सांगायचे ,नंतर त्याला सनी कटवल्याने मौत सोडू शकते असे गुमवुण कास ताट कासगढवा त्यात दिवा पेटवून त्यात मंत्र पूजा करून सनी कटप केल्यावर म्हणायचे .हे ताट घडवा आम्ही मार्कंडेला देवा जवळ पोहोचवून देणार ,तू ठेवशील तर सनी कटणार नाही असे लुबाड व्हायचे .
उपासमारीची समस्या येत होते पण आम्हाला आमचे मायबाप कधीच उपाशी झोपवले नाही आहेत .बा दुकानातले कणीक विकत घेऊन आणायचे ,त्यांना आई खुलत्या मिसळून स्वयंपाक करायची व आम्हाला जेवायला द्यायची .पण आम्ही अन्नासाठी भांडण कधीच व्हायचे नाही ,आम्ही सर्व वाटून खायचे .खरा जिवन तर आमच्या मोहा दारू च्या जोडजाड आधारावर चालायच्या .आजोबा ,काका कुटुंबातले लोकं बा ला पार विरोध करायचे ,बुटी कवडी सुद्धा दिले नव्हते ,शेती पण दिले नव्हते अन राहायला घर पण दिले नव्हते .जबरांनची थोडी शेती करत होते बा ,दादाजीकडे खूप बैल जोडी होते . दुसऱ्यांना भाड्याने देत होते पण बाला हिस्साप्रमाणे म्हणून एकच लहानशी बैल दिली होती ,म्हणून बा नी एका मराराराकडून पुन्हा एक बैल मागून आणला होता असेच एक वर्ष शिकवायला साठी म्हणून .पण त्याला त्याच लोकांनी चढवल्यामुळे त्यांनी भाडा घेतला ,एक कँडी धान्य आमच्या घरून नेले मराराराणी .मी आई जवळ जाऊन कशाला देता वो म्हणत नाराजी व्यक्त करत होतो ,आमच्यासाठीही धान्य उरले नाही .आई मग मला समजावून सांगितली. आई बा झोपडी सारखी स्वतः बनवलेल्या घरात आम्ही राहायचे . बाबाकडे कुऱ्हड पण नव्हता , गावातील सर्व माणसं कार्पोरेशन पेपर मिल च्या बांबू कटाई च्या कामावर जात होते, बा विचार करीत बसले होते , रामसाय नावाच्या त्याचं मित्र आपली जुनीपुराणी कुऱ्हाड दिला .त्याला बा चांगली धार मारून कामावर जायचं केला .पैसा कमावला ,त्या पैशातून एक जुनी सायकल घेतला होते .आमच्या खूप आवडीचे वस्तू ठरला होता .सायकल चालवायच्या शिकताना ताई सोबत आम्ही कितीतरी वेळा पडलो होतो ,दोन्ही पायांचे मोठे अंगठ्याचे टपोरी निघाले होते .पण सोडलं नाही चांगला शिकला होतानं , एक दिवशी गावातीलच दुसऱ्या टोल्यातील व्यक्तीने चोरी करून सायकल दुसऱ्या गावी नेऊन लपवून ठेवला होता .तो माणूस असे चोरीचे काम कितीतरी केला होता .गोष्ट माहीत झाल्यावर मला त्याची राग आला होता .चोरी मला अजिबात आवडत नव्हते ,एक दिवशी तो माणूस सकाळ सकाळ आपल्या घरासमोरून जात होता ,आम्ही खेळत बसलो होतो ,मी मोठीच कुठला फेकून मारलं त्याला .बरोबर दोन्ही टोंगऱ्यांना लागला ,आई बा व इतर पाहले ते माणसं माझ्यावर चिडले मोठ्या माणसांना नाही मारायचे असते .तुझी सायकल आणून देतील उद्यान परवा भेटलीच आहे आत्ता .त्यांनी पण आणून देण्याची वचन दिला ,खरच त्याला शीक्षच झाला असेल .मेला पण चोरीचे काम पून्ह केला नाही ,मी मोठा बदमाशच होतो वाटते .
पुढील पेज .,..( ३ )' डूंगणा ' मध्ये .......

