Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others


4.0  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others


जागतिक महिला दिन

जागतिक महिला दिन

3 mins 185 3 mins 185

8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून जगात साजरा केला जातो.त्या दिवशी कर्तुत्ववान महिलांचा सन्मान केला जातो. यात प्रामुख्याने प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. भारतात राजकीय क्षेत्रात पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नाव घ्यावे लागेल.राष्ट्रपतीपदावर प्रतिभाताई पाटील यांचे नाव अभिमानाने घ्यावे लागेल. शिक्षणक्षेत्रात सावित्रीबाई फुले,फातिमा शेख यांचे नाव विसरून चालणार नाही.क्रीडा क्षेत्रात पी.टी.उषा, हे नाव जगभर गाजलले आहेत. क्रीडाविश्वात अनेक महिलांनी आपली यशस्वी वाटचाल करत आहेत.सामाजिक क्षेत्रात मदर तेरेसा,सिंधूताई सपकाळ यांचे नाव अग्रणी घ्यावे लागेल.


संरक्षण क्षेत्रात आता महिला उतरल्या आहेत. भारताच्या सीमेवर आज त्या देशाचे रक्षण करत आहे. अंतराळ क्षेत्रात कल्पना चावला यांचे नाव आहे. पोलिस दलात अनेक महिला कार्यरत आहे. त्यात किरण बेदी पोलिस महासंचालकपदी (दिल्ली)म्हणून पहिल्या महिला होत्या. स्वातंत्र्यसंग्रामात रणरागिनी म्हणून झाशीची राणी, कस्तुरबा, सरोजिनी नायडू पंडिता रमाबाई, अहिल्याबाई होळकर यांचे नाव अजरामर आहे. त्या काळात अनेक जाती धर्माच्या महिलांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभाग घेतला होता.


आता महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे.मेट्रो पायलट,विमान पायलट,रेल्वे ड्राईव्हर ,बस ड्राईवर ,रिक्षा ड्राईव्हर,कंडक्टर म्हणून पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन स्वता:च्या पायावर उभ्या आहेत.त्या स्वावलंबी झाल्या आहेत.बर्याच मोठ्या प्रमाणात जल,स्थल,वायु ह्या तिन्ही क्षेत्रात फार मोठ्या संख्येत आता त्यांची कार्यझेप आहेत. शेतीविकास,औद्योगिक क्षेत्रात महिलांनी क्रांती केली आहेत.जिल्हाधिकारी,आयुक्त,शिक्षण संचालक,शिक्षणाधिकारी प्रोफेसर,शिक्षिका, वकील,डॉक्टर,इंजिनीयर,तहसीलदार ही सर्व मह्त्त्वाची पदे आज त्या भूषवित आहेत.


परंतु आजची प्रगती का झाली?कशी झाली?यात कोणा कोणाचे योगदान आहे?यात असलेल्या महिला, महापुरुषाचा इतिहास विसरता कामा नये.क्रांतीकारी महिलांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. जुन्या चालीरीती व आजच्या चालीरीती यात काय साम्य आहे ते समजून घेतले पाहिजे.आपल्याला कोणते संस्कार योग्य आहे.याची चर्चा व प्रबोधन होणे काळाची गरज आहे.भारतीय संस्कार आणि भारतीय संस्कृती यांची जपणूक केली गेली पाहिजे.विज्ञानाने व शिक्षणाने आपण किती ही पुढे गेलो तरी देशाची अस्मिता म्हणजे भारतीय स्री तिने देश व कुटूंब सुखी,समृद्ध राहण्यासाठी काय उपाय करता येईल यावर चिंतन करण्याची गरज आहे.


पूर्वीच्या वाईट प्रथा,अंधश्रद्धा झुगारल्या पाहिजे.स्री मासिक पाळीत तिचा स्पर्श अशुभ मानने.कुठल्याही विधवा स्रीला शुभकार्यात स्थान न देणे.तिला कमी लेखणे,एखाद्या मुलबाळ नसलेल्या स्रीला वांझूटी म्हणून हिणवने हे बंद झाले पाहिजे.आपल्या कुटूंबात मुलगी जसी आईवडिलांवर प्रेम करते तेव्हढेच प्रेम सासू सास-यावर करावे ही भावना मुलींमध्ये रुजविली पाहिजे.मुलींमध्ये चांगले संस्कार जर रुजविले तर अनेक कुटूंब सुखी समाधानाने राहतील.सुनेने मुलीचे प्रेम देणे.सासु सासरे आई वडिलां समान मानने.त्यांचा आदर करणे ही आपली संस्कृती आहे.आपल्या मुलीलाच अंगभर वस्र असले पाहिजे ही काळजी आई वडीलानी घेतली पाहिजे.लाड,प्रेम मुलीवर केलेच पाहिजे ;पण आपली मुलगी नको ते कपडे घालून वाया जाता कामा नये.तिची संगत ,मित्र,कुटूंब,समाज यावर तिची जडण घडण होत असते.स्री मध्ये अनेक रुपे लपलेली आहेत.


माता,बहिण,मुलगी,पत्नी ही सर्व रुपे महिलांची आहेत.भारतीय संस्कृतीत स्रीला आदराचे स्थान प्राप्त झाले आहेत.तिला देवता,लक्ष्मी समजले जाते.काळानुसार आता महिलांचे सबलीकरन होत आहे.त्यांच्यावर आता पुर्वी सारखी नियम व बंधने कायद्याने संपुष्टात आणले आहे.त्यांच्या विचारधाराना मह्त्त्व प्राप्त झाले आहेत.त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविला जात आहे.पण स्रीयानी आपल्या निरपराध,सुसंस्कृत पतीचा देखील सन्मान, आदर ठेवला पाहिजे.पती व पत्नी हे अजोड नाते असले पाहिजे.एकमेकांच्या विचाराची पातळी समजून घेतली पाहिजे.आपल्या पतीचा विनाकारण द्वेष,घृणा न करणे.आपल्या पतीसमोर मैत्रिणीचा पती खूप चांगला आहे असे कधीच म्हणू नये.त्यांच्यात काय सुधारणा करता येईल त्याकडे विशेष लक्ष ठेवले पाहिजे.


    हुंडा या प्रथेविरुद्ध सर्व महिलांनी एकत्र येणे गरजेचे आहे.त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा,अत्याचाराचा कडाडून विरोध केला पाहिजे.अनावश्यक लग्नातील खर्चिक प्रथा बंद केल्या पाहिजेत.त्यासाठी मुलींनी हुंडा न घेणाऱ्या मुलाबरोबरच लग्न केले पाहिजे.त्यासाठी प्रत्येक मुलीने उच्च शिक्षण घेतले पाहिजे.स्वता:च्या पायावर उभे राहिल्याशिवाय लग्न करू नये.जगण्याची हिम्मत ठेवली पाहिजे.आई वडीलांनी लहानचे मोठे केले हे कदापी विसरू नये.त्यांचा समाजात अपमान होईल असे कोणतेही कृत्य करू नये.तरच स्री जन्माचे सार्थक आहे.


Rate this content
Log in

More marathi story from Sanjay Raghunath Sonawane

Similar marathi story from Inspirational