STORYMIRROR

Shraddha Kandalgaonkar

Abstract Classics Inspirational

3  

Shraddha Kandalgaonkar

Abstract Classics Inspirational

हिरो काही आपल्यातलेच

हिरो काही आपल्यातलेच

2 mins
135

शाळेतून घरी आल्यावर बाबा घरात नाही बघितल्यावर चिमणी ला आश्चर्य वाटले.घरी आल्यावर खाणे पिणे बाबाच तर बघतो आज कुठे गेला हा..सकाळच्या भांडणाची तिला आठवण झाली .शाळेतल्या सहलीला तिलाही जायचे होते पण दोनशे रुपये तिच्या बाबाकडे नव्हते. वीट कामगार असलेला तो ,आठवड्यातून एकदाच त्याला पैसे मिळायचे ते घेऊन संपले पण होते.त्याच्यावर चिडून सकाळी चिमणी रागाने घरातून निघून गेली होती .खरतर पोटात भुकेने आग पडली होती पण तिला काही खावेसे वाटत नव्हते.रात्री उशिरा बाबा घरी आला तेव्हा चिमणी रडून रडून उपाशी झोपली होती.तिच्या गालावरच्या सुकलेल्या अश्रुंवर ओठ टेकवून त्याने एक निःश्वास सोडला."चिमणे, उठ बाळ थोडे खाऊन घेऊ या आपण." बाबाचा आवाज ऐकून ती उठून बसली आणि काही न बोलता त्याच्या कुशीत शिरली.जेवल्यावर त्याने तिला जवळ बोलावले आणि दोनशे रुपये तिच्या हातावर ठेवले.पैसे बघून ती हरखून गेली पण पैसे देणार हात बघून मात्र ती कळवळली.खूप मिनतवाऱ्या केल्यावर तिला कळले की सकाळ पासून बाबा वीट भट्टीवर काम करत होता ..जे काम त्याला सहा तास आठ तास करून थकवा यायचा त्या कामासाठी त्याने चोवीस तास दिले.जेणेकरून त्याला दोनशे रुपये मिळतील.

मुठीतल्या पैशाला घट्ट धरून ठेवत चिमणी म्हणाली ," सगळ्या देवापेक्षा ,सिनेमातल्या मारामाऱ्या करणाऱ्या शक्ती वान माणसापेक्षा माझा बाबा मोठा आहे .माझा हिरो आहे .


रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या तिच्या फोन मधून नंबर बघून तिला घरापर्यंत सोडणाऱ्या त्या भिकाऱ्याला ती म्हणाली,माझ्या साठी आज तुम्ही सर्वश्रेष्ठ हिरो झाला आहात..



काश्मिरी ब्राम्हण असून सुनेचे बाळंतपणात अडलेले पाहून त्यांनी शेजारच्या हमिदा बी ला जेव्हा बोलावले.आणि तिला बाळ आणि बाळंतीण दोघांना वाचवण्याचे साकडे घातले .तेव्हा तिच्यासाठी तिचे सासरे खूप मोठे हिरो ठरले होते.



आईचे अचानक जाणे आणि वडिलांनी धीर सोडून हात पाय गाळणे ह्यामुळे ती अगदी हवालदिल झाली होती.मात्र दहाव्याला वडील परत उभे राहतील मी त्यांना मदत करेन.असे तिने म्हणताच शिवलेला कावळा तिच्या साठी हिरो ठरला होता .ज्यामुळे बाबा दुःखातून बाहेर आले .



तो हिरो केव्हा होतो जेव्हा समोरचा त्याच्या समोर कच खातो आणि हरतो.म्हणजेच समोरच्याच्या हरण्यावर ह्याचे हिरो पण अवलंबून असते.मग समोरचा पेटून उठला तर.....म्हणून म्हणते ,"शारीरिक हिरो म्हणून येणाऱ्या दिवसाची काळजी करत बसण्यापेक्षा ,मानसिक आरोग्य वाढवून संकटाना आव्हान देऊया.. शरीरावर प्रेम करण्यापेक्षा मनाला संस्कार देऊन हिरो बनवूया ...


आजोबांनी सांगितलेल्या हनुमानाच्या गोष्टी शाळेत न चुकता सगळ्यांसमोर सांगता आल्यामुळे छोट्या नितेश आज खूप खूष होता.घरी आल्यावर आपल्या इवल्या हाताचे तोरण आजोबांच्या गळ्याला बांधून तो म्हणाला,आजोबा तुम्हीच माझे हिरो आहात.. बेष्टं बेष्टा....



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Abstract