STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

3  

Shila Ambhure

Inspirational

हसू

हसू

1 min
259

दिवाळीच्या सामानाने खचाखच भरलेली गाडी सुमतीबाईंच्या दारात थांबली तशा शेजारच्या कामतकाकूनी नाक मुरडले.'नुकत्याच विधवा झालेल्या बाईला कशाला हवी सणाची खरेदी!!!' असे पुटपुटत आणि तोंड वेंगाडत,नाटकी हसत घरात निघून गेल्या.

     दुसऱ्या दिवशी सकाळी वर्तमानपत्रात पहिल्या पानावर ठळक अक्षरात मोठी बातमी होती-' सुमतीबाईंनी फुलवले वृद्धाश्रमातील वृध्दांच्या चेहऱ्यावर हसू '.पण कामतकाकूचा चेहरा मात्र पडला होता. बातमीसोबत एक फोटोदेखील होता ज्यात सुमतीबाई कामतकाकूच्या आईला प्रेमाने लाडू भरवत होत्या.



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational