STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Comedy Fantasy

3  

akshata alias shubhada Tirodkar

Comedy Fantasy

जेम्स बॉण्ड पोहोचला कोकणात

जेम्स बॉण्ड पोहोचला कोकणात

2 mins
257

जेम्स बॉण्डला कोकणातून आमंत्रण आलं ते देसाई यांचेकडून. देसाई व जेम्स बॉन्डचे जवळचे संबंध. काही वर्षांपूर्वी परदेशी स्थायिक असलेले देसाई एक वर्ष झाले सगळं सोडून आपल्या गावी कोकणात स्थायिक झाले होते. मित्राचे बोलावणे येताच जेम्स बॉण्डने पटकन होकार कळवला. पण गावात जेम्स बॉण्ड येणार हे मात्र देसाईंनी गुपितच ठेवले आणि जेम्स बॉण्ड कोकणात पोहोचला.


"थँक क्यू सो मच जेम्स तू आल्याबद्दल..."


"ओ नो थँक्स प्लीस यू आर माय फ्रेण्ड ओके..."


"या मला माहित आहे जेम्स..."


"सो व्हाय यु कॉल्ड मी?"


"अरे तुला कोकण फिरायला बोलवलं मी थोडं रिलॅक्स हो. नेहमी तुझी दगदग असतेच..."


"यु आर राईट देसाई..."

 

"आणि माझं तुझ्याकडं कामही आहे म्हणजे मला तुझी मदत हवी आहे..."


"मदत... टेल देसाई एनिथिंग फॉर यू..."


"तुला मी नेहमी सांगत होतो की आमची कोकणात आमराई आहे म्हणून..."


"आमराई मीन्स व्हॉट..."


"मेनी मँगो ट्रीस..."


"एस देसाई, तू खूपदा सांगितले. बट यू डिडन्ट गेव्ह मी..."

 

"अरे तोच तर प्रॉब्लेम आहे. एवढी वर्ष लोकच आमचे आंबे खात आणि ज्याला पाहणीसाठी ठेवलेला... त्याला तर मी कामावरून काढून टाकले. एवढी वर्ष आमच्या नशिबी एक पण आंबा आला नाही. या वर्षीही झाडावर खूप आंबे पिकले आहेत. यावर्षी मला ते लोकांच्या घशात घालायचे नाही आहे म्हणून मी बोलवलं..." 


"मी काय मदत करू शकेन यात..."


"काय आहे जेम्स गावातले लोकच चोरतात रे पण गावातले म्हणून मी त्यांना पटकन विचारू शकत नाही. कारण काही झाले तरी एक नातं आहे ना... तू जर त्यांना पकडलं तर मात्र मी काहीतरी बोलू शकेन की पाहा तुम्ही असे करून आपल्या गावाची प्रतिमा काय दाखवता पाहुण्या समोर वगैरे आणि त्या आमराईत आमचे फार्म हाऊस आहे तिथे तू राहणार सो एन्जॉयमेंट प्लस लिटल वर्क असेल तुला..."


"देसाई तू मला तुझ्या आंब्याच्या सिक्युरिटीसाठी बोलवलं... अरे धिस इस नॉट कप ऑफ माय टी... अरे मी ऍक्शनमध्ये हिट आहे असल्या कामात नाही..."


"मला माहित आहे जेम्स पण मी इथे CCTV कॅमेरे लावले कोणी सिक्युरिटी गार्ड ठेवला तर लोकांना कळेल... सो मला चोर पकडायचा आहे पण रंगे हाथ..."


"कॅन यू इमॅजिन देसाई जेम्स बॉण्ड आंबे राखतोय हाव इट लूक्स..."


"बॉण्ड मला माहित आहे तू नेहमी ऍक्शन केलीस यावेळी काहीतरी वेगळं..."


"ओके फॉर यू मी करणार..." 


जेम्स फार्म हाऊसवर राहायला जातो. सकाळी आमराईतल्या आंब्याची पाहणी करायचं... त्याचा दिनक्रम झाला... दर दिवशी पाहणीत त्याला आंबे कमी दिसायचे... असेच दिवस गेले... आमराईतले निम्मे आंबे नाहीसे झाले... चोर काही पकडला गेला नाही हे आपल्याला जमणार नाही म्हणून बॉण्डने परतण्याचे ठरवले...


"सॉरी देसाई मला काही जमलं नाही बट थँक्स फॉर गिविंग मी लवली डेज ऑफ कोकण माशे व्वा मी खूप एन्जॉय गेलं..."


"इट्स ओक बॉण्ड..."


"साहेब मी सांगितलेलं तुम्हाला की काही उपयोग होणार नाही... अहो, आपल्या गावात एकमेकांचे घेऊन खाण्याची सवय पूर्वीपासूनची आहे... गाव म्हटल्यावर आपण सगळे एक आहोत कोणी परकं नाही म्हणून कोणाचेही हक्काने तोडून खातात... बोलायला गेल्यावर दातही आपले ओठही आपलेच होतात..."


"खरं आहे तुझं..."


"जेम्स तुझ्यासाठी मात्र दोन पेटी आंबे फिक्स्ड..."


"ओ रिअली..."


दोन पेट्यांसह जेम्स परदेशी परततो...


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy