Vilas Yadavrao kaklij

Drama Romance Fantasy

2  

Vilas Yadavrao kaklij

Drama Romance Fantasy

"जनी"(भाग-८)

"जनी"(भाग-८)

4 mins
18


दुसऱ्या दिवशी राजेश नेहमीप्रमाणे आपल्या ऑफिसला जाण्यासाठी निघाला मात्र त्याच्या मनामध्ये सतत विचार घोळत होते. की आई-वडिलांना जपावे की जनी ला. याचा विचार तो मनामध्ये करत होता याच विचारांमध्ये तो ऑफिसला पोचला मात्र त्याचं मन ऑफिसमध्ये लागत नव्हत. दिवसभर त्याच्या मनामध्ये तेच विचार घोळत होते. वडिलांना मात्र आपण एकुलत्या एक मुलाला आजपर्यंत दुखावले नव्हते त्यामुळे त्यांनाही मनस्ताप झाला. होता व त्यांचा बीपी हाय झाला होता. दुपारी अचानक राजेश ला ऑफिसमध्ये हॉस्पिटलमधून फोन आला. तुझ्या वडिलांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले असून हॉस्पिटलला येऊन भेटा! तेव्हा मात्र राजेशला काय करावे सुचत नव्हते. त्यांनी ऑफिसच्या मित्रांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये पोचला तोपर्यंत आईने त्याच्या मित्रांना हकीगत कळवली होती. तेव्हा सर्व मित्र, मैत्रिणी राजूच्या आधी हजर होती. हळूहळू साधारणत: अडीच तासानंतर राजेशचे वडील शुद्धीवर आले.! राजेश त्यांच्या पाया जवळ बसला होता व त्यांनी सांगितले की बाबा तुमच्या मनाविरुद्ध मी कोणतीही गोष्ट करणार नाही. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचा विचार करू नये. असं म्हणून त्याने वडिलांना थोडा दिलासा दिला. सर्व मित्र आणि मैत्रिणी राजेशच्या वडिलांच्या कॉटजवळ सारे उभे होते. साऱ्यांच्या डोळ्यामध्ये त्याच्यां विषयी असणारे प्रेम, आपुलकीचे दर्शन पहिल्यांदा राजेश च्या वडिलांना झाले. राजेश च्या आईने राजेश च्या वडिलांचे मित्र म्हणजेच "कमला" आणि तिच्या वडिलांनाही निरोप पाठविला होता. तीन ते चार तास राजेशचे वडील बेशुद्ध असल्यामुळे राजेश च्या आईचे मनामध्ये झालेली चलबिचल व भवितव्य, धोके बघून तिने त्यांना निरोप दिला दुसऱ्या दिवशी परत कमला व तीचे वडिल हॉस्पिटलमध्ये आले. राजेश च्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये आठवडाभर थांबण्यास डॉक्टरांनी सांगितले कारण वयानुरूप व तब्येती नुसार त्यांचा बीपी केव्हाही वाढू शकतो व त्यांच्या मनामध्ये असलेले विचार शांत होईपर्यंत त्यांना कोणताही मानसिक त्रास देऊ नये व कोणत्याही प्रकारचा विचार करण्यास भाग पाडू नये. असा डॉक्टरांनी सल्ला दिला. तेव्हा कमला आणि तिचे वडिल हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर अर्धा-एक तास थांबले. तेव्हा राजेश च्या वडिलांसमोर राजेश ची आई म्हणाली अगं कमला ! वडिलांना जाऊ दे तू दोन दिवस थांब. आपण याची काळजी घेऊ, मलाही मदत होईल. कमलाने ऑफिशिअली अडचण सांगितल्या...! व मी थांबू शकत नाही. कमला तिच्या वडिलांनी कोणीही इच्छा दर्शवली नाही. कारण तिला त्या हॉस्पिटल चे वातावरण बघुन नाक मुरडले. तेव्हाचं राजेश च्या मैत्रिणी पैकी दोघे तिघी मैत्रिणी राजेश च्या आईला सांगितले आम्ही तुमच्या जवळ थांबतो. राजेश चे वडिल काय समजायचे ते समजले. तोपर्यंत इतर मित्र आणि मैत्रिणी परत आल्या व त्यांनी राजेश च्या आईला थांबण्या चा आग्रह करू लागल्या राजेश च्या आईने त्यांना थांबण्याची परवानगी दिली. तेव्हा दोघा मैत्रिणींपैकी एक जनी होती. राजेश च्या वडिलांचा औषधे घेतल्यामुळे डोळा लागला होता. सायंकाळी सात वाजले होते. राजेश च्या आईने सांगितले. अगं तुम्ही निघा. तुम्हाला हॉस्टेलमध्ये उशीर होईल व नंतर तुम्हाला शिक्षा भोगावी लागेल! त्यांनी सांगितला आई चिंता करू नका आम्ही परवानगी घेवून आलो आहेत. त्यामुळे आम्ही तुमची सोबत करू... पाहिजे तर आम्ही होस्टेलमधून परवानगी काढलेली आहे... ! राजेश च्या वडिलांनी त्यांचं सारं संभाषण ऐकलं होतं.तेव्हा मात्र त्यांना जाणीव झाली.खरे प्रेम... ! कशामध्ये असते. आपुलकी, जिव्हाळा हे माणूस कोणत्या परिस्थितीमध्ये वाढला आहे किंवा घरची श्रीमंती पेक्षा त्याच्या मनामध्ये असणार प्रेमाची आवश्यकता आहे. रात्री जेव्हा-जेव्हा डोळे उघडले तेंव्हा त्या दोघी मुली बसून होत्या. मात्र राजेश च्या आईचा डोळा लागला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी परत तयारी करून परत या हॉस्पिटलमध्ये आलेल्या दिसल्या.

रात्रभर थांबल्यानंतर मात्र राजेश यांच्या वडिलांना कमला विषयी आणि पैशाचा अहंकार असलेली स्वतःच्या मित्राची मुलगी तिच्याविषयी तिरस्कार निर्माण झाला व या आपण तीस्कार करत असून सुद्धा... ! केवळ प्रेमापोटी व आपल्या माणसांना त्रास होऊ नये यासाठी कोणतीही अपेक्षा न बाळगता हॉस्पिटलमधे थांबल्या होत्या व डॉक्टरांनी राजेश च्या वडिलांना सांगितले होते की नशीब... तुम्ही मृत्यूच्या दारातून परत आले आहेत, तेव्हा राहिलेले दिवस मनमुराद जगाव.. तुमच बोनस आयुष्य आहे.तेव्हा मात्र राजेश च्या वडिलांचे डोळे उघडले व त्यांनी सांगितले की इथून पुढे मी इतरांच्या प्रेमासाठी, आनंदासाठी.., राहिलेले जीवन खर्च करेल .त्यांच्या बोलण्यात . वागण्यात .हॉस्पिटल मध्येच बदल दिसून येत होता . आठवड्याने राजेशच्या वडिलांना डिस्चार्ज मिळाला व ते घरि येण्यासाठी निघाले तेव्हा त्यांना पोहोचवण्यासाठी राजेश चे मित्र व मैत्रिणी बरोबर होत्या. तेव्हा मात्र नकळतपणे राजेशच्या वडिलांनी त्याच्या मैत्रिणींना इशारा केला व माझ्याजवळ बसा. मला काही बोलायचे आहे असे म्हणून त्यांनी मैत्रिणींना बसून घेतले व विचारपूस आणि चौकशी केली तेव्हा मात्र या दोन्ही मैत्रिणींच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी कारण विचारले तेव्हा, काही नाही बाबा. हे प्रेमाचे आनंदाश्रू आहे. तुमचं जर काही बर वाईट झालं असतं तर... ? राजेश च्या आयुष्यामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला असता व आम्ही आयुष्यामध्ये आमचा मित्र दु :खी असल्यामुळे सहाजिकच आम्ही दुःखी झालो असतो. त्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे.बरं येतो आम्ही.असं म्हणून त्या जाऊ लागल्या. यांच्या वडिलांनी त्यांना परत या मला बरं वाटेल आणि मला भेटण्यासाठी जरूर या.. ! असे म्हणून त्या दोन्ही निघाल्या राजेश च्या वडिलांनी राजेश च्या आईला सांगितल्याप्रमाणे मागची कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी ही उपयोगाचे नसून फक्त जीवाला जीव देणारी! मैत्रिण. सहचारिणी व साथीदार माझ्याप्रमाणेच राजुला ही मिळावी. अशी माझी इच्छा आहे त्याप्रमाणे मी राजूने पसंत केलेल्या मुलीशी लग्न करण्याची परवानगी देत आहे. तेव्हा मात्र राजेश यांच्या वडिलांच्या शब्दामुळे आईला खूपच आनंद झाला व ती आनंदाच्या भरात खाली हॉलमध्ये जोराने राजेश आवाज देउ लागली. तेव्हा मात्र त्यांनी राजेश ऑफिसला फोन करून तातडीने घरी येण्यासाठी निरोप पाठवला?

(क्रमाश: पुढील भाग .९)



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama