STORYMIRROR

Amruta Gadekar

Drama

2  

Amruta Gadekar

Drama

झाकली मूठ सव्वा लाखाची...!

झाकली मूठ सव्वा लाखाची...!

1 min
236

एकदा एका मंदिरात पूजेला एक राजा येणार आहे असे त्या पुजार्‍याला कळले... त्याने सहा हजार रुपयांचे कर्ज काढले आणि देऊळ चांगले सजवले रंगवले.


राजा पूजेला आला आणि त्याने दक्षिणा म्हणून चार आणे ठेवले. पुजार्‍याला तिथेच घाम फुटला. आपण सहा हजार कर्ज काढून मंदिर रंगवले आणि राजाने फक्त चार आणे दक्षिणा ठेवली... आता या चवण्णीछाप राजाला अद्दल घडवायचीच.

 

पुजारी हुशार होता... राजा गेल्यावर पुजार्‍याने ते चार आणे मुठीत घेतले आणि सगळ्यांना सांगू लागला... "राजाने मंदिरात दान केलेली एक वस्तू आहे. ती मला झेपणार नाही. म्हणून मी तिचा लिलाव करतोय. आपापली बोली लावा."


आता राजाने वस्तू ठेवलीय म्हटल्यावर साधी ठेवली असेल का...? पहिलीच बोली दहा हजारपासून... सुरु झाली. पुजारी डोके हालवूनच 'नाही परवडत' असे म्हणत होता. लिलावातील बोली वाढत वाढत पन्नास हजारावर पोहोचली.

 

तिकडे राजाला पहारेकरी म्हणाला, "महाराज, पुजाऱ्याने आपण मंदिरात दान केलेल्या वस्तूचा लिलाव सुरु केला आहे आणि ती वस्तू तो दाखवतही नाही आणि सांगतही नाही, मुठीत ठेवलीय..."


राजाला घाम फुटला. तो पळत पळत आला आणि पुजाऱ्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाला, हे माझ्या बाप्पा, सव्वालाख देतो पण कुणाला ती वस्तू दाखवू नको...."


तेव्हापासून ही म्हण रुजू झाली.... झाकली मूठ सव्वालाखाची....


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama