गूढ - एक रहस्य प्रेम कथा
गूढ - एक रहस्य प्रेम कथा
"प्रेमाच्या समुद्रात तर भल्याभल्या लोकांची जहाजं बुडाली.......
त्यामध्ये आपली कागदाची होडी किती दिवस टिकणारं होती........
महादेव आज पुन्हा कामावर रुजु झाला,सात दिवसांपुर्वीच
त्याच्या बायकोचा (स्वरा) दुर्दैवी अंत झाला असतानादेखील,
सरत्या आयुष्याला मागे सारुन पुढे जाण्याची जी हिँमत महादेवने,
दाखविली ती खरीच वाखाणण्याजोगी आहे...
त्याने त्याचा,
cellphone बाहेर काढला,तर तो cellphone off झालेला
होता,तो चार्जिँगला phone लावताच, एकदमच सात मॅसेजेस
त्याच्या फोनवर येतात....
तो ते उघडतो,त्यात लिहीलेलं असतं,,
"जिस्म से रुह अलग हे हुई,
फिरभी आपसे मोहब्बत ना अलग हुई।
हम तव भी जिँदा थे और अब भी जिँदा है,
बस आपकी दिलमें हमारी यादे गौरतलख है हुई॥
अशा प्रकारचे सात दिवसाचे सात मॅसेजेस त्याच्या मोबाईलवर,
आले होते,आणि ते ही त्याच्या मृत पत्नीचे....
हे वाचुन खरंच,
त्याला जबर आश्चर्याचा धक्का बसला,थोड्या विचारानंतर,
तो एका निष्कर्षावर पोहोचला, कदाचित त्याची
कोणीतरी खोडी करत असेल,म्हणुन तो त्याकडे दुर्लक्ष
करतो...
पण बरोबर संध्याकाळचे सात वाजताच तिचा मॅसेज
पुन्हा आला,
"अब भी बहुत प्यार करते है आपसे,
तब भी थी हमने प्यार की राह चुनली।
हमने सांसो में तो था बसाया आपको,
पर क्या करे कुदरतने हमारी साँसे ही छिनली"
यानंतर खरंच महादेवला थोडी भिती वाटु लागली होती....
खरंच
कोण पाठवतं हे मॅसेजेस.?
हे मॅसेजेस स्वरा पाठवतीये तर ती फोन
का उचलत नाही..?
हा तिचा आत्त्मा आहे का..?
काय आहे...?
राज,काय रहस्य आहे यामागे.....
महादेवच्या मनात विचारांचा हल्लकल्लोळ माजला होता...
एक महीनाभर तिचे मॅसेजेस त्याला येतच असतात...
काही दिवस,
कामाच्या ओघात तो त्यांकडे दुर्लक्ष करत राहीला,पण नंतर
कामावर रजा टाकुन त्याने या गोष्टीँचा सोक्षमोक्ष
लावायचं ठरवलं,तिच्या भुतकाळातली माहीती
काढण्यासाठी तो तिच्या नातेवाईकांकडे गेला
कारण,त्याचा संबंध कदाचित त्याच्या वर्तमानकाळाशी
जोडला गेला असेल....
त्यांच्याकडुन मिळालेल्या माहीतीमुळे तर
त्याच्या पायाखालची जमिनच सरकली....
मिळालेल्या
माहीतीनंतर तो या निष्कर्षावर येऊन पोहोचला की:-
या जगात वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात,पण काहीजण खुपच
Diffrent असतात,ज्यांच्याकडे एक प्रकारची खास
वेगळ्याप्रकारची एक शक्ती असते ज्यांना superhumans
म्हणतात,स्वरा ही अशाच प्रकारच्या एका शक्तीने वरदानित
होती...
तिला अस्पष्ट fictions (कल्पित घटना जी सत्य
होते) दिसायचे...
तिने तिच्या वडीलांच्या मृत्युचे भाकीत अशाच
अस्पष्ट fictions च्या सहाय्याने एक दिवस आधीच वर्तविले,
होते,पण त्यांनी या गोष्टीवर दाखविलेल्या अविश्वामुळे,त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला...
.
.
महादेवला या गोष्टींवर विश्वास ठेवुन पुढे हालचाल,
करण्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच नव्हता,त्याने विचार
केला की,जर खरंच स्वराला तिच्या मृत्युची चाहुल एक दिवस,
आधीच लागली होती,तर तिने स्वतःचा जीव का नाही
वाचवला...?
तिने मला का नाही सांगितलं..?
मनातल्या अशा,
अनेक प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी तो घरी गेला....
त्याने bedroom मध्ये प्रवेश केला...
लाईट ऑन केली,आणि शोधाशोध
सुरु केली,कदाचित असं काहीतरी नक्कीच सापडेल,
ज्याच्यामार्फत स्वराला मला काही सांगायचं
असेल...
कदाचित अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे इथेच मिळतील...
तीन तास चाललेल्या त्याच्या शोध, मोहीमेनंतरही त्याच्या,
हाती काहीच लागलं नाही,तो निराश झाला...
त्याने लाईट बंद केली bedroom च्या बाहेर जाणार तेवढ्यात एक गोष्ट,
त्याच्या ध्यानात आली....
त्याने पुन्हा लाईट ऑन केली,त्याला
लक्षात आलं की लाईटच्या स्वीचला लागुन, असलेलं एक स्वीच,
चालु आहे,आण त्या स्वीचला लागुन एक चार्जरची वायर,
जोडली गेलीय,ती वायर एका कपाटाच्या कोपर्यापर्यँत
गेलीय.....
त्या वायरला त्याने खेचलं,तर त्याला स्वराचा मोबाईल,
मिळाला,,त्याचं 24 hour चार्जिँग चालु ठेवण्यासाठी,
कदाचित ते बटन चालु ठेवलं असावं...
तो मोबाईल चेक करताच त्याला संपुर्ण गोष्टीँचा उलगडा,
झाला,त्यात set time massager नावाची प्रणाली असते,
ज्याद्वारे एखाद्याला मॅसेज पाठवायचा असल्यास तो टाईप,
करुन,सेव्ह करुन,त्याचं sending time set करुन ठेवता येऊ
शकतं....
म्हणजे एखाद्याला ठरलेल्या वेळात मॅसेज मोबाईलद्वारे,
आपोआप पाठवला जायचा...
स्वराला एक दिवस आधी तिच्या मृत्युची चाहुल लागताच तिने,
अशा प्रकारचे हजार मॅसेजेस टाईप करुन सेव्ह करुन ठेवले,
होते,जेणेकरुन तिच्या मृत्युनंतर महादेवला तिची उणीव भासु नये
म्हणुन...
तिची हीच कामना रोज तिचं महादेववरचं नितांत प्रेम,
दर्शविण्यासाठी त्याच्यापर्यँत तिच्या मनातल्या भावना,
पोहोचवण्याचं काम करायची...
महादेवला कळालेल्या या सत्यामुळे तो आतुन पुरता हादरुन गेला
होता....
स्वराचं महादेववर असणार्या नितांत प्रेमाला खरंच तो,
मुकतोय याची जाणीव त्याला होऊ लागली,त्याच्या
डोळ्यात पाणी भरुन आले,तो पुन्हा एकदा स्वराच्या प्रेमात पडला होता..
त्याने तो मोबाईल तसाच तिथे ठेवुन दिला,आणि bedroom बंद
केली....
आज महादेवच्या रोजच्या routine मध्ये येणारे ते स्वराचे massages
वाचुन महादेव प्रफुल्लित व्हायचा...
आज तिच्या मुत्युनंतर अडीच वर्षानंतर देखील स्वराच्या रोज,
येणार्या मॅसेजेस मुळे त्याला एकदिवसही असं वाटलं नाही की,
तीचा मृत्यु झालाय...त्याला असं वाटायचं की ती
त्याच्याजवळच आहे.......
मित्रांनो मी लिहीलेली ही प्रेमकथा तुम्हाला कशी
वाटली..ते कळवा..?
"तु आलीस जिवनी,रंग माझे बहरूण आले,,
धूंद तुझ्या आठवणी,नयनी अश्रु सोडूनी गेले..."
" एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर..."
मी ....!!!
कसा पण आसो..वाईट किंवा चांगला. जो काही,आहे..स्वतःचा जिवावर आहे...
एक प्रियकर......

