kanchan chabukswar

Drama

4.3  

kanchan chabukswar

Drama

जलपरी की म्हातारी

जलपरी की म्हातारी

4 mins
828


  एका कुप्रसिद्ध झोपडपट्टीच्या बाजूला काहीतरी काम केलेले दाखवायचं म्हणून एका राजकीय पक्षाने एक भलामोठा तरण तलाव बांधला. पण नेमकी करोना लाट आल्यामुळे त्याचा उद्घाटन करायचं काम दीड वर्ष रखडत पडलं. तलावाच्या बाजूच्या जिम मधली अवजार आणि रंगीबेरंगी फरशा देखील चोरी व्हायला लागल्या होत्या, त्यातून निवडणूक तोंडावर आलेली असल्यामुळे पक्षश्रेष्ठींनी सगळ्या खासदार आमदारांना कामाला लावलं की तुम्ही काय काय काम केलेली आहेत ती जनतेसमोर मांडा.

झालं. विभाग प्रमुख गटप्रमुख आमदार खासदार सगळे कामं दाखवण्यासाठी तयार झाले. परत काही खोटी बिले काढून तरण तलावाच्या डागडुजीचे काम झाले आणि त्याच्यामध्ये रितसर पाणी सोडण्यात आले.

खरं म्हणजे झोपडपट्टीच्या बाजूला शौचालयाचे नितांत आवश्यकता होती पण ते करायचं सोडून चमके गिरी करण्यासाठी म्हणून एक जमिनीचा तुकडा संपादित करून त्याच्यावरती एक छोटं व्यायाम शाळा आणि तरण तलाव असं त्या राजकीय पक्षाच्या आमदाराने बांधले. आता तरण तलाव बांधला म्हणजे त्याच्याबरोबर पुरुष आणि स्त्रियांसाठी वेगवेगळे स्वच्छतागृह बांधायला लागली.

   आता काहीतरी काम केले म्हणून त्याचे उद्घाटन करायला पाहिजे, मुळांमध्ये झोपडपट्टीच्या बाजूला तरण तलाव चेष्टेचा विषय झाला होता, कोण येणार तिथे पोहायला, गाड्या पार्क केल्या तर बऱ्याच सामानाची चोरी होत होती. चांगली घरातली मुलं मुली त्या वस्तीकडे फिरकतही नसत तरीपण प्रयत्न म्हणून आघाडीची चित्रतारका मनमोहिनी ला उद्घाटनाला बोलवण्यात आले.

   तरण तलावाचे उद्घाटन मनमोहिनी जलपरी सारखी पाण्यात पोहूनच करणार होती. त्याच्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली. पाण्यासाठी टेस्टिंग झालं, योग्य प्रमाणामध्ये क्लोरीन मिसळून झालं, सगळी साफसफाई झाली आणि उद्घाटनाला बरीच मंडळी बोलवण्यात आली. बरेच तरुण वर्ग आणि काही आंबटशौकीन मनमोहिनी ला पोहताना बघायला गर्दी करून आलेले होते. करोना काळ असल्यामुळे सामाजिक बांधिलकी पाळत सगळेजण दूर-दूर उभे होते, तरीपण तरण तलावाच्या आवारात दीड-दोनशे लोक जमले होते.

तरण तलावाचा उपयोग शहराच्या त्या बाजूच्या मुलांसाठी पोहण्याचा अभ्यास आणि काही स्पर्धांसाठी होणार होता. सुरुवातीला तरण तलावाची फी अगदीच कमी ठेवण्यात आली होती कारण गिराईक मिळविणे महत्त्वाचं होतं.

    मनमोहिनी चे खरे वय कोणालाच माहीत नव्हते, तिने बराच स्ट्रगल करून इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव कमावलं होतं, आधी नाटकांमध्ये मग टीव्हीवरचे पडद्यावर आणि आता काही सिनेमांमध्ये तिचं नाव झळकत होता. मनमोहिनी बरेच दिवस मॉडेल मधून पण वावरत होती. तिला बिकिनीमध्ये बघणे म्हणजे बऱ्याच जणांचे डोळ्याचे पारणे फिटणार होते.

    दसऱ्याचा मुहूर्त शोधून सगळी जुळवाजुळव झाली. आमदार घोडे पाटील, खासदार जगबुडवे, चीफ मिनिस्टर चे खास माणसं आणि दळणवळण खात्याचे मंत्री सुरेश राव नागमोडे उपस्थित होते.

 मनमोहिनी बरोबर तिच्या काही खास मैत्रिणी तसेच बरेच फोटोग्राफर, काही प्रसिद्ध न्यूज एजन्सीचे खबरे, अशी बरीच माणसं उपस्थित होती.

     मनमोहिनी आणि तिच्या मैत्रिणी सुरुवातीला पाण्यात सूर मारून तलावाच्या मध्यापर्यंत जाणार होत्या आणि तिथे बांधलेली रिबन तोंडाने सोडून त्याला लटकवलेले फुगे उडवणार होत्या.


       जमलेली गर्दी बघून नागमोडे यांना भाषण करायची सुरसुरी आली म्हणून त्यांनी ताबडतोब माईक हातामध्ये घेऊन त्यांचा पक्ष जनतेसाठी किती काम करत आहे याची जोरजोरात उजळणी केली. त्याच्या आधी आमदार घोडे पाटील आणि खासदार जगबुडवे यांचादेखील झोपडपट्टीतल्या मुलांना काहीतरी बक्षीस म्हणून आणि तसेच पंचक्रोशी मध्ये तरण तलाव उपलब्ध नसल्यामुळे हा तरण तलाव बांधल्याचे त्यांना जनतेला सांगायचे होते त्यांनी पण आपली हाऊस उरकून घेतली.


    भाषण सुरू असताना मनमोहिनी वेगवेगळ्या पोजेस देत फोटोग्राफरच्या डोळ्याचे पारणे फेडीत होती. खांद्यापर्यंत आलेले काळे मुलायम केस सुरेख बांधा डोळ्यावर गॉगल आणि अंगाभोवती फिट बसणारी बिकिनी याच्यामध्ये मनमोहिनी खरोखरच खूपच सुरेख दिसत होती. तिच्या सारख्या तिच्या चार मैत्रिणी देखील चिवचिवाट करत रंगीबेरंगी तोकड्या बिकिनी घालून फोटोग्राफरला पोजेस देत राहिल्या. तिच्यात अशा अवतारात जगबुडवे नागमोडे आणि घोडे पाटलांनी मनमोहिनी च्या टीम बरोबर फोटो काढून घेतले. स्वतःचे कपडे उतरून त्यांना पण पाण्यात शिरायची खूपच खुमखुमी आलेली होती पण लोकलाजेस्तव त्यांनी आपल्या अंगावरचे कपड्याचे ओझे सांभाळले.

       नारळ फोडून नागमोडे यांनी शकल दोन्ही बाजूला टाकली, तलावापाशी उदबत्ती वगैरे लावून पाण्याची त्यांनी रीतसर पूजा केली. आता पाळी मनमोहिनी आणि तिच्या मैत्रिणींची होती.

      उंचावरच्या शिडीवर चढून सोनेरी बिकिनी मधली मनमोहिनी दहा मीटर उंच जाऊन उभी राहिली. तिथून खाली सूर मारणार होती.

 टाळ्या , शिट्ट्या यांच्या गजरात मनमोहिनी ने हवेमध्ये दोन कोलांट्या उड्या मारून पाण्यामध्ये सूर मारला आणि ती पाण्याच्या खाली बराच वेळ श्वास रोखून पोहत राहिली. तिच्या चार मैत्रिणींनी एखाद्या मॉडेल प्रमाणे कोलांट्या मारत तिच्यासारख्याच पाण्यामध्ये सूर मारला. पाचही जणी दम धरून थोड्यावेळ पाण्याखाली एखाद्या मासोळीसारखी पोहत राहिल्या.

 फोटोग्राफर चे फ्लॅश चमकत राहिले, मंडळींनी आपले आपले मोबाईल काढून हा श्वास रोखून धरणारा देखावा आपल्या आपल्या मोबाईल मध्ये कैद केला. बऱ्याच बघ्यांनी पाचही सौंदर्यवतींच्या चा व्हिडिओ आपापल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला.

    मुलींनी मध्यावर जाण्यासाठी बराच वेळ घेतला, बराच वेळ त्या पाण्याच्या खालून पोहत राहिल्या, ठरल्याप्रमाणे पूर्ण तरण तलावला पाचही जणांनी दोन तीन चकरा मारल्या. आता त्या सगळ्या जणी चारही बाजूने म्हणून रिबीन उघडण्यासाठी मध्यावर्ती आल्या. आपल्या आपल्या तोंडात रिबीन धरून मुलींनी ती ओढली, त्यासरशी त्याला बांधलेले फुगे आकाशाच्या दिशेने रवाना झाले. लोकांनी टाळ्यांचा गजर केला. अजून थोडा वेळ पाण्यामध्ये विविध प्रकारे बटरफ्लाय ब्रेस्ट स्ट्रोक, फ्रीस्टाइल इत्यादी काही काही प्रकार दाखवत मुली पोहोतच राहिल्या. सरतेशेवटी सगळ्याजणी बाहेर यायला तयार झाल्या, जगबुडवे, नागमोडे हातात टॉवेल धरून उभेच होते.

आधी चार मैत्रिणी बाहेर पडल्या आणि सरतेशेवटी मनमोहिनी. तिला बघताच सगळ्यांचा वासलेला जबडा तसाच राहिला.

मनमोहिनी च्या चेहऱ्यावरती सुरकुत्या स्पष्ट दिसत होत्या, आणि तिचे काळे रेशमी केस पांढरे शुभ्र झाले होते.

अचानक तरण तलावामध्ये विचित्र शांतता पसरली, मनमोहिनी टॉवेल गुंडाळून स्त्रियांच्या खोलीमध्ये पाठवण्यात आले, थोड्याच वेळात खोली मधून जोरात किंकाळ्या ऐकू आल्या." नो नो. हे काय झाले?" अशा काहीच्या अर्थाच्या त्या किंकाळ्या होत्या.


    मनमोहिनी चे बदललेलं रूप देखील बर्‍याच जणांनी कॅमेरामध्ये बंदिस्त केलं होतं

 पाण्यामध्ये घुसताना गेलेली सुरेख रूपवती तरुण मनमोहीनी बाहेर पडली तेव्हा खरं वय दाखवत.


    पाण्यात काही गडबड नव्हती ना? आमदार घोडे पाटील यांनी तरण तलावाच्या नेमलेल्या मॅनेजरची ऑफिस मध्ये जाऊन कॉलर पकडली. आणि सगळा उलगडा झाला.

स्वच्छतेच्या गडबडीमध्ये तरण तलावांमध्ये दोन वेळेला क्लोरीन सोडण्यात आलं होतं त्याच्यामुळे मनमोहिनी चे रंगवलेले काळे केस मूळ रूपांमध्ये परत आले चेहऱ्यावरचा मेकअप वितळून जाऊन मूळ कातडी उघडी पडली.

     तेव्हापासून म्हणे तरण तलावांमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलींनी आपले पैसे परत घेतले आता झोपडपट्टीचे मुलं तिकडे जाऊन उड्या मारतात. तरण तलावाचं नाव" म्हातारी चा तलाव" पडलं आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama