STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

2  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

जाती धर्माच्या पलीकडे..

जाती धर्माच्या पलीकडे..

2 mins
136

अनिष्ट तो अधर्म, इष्ट तो धर्म...

आपण जर इतर धर्मीय नसलो तर नक्कीच हिंदू आहोत...

आपल्या सर्व रेकॉर्ड ला ते आहेच...

धर्म बदलता येते..जात नाही...

इतर धर्मीयांचा आदर करायला प्रत्येक धर्म शिकवतो.. दुसऱ्या धर्माचा आदर करतो तोच खरा धर्म...

विचार धर्माचा करत बसू नका... विष पेरु नका.. धर्म कोणीही बदलणार नाही... कोणालाही आचरणाचे बंधन नाही.. आपणास जे योग्य वाटेल ते आचरण आपण करू शकतो.. सर्व धर्म सर्वांना खुले आहेत...

प्रश्र्न आहे.. आपल्या भुतकाळ, वर्तमान, भविष्याचा...

अस्पृश्य असलेले बाबासाहेब केवळ ज्ञान, शिक्षण आणि कार्य यांच्या जोरावर विश्वरत्न झाले.. हेच आपणास लागू पडेल..तुमची ओळख तुमची जात नी धर्म नसून,तुमची विद्वत्ता, कार्य,ज्ञान, शिक्षण ही आहे.

या जगात ज्ञानी व गुणी लोकांचा सन्मान होतो, लोक त्यांची पूजा करतात.. जात,धर्म ही ओळख नाही, कर्तृत्वाने तुम्ही सर्व काही मिळवू शकता...

आपणास गरज आहे, विकासाची,प्रगतीची, आणि परिवर्तनाची.... विकास, परिवर्तनाच्या वाटेवर जात, आणि धर्म ही पायरी कुठेच नाही..

जात, धर्म ही जर अधोगती कडे घेऊन जात असतील तर ते पूर्णता सोडून द्या...विद्वान,ज्ञानी, सद्गुणी, सदाचारी, सद्वर्तनी बना.

लोक तुमची ओवी,आरती, पोवाडे गातील एवढे तुम्ही महान बना.तुमच्या कार्याचा ठसा उमटवून तुमचा आदर्श निर्माण करा... तुमच्या जिद्दीने तुमचे ध्येय ठरवून ते गाठा व यशाच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान व्हा.. प्रत्येक संकटावर मात करून, सर्व अडथळे दूर करून,हवी ती मदत घेऊन ध्येय गाठा,

कर्तबगार,विद्वान,ज्ञानी वा...बाबा आमटे, फुले, शाहू, लहूजी, फकिरा, आंबेडकर, अण्णाभाऊ,ए.पि.जे कलाम यांचे आदर्श घ्या...जात, आणि धर्म या गोष्टी वर चुकुनही विचार करू नका.. डोक्यातून पूर्ण पणे काढून टाका...तुमचे भले जाती धर्मात नाही.. तुमच्या कर्मात, कर्तृत्वात, विकास,प्रगतीत आहे.. स्वता बरोबर समाज, राष्ट्राची प्रगती हिच देशभक्ती, राष्ट्रभक्ती,नी समाजसेवा आहे.. तुम्ही पुढे जा, समाजाला पुढे न्या...

सद्सदविवेक बुध्दीने विचार करा, मानवता जपा वाढवा.. धर्म जपू या, अधर्म नको..


जय हिंद...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational