STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Comedy Fantasy

4  

akshata alias shubhada Tirodkar

Comedy Fantasy

जेठालाल चे स्वप्न

जेठालाल चे स्वप्न

2 mins
295

जेठालाल गडा साधा मजेशीर माणूस नेहमी संकटाना आ बैल मुझे मार अशी त्याची परिस्थिती संकट ओढवली कि त्याचा फायर ब्रिगेड मित्र तारक हयाची त्याला नेहमी आठवण येते असा हा जेठालाल !

घरातून नेहमी प्रमाणे घाईगडबडीत जेठालाल दुकानावर जाण्यासाठी निघाला शिडी उतरताच त्याला मिसेस बबिता नजरेस आल्या त्याना पाहून जेठालाल तर सात अस्मान उप्पर गेला 

"हाय बबिताजी गुड मॉर्निग "

"गुड मॉर्निंग जेठाजी"

"काय बबिताजी वॉल्क वरून आला वाटत"? 

"हो जेठाजी माझ्या दिवसाची सुरवात तर मॉर्निंग वॉल्क पासून च सुरु होते "

"वाह्ह बबिताजी तुमच्या कडून सगळ्या बायकांनी प्रेरणा घ्याला हवी खरंच खूप अभिमान वाटतो कि तुम्ही आमच्या सोसायटी मध्ये रहात "

"थँक क्यू जेठाजी एवढ्या मोठ्या कॉम्प्लिमेंट्स साठी बाय द वे तुम्हला उशीर होत असेल ना "?

"नाही म्हणजे हो बर बाय "

गेट बाहेर येताच जेठालाल ने रिक्षा पकडली व सरळ दुकानाची वाट धरली रिक्षा दुकाना समोर थांबली रिक्षेचे पैसे देऊन जेठालाल मागे वळला त्याची नजर दुकानाच्या बोर्ड वर केली 

अरे हे काय हा बोर्ड कोणी बदला आणि नाव सुद्धा गडा इलेक्ट्रॉनिक्स सोडून भागा इलेक्ट्रॉनिक्स हे कसं शक्य आहे जेठालाल पटकन दुकानाचा दरवाजा उघडतो आणि आत जातो 

"भागा तू इथे का बसलास आणि बाहेरचा बोर्ड कोणी बदला "?

"हो हो जेठालाल जी अहो मालकच्या नावावरच बोर्ड असतो ना"?

"मला तू जेठालाल म्हणालास आणि मालक तू वेडा झालास तू "

"नाही जेठालाजी तुमीच तर मला हे दुकान दिलंय ते हि विकत "

"काय मी तुला दुकान विकले कधी '

"हो आणि मी पैसे पण दिले तुम्हला "

"काय बोलतोस भागा हे दुकान काय १० रुपयाला विकले? काय एवढे पैसे तुच्या कडे कुठून आले "

"असं काय करता जेठालाल जी तुमीच तर मला तुमच्या ओळखीच्या बँक मधून लोन घेऊन दिल ना "

"काय मी भागा तू वेडा झालास का नट्टू काका कुठे आहे "?

"ते ना पेढे आण्याला गेले येतील"

" कसले पेढे "?

"अहो असं काय करता माझ्या मालकीचा पहिला दिवस ना "

"काय चालाय भागा मी तुला दुकान विकून मी काय करणार "

"ते मला कसं माहित, ते तुम्ही मला नाही सांगितलं "

"भागा मस्करी पुरे झाली चल "

"शेठजी कोणी मस्करी करत नाही आहे हेच सत्य आहे "

"भागा "

"हो आता तुम्ही जा विश्रांती ह्या तुम्हाला सगळं आठवेल"

"कोणाचं तोंड पाहिलेलं सकाळी असं व्हयला? अरे पण बबिताजी माझ्या साठी तर गुड लक आहे तरी पण असं झालं "

"भागा भागा हे बरोबर नाही भागा "

"ये जेठिया "

'बापूजी भागा कुठे केला "?

"भागा ये बबुचुक तू घरात आहेस भागा दुकानावर असेल "

"काय "?

"हो उठ आता दुकानावर जायला उशीर होईल "

"हो बापूजी" 

स्वप्न खरं होऊ देऊ नको असे देवाकडे साकडे घालीत जेठालाल रिक्षेत तुन बाहेर पडून पहिला बोर्ड पाहतो बोर्डवरचे नाव वाचतो गडा इलेकट्रोनिकस तेव्हा कुठे त्याच्या जीवात जीव येतो 

"धन्यवाद देवा वाचवल्या बदल "



Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy