Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

I3...बहिर्जी नाईक...

I3...बहिर्जी नाईक...

1 min
647


आवडते गुप्तहेर पात्र...बहिर्जी नाईक...


इतकी गुप्तहेर पात्र पहिली पण सारी पात्र वेगवेगळ्या अनुषंगाने आपापली जागा पक्की करून गेली. पण आवडते पात्र म्हंटले की मायभूमीचे मराठी व्यक्तिरेखा असलेले बहिर्जी नाईक हे संभाजी मालिकेतील गुप्तहेर पात्र मनात घर करून मुक्काम करते. बहिर्जी नायिकांची स्वामी निष्ठा,शौर्य,तल्लख बुद्धी आणि सचोटी अशा अनेक गुणांनी संपन्नता खरोखरच कौतुक पात्र आणि वाखाणण्याजोगी हे निर्विवाद सत्य म्हणावे लागते. जीवनातला प्रत्येक क्षण हा कर्तव्याशी, त्यागाशी आणि स्वामीभक्तीशी वाहिलेला हे या गुप्तहेरच्या भूमिकेचे वैशिष्ट्य प्रकर्षाने जाणवते .महाराजांचा तिसरा डोळा म्हणून त्यांची ख्याती होती म्हणून बहिर्जी नाईक हे पात्र अनुकरणशील वाटते आणि आवडते...


बहिर्जी नाईक होते खंबीर

म्हणून राजे नव्हते भयास गंभीर

विश्वास हीच खूण गाठ मनात

राजा वावरतसे निर्धोक जनात...

असा गुप्तहेर पुन्हा होणे नाही

स्वामी निष्टेस इथे तोड नाही

भूमिकेत यांच्या खोट नाही

बहिर्जी नाईकांस दुसरी जोड नाही...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational