एक दिवसाची शाळा...
एक दिवसाची शाळा...
प्रथम हात जोडूनी वंदन करितो त्या परमात्माला ,जे आम्हाला माणूस बनविला आहे .आणि ज्यांनी गोड- कडू चारुनी लहानाच्या मोठा केले त्या आई -बापांना , तसेच ज्ञान पाजण्याची व दिशा दाखवण्याची कष्ट केले असे गुरु शिक्षकांना ,व इथ पर्यंत ढकलत - ढकलत पोहोचविणारा माझ्या समाजाला मी कधीच विसरणार नाही ....
पावसाळ्यात शाळा सुरू झाले आणि आम्ही दररोज नियमितपणे शाळेला जायचे ,शाळा दिड- दोन किलोमीटर अंतरावर दुसऱ्या टोल्यात होती. मध्ये एक नदी आहे , पूर्वी आजूबाजूला खूप जुडूपाणी घेरलेला होता.अर्धे पोरं कधी -कधी या झुडूपांमध्ये लपणारे व संध्याकाळी शाळेतून येत असल्यासारखे घरी येणारे ,पण आम्ही यांच्यापासून दूर राहायचे .
एक दिवशी आम्हाला नदीवर आडवा झाले , आम्हाला खूप भेवडावले ते मोठे पोरं - पोरी असल्यामुळे आम्ही त्यांचे दबावा खाली आलो. एकदा- दोनदा नापास होऊन ,डबल -टिबल एकच वर्गात बसत असल्याने व नेमका त्यांना मास्तर लोकं तरी खेळण्यात हुशार असल्याने नापास करायचे , म्हणून ते वयाने मोठे होते .आम्हाला सहलीला चला म्हणून मोठ्या जंगलात नेले .एका झुडपाखाली साफसूफ करायला लावले ,जवळपास कुणाची तरी शेती असलेली कुणाला तरी माहिती होता म्हणून कुऱ्हाड आणले अन् ते डारा फांद्या तोडून झोपडी तयार केले . त्यात आम्हाला वर्ग शाळा सारखे बसवून पुस्तका हातात घेऊन मास्तरासारखी शिकवायला लागले .आम्ही सात-आठ विद्यार्थी आणि ते तीन पोरा तीन पोरी मास्तर मॅडम बनले होते. विचारल्याप्रमाणे प्रश्नांची उत्तरे नीट दिले नाही तर हातात चढा घेऊन होते .दे... बत्ती मारायचे. दुपारचे जेवण सुट्टी दिले , जेवणाचे गठोडे सगळ्यांकडे असल्यामुळे सगळ्यांची जेवण झाली . आता पोरांनी एक-एक पोरीचे हात पकडून अलग- अलग दिशेने सटकवले ,आम्ही तिथे विद्यार्थीच राहिलो होतो. संध्याकाळची वेळ होत आली होती. सगळ्यांना खूप भीती वाटू लागली ,घरी जायचे म्हणून कसतरी भटकत -भटकत घरी परतलोनं , कुणालाच माहिती व्हायला नको म्हणून शाळेतूनच येत असल्यासारखा जाऊ लागलोनं पण कुठून तरी गोष्ट फुटला होता .घरी गेल्याबरोबर बाबाचे दे...बत्ती मार... मी रडू -रडू सांगायचे असे म्हटले तसे म्हटले म्हणून .
दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर मास्तराचे दे.. बत्ती मार ...,आता कान पकडलो अन् नियमितपणे शाळेत जाऊ लागलो ,
दुसऱ्या वर्षी सहावी वर्गात गेलो होतो. तेव्हा बावनकर आडनावाचे मास्तर आले होते , पण चौथी पासून लहान वर्गांना शिकवीत होते .यावर्षीपासून सहावी -सातवी वर्गाचे विज्ञान, मराठी आणि इतिहास हे विषय शिकवायला सुरुवात केली होते.
मोठं कडकं .... गड़ गढ़ठ शिकवणं...
मध्येच सगळ्यांना विचारायचे , 'समजला का रे '
अन् आम्ही ..समजलं ना समजला ,' हो ऽ ऽ सर ' म्हणायचे .मी माझे मित्रांसोबत मागे बसायच्या, ते वेगळ्या -वेगळ्या जातीचे होते म्हणून त्यांना काही पोरं खूप टिंगल उडवायचे .दोघे -तिघे ' मरार ' होते, त्यांना ( मरार कांदा बिडी़ बांधा ) म्हणत त्यांची टिंगल उडवायचे आणि ' ओडिया ' जातीचे दोन पोरं होते त्यांना (ओडिया माठी खोडिया) म्हणत. हे त्यांचे जाती आणि त्यांचे वडिलांचे पोट भरण्यासाठी करत असलेल्या कामधंदे वरून असे चिडवत असत काही पोरं, पण मी कधीच त्यांच्या जातीच्या नावाने बोलत नव्हतो .मला शिकवीत होते ते (जाती भेदभावाचे धडे) समजायचे , म्हणून त्यांना कमी समजत नसल्याने त्यांच्याशी माझे छान पटत असल्याने त्यांनी मला मागे बसून म्हणायचे तर मी त्यांच्यासोबत मागे बसायचो .
सर आमच्याकडे पाहून नेहमी म्हणायचे कसा बे ....वांडऱ्यावा... मला तर हा शब्दाच्या खूप राग यायच्या .काळजाला आग लागायच्या आणि अन् जर कुणाला उठवून त्यातलाच प्रश्नाचे उत्तर विचारले ,तर उत्तर बरोबर दिले नाही तर दे ...बत्ती मार ...त्यांच्या पिरेठला हात लाल ,गाल लाल मला तर खूप राग यायचे हा मास्तराच्या ,पण काय करावे उपाय नाही म्हणून त्यांच्या विषयांवर खूप अभ्यास करायचे .मधेच घटक चाचणी पेपर काढायचे 25 मार्काची ,पहिलाच घटक चाचणी पेपरात 25 मार्क पैकी मला 23 मार्क विज्ञान विषयांमध्ये आले होते. दुसरा दिवशी मला सरांनी वर्गात आल्यावर उठवले ,आता मला काय माहिती....
तेव्हा विचारले .... ' अरे ..विनोद ..उत्तर कुठूनही पाहून सोडविलास का रे..'
मी ठोस मनाने ...' नाही सर...' म्हणालो ,
मास्तर थोडं संतापले .
तेव्हा मास्तर म्हणाले ,' शहाणाला शब्दाचं मार होतो , पुन्हा काय विचारायचे पुढे दिसेलच ' आणि बस म्हणाले .
अन् मी त्यांच्या विषयांवर पुढच होतो , मात्र गणित आणि इंग्रजी हे विषय शत्रू सारखे वाटायचे . आवडायचे ही मात्र डोक्यात नीट बसायचे नाही आणि आमच्या वेळी इंग्रजी विषय पाचवी वर्गापासून लागू झाला .जर याच्या जागी ( गोंडी ) असतं तर शंभर पैकी शंभर मार्क नक्कीच...!! विज्ञान माझा आवडीचा विषय म्हणून सहावीला वार्षिक पेपर 100 पैकी 82 मार्क होते .
आमच्या वर्गात ' साधना ' नावाची एक मुलगी होती. दोन किलोमीटर बाहेर गावावरून येना -जाण करीत होती .लई सुंदर दिसायची ,मात्रा शिक्षणामध्ये ( ड ) च होती .पण एका घटक चाचणी पेपरात जे लिहिली होती ते पाहून सर सुद्धा विचारात पडले , वाक्यप्रचार प्रश्न होता ( पैसे खाणे : )म्हणजे काय ? तर त्याचे उत्तर होतो , गुप्तपणे कुणाला माहिती होऊ न देता पैसे हडप करणे किंवा उष्ण पैसे परत ना करणे.... पण तिने काय लिहिली होती , पैसे खाणे म्हणजे ( मरण पसंद करणे ) सर ,तिला उठवले आणि म्हणाले ..तुझे उत्तरेला मी चुकी देऊ शकत नाही आणि बरोबरही देऊ शकत नाही हे असेच जाऊ द्या म्हणाले .
शाळेला पूर्ण सुट्टीची बेल वाजली की वर्गातून निघण्याआधी आम्हाला प्रणायम म्हणायला लावत होते . अन् सर निघून ऑफिस खोलीत जायचे. आम्ही सगळे पोरं मांडी घालून ताट बसून दोन्ही हाताची अंगठे व अंगठे लागत च्या एक बोट चिपकवून आणि तीन बोटा सरळ , डोळे बंद करून तीन वेळा लांब स्वरांनी ओ ऽऽऽऽ ऽ म ... म्हणत असत. लहान वर्गत तसं नसायचं त्यामुळे काही मुली धावत आमच्या वर्ग खोलीच्या दारापाशी यायचे व " ओ ..! मधमाशी ये.. मधमाशी व्हेत " म्हणत चिडबुड करत असायचे. आमच्या ओठांवर हसू येण्यालायकच बोलायचे आणि जसे आमचे डोळे उघडे झाले की धूम पळायचे .
वाचक मित्रांनो..... स्टोरी आवडल्यास नक्की लाईक करा, तुमची एक लाईक मला अंधारातून उजेडात आणू शकते .पुढे खूप सारे स्टोरी आणणारच करिता फॉलो व कमेंट करायला विसरू नका ,मी फार तुमचे मनापासून आभारी राहीन .
धन्यवाद...

