गोविंद
गोविंद
मीराताई देशपांडे बराच वेळ दुकानांमध्ये बसून होत्या, त्यांना तशी घरी जायची काहीच घाई नव्हती कारण आनंदराव देशपांडे कोरोनामुळे मृत्यू पावल्यानंतर मीराताई एकट्याच होत्या.
मुलगी अनु शहरातच होती पण आपल्या सासुरवाडीला, आपल्या संसारात मग्न.
जवळ-जवळ एक तासानंतर शेफाली एका तरुण मुलाला घेऊन पुढे आली,"हा घ्या तुमचा गोविंद"
" गोविंद! मला हवं तेच नाव, गोविंद, तुला माझ्याबरोबर राहायला आवडेल?" मीराताई म्हणाल्या.
" हो, आवडेल की." गोविंद म्हणाला.
मीराताईच्या सांगण्यावरूनच मुलाचं नाव गोविंद ठेवलं होतं.
"हा तुमचं सगळं काम करेल, त्याला गाडी चालवायला शिकवला आहे, पण शक्यतोवर गर्दीच्या रस्त्यावर जाऊ नका. त्याला इंटरनेट येते, तुम्हाला लागणारे सामान तो ऑनलाइन मागवून देईल. घरातलं सगळं काम करेल. फक्त त्याला जास्त वेळ गॅसपाशी उभा राहू देऊ नका. त्याला काही खायला पण घालू नका. जेव्हा केव्हा त्याची बॅटरी कमी होईल तेव्हा तो स्वतःहूनच स्वतःला चार्ज करेल." शेफालीने माहिती दिली. त्याच्याबरोबर एक सविस्तर माहिती पत्रिकादेखील मीराताईच्या हातामध्ये ठेवली. "तुम्हाला जोपर्यंत गोविंद हवा आहे तोपर्यंत तुम्ही ठेवून घ्या, महिन्याला तुमच्या अकाउंटमधून आम्ही आमचं भाडं वसूल करू." शेफालीने सांगितले.
64 वर्षाची मीराताई एकदम आनंदात घरी आली. जाताना तिची छोटी गाडी तिनेच चालवली होती पण येताना मात्र गोविंदाच्या ताब्यामध्ये गाडी देऊन त्याला घरापर्यंत द्यायला सांगितले. इतका आराम झाला.
आनंदराव देशपांडे यांनी आपल्या मिळकतीतून मोक्याच्या जागी एक छोटा प्लॉट घेऊन मस्त टुमदार बंगला बांधला होता, सभोवताली रंगीत फुलांची बाग, मीराताईला आवडते म्हणून पारिजातकाची, रातराणीची झाडं, देवाच्या पूजेसाठी विविधरंगी फुलांची झाड, तसेच कोपऱ्यावर आंब्याचं तर दुसऱ्या कोपऱ्यावर शेवग्याचे झाड, मीराताईने हौसेने भाजीपालादेखील लावला होता, एकटा जीव किती असा भाजीपाला लागणार, पण हौसेला कुठे मोल असतं?
सुरुवातीला देशपांडे यांचा"आराम" हा बंगला गावाबाहेर होता, पण गावच एवढं वाढलं की आता बंगल्याच्या आजूबाजूला भरपूर लोकवस्ती झाली होती. काही शेजाऱ्यांनी तर आपले बंगले विकून तिथे उंच इमारती बांधून घेतल्या होत्या त्याच्याबद्दल यामध्ये त्यांना खाली दोन दुकानं आणि वरती दोन फ्लॅट मिळाले होते. पण फ्लॅटमध्ये बागेची मजा कशी मिळणार? म्हणून मीराताईने मात्र आपला बंगला असाच ठेवला होता.
मीराताई शाळेमध्ये शिक्षिका, त्यामुळे त्यांच्या घरी वाचनालयाची खोली होती. खोली मधली पुस्तके बघून गोविंद अतिशय खूश झाला, त्याला हिंदी मराठी आणि इंग्रजी वाचता येत होतं. आल्यानंतर त्याने भराभर कामाला सुरुवात केली,
" मी कुठे राहायचं? मी कुठे झोपायचं?" असले फालतू प्रश्न त्याने विचारलेच नाहीत. त्याला झोपच यायची नाही त्यामुळे तो रात्रभर पुस्तक वाचत बसायचा. शंभर वेळा गोविंद गोविंद म्हणून मीराताईचा जप देखील आपोआपच होत होता. आठवड्याभरातच गोविंदनं सगळी कामं माहिती करून घेतली, बरीचशी कामं मग तो न बोलताच करायचा.
मीराताई पेटी उत्तम वाजवत, गोविंद घरात आल्यामुळे कामापासून त्यांची बरीच सुटका झाली होती, जेवण झाल्यावर दुपारच्या वेळेस त्या आपल्या भजनाचे पुस्तक उघडून पेटी वरती भजन गात बसायच्या. आजूबाजूच्या स्त्रियांना मिळून त्यांनी एक छोटासा भजनी मंडळ पण स्थापन केलं होतं. दर गुरुवारी त्यांच्याकडे संध्याकाळी भजनाची दंगल असायची.
आता चहा करण्यासाठी त्यांना उठावे लागत नव्हतं, गोविंद आपोआपच चहा घेऊन यायचा. कधीकधी गोविंद हौसेने उपमा किंवा पोहेदेखील करायचा. भजनी मंडळाच्या स्त्रियांचा गोविंद हा एक कौतुकाचा विषय झाला होता.
सगळं काही उत्तम चालू होतं, मध्ये मध्ये गोविंद देखील मीराताई यांच्याबरोबर पेटी शिकत असे.
रात्रीचे जेवण झाल्यावर सगळं आवरून झाल्यावर मीराताई भगवद्गीता वाचत, त्यांच्याबरोबर गोविंद पण मन लावून ऐकत असे.
अर्जुनाने काय प्रश्न केला? त्याच्यावर श्रीकृष्णाचे काय उत्तर होते? महाभारताचे मूळ कारण काय? जर एखादा नातेवाईक आपल्याला किंवा आपल्या जीवाला धोकादायक असेल तर त्याच्याशी कसे वागायचे, या सगळ्यांची उत्तरं श्रीकृष्णाने दिलेली होती.
गोविंदाचे प्रश्न पण मजेशीर असायचे,"कली म्हणजे काय? धृतराष्ट्राने पुत्र मोहापायी आपल्याच पुतण्यांना एवढा का त्रास दिला? किंवा दुर्योधनाने द्यूत खेळताना स्वतःची बायको का पणIला लावली? आणि धर्मराजाने त्याचं अनुसरण का केलं?
अभिमन्यूच्या मृत्यू माहिती असून देखील श्रीकृष्णाने त्याला रणांगणावर ती का जाऊ दिले? करणाला जेव्हा कळले की तो पांडवांचा मोठा भाऊ आहे तेव्हा तो त्यांना जाऊन का नाही मिळाला?"
मीराताई आणि गोविंदाची चर्चा मस्तपैकी रंगायची. गोविंदाला कितपत कळायचं माहिती नाही पण तो हुशार मात्र होता.
गोविंदाचे वाचन जबरदस्त होतं, भगवद्गीता दोन वेळा वाचून, आता त्यांनी भागवत देखील वाचायला सुरुवात केलं होतं.
अनु,जावई, नातवंड, मधून मधून येत, त्यावेळेला गोविंदला भरपूर काम पुरे. पण मीराताईच्या आनंदामुळे गोविंद पण झटून काम करेल. छोट्या नातवंडांवरती लक्ष ठेवणे, त्यांच्याबरोबर खेळणे गोविंद फार आवडे. घरामध्ये गोविंदा आल्यामुळे चैतन्य पसरले होते, त्यामुळे अनु फारच निर्धास्त झाली होती.
सगळं नीट चालत असताना अचानक शेजारचा शब्बीर शेख एके रात्री घरी आला, मीराताईला म्हणाला,"हमे या पे एक बडा मॉल बनाना है, आपका बंगलाही बीच मे आ रहा है, चाहे तो हमे दीजिए," आजूबाजूला मुसलमान वस्ती वाढू लागली होती त्यामुळे अनुला आईची काळजीच वाटत होती.
मीराताईला भयंकर धक्का बसला. बंगला विकायचा? कशासाठी? आणि जायचं कुठे?
आठवड्याचा अवधी देऊन शब्बीर एके दिवशी मीराताईंच्या जावयाबरोबर आला.
अनु आणि जावई यांचं म्हणणं होतं बंगला विकून मीराताईंनी एखादं लहानसं घर घ्यावं अनुच्या घराजवळ, येणाऱ्या पैशातून तिचं पुढचं आयुष्य पण सुखाचं झालं असतं. अनु आणि जावयामध्ये त्या दिवशी भांडण झाले. जावई यांचं म्हणणं म्हातारीने एकटे राहू नये आणि त्यांच्या डोक्याला त्रास देऊ नये. अनुच्या देखत जावयाने मिराबाईबद्दल अतिशय वाईट शब्द काढले. अनु रडत आत आली. आता हॉलमध्ये फक्त गोविंद आणि जावई असे दोघेच होते, जावयाने गोविंदला अद्वातद्वा बोलले, जवळ घेऊन त्याच्याशी धक्काबुक्की पण केली, आणि अचानक जावई खाली पडले त्यांच्या तोंडातून फेस यायला लागला.
मीराताईंनी डॉक्टरला बोलून घेतले. डॉक्टर म्हणाले,"विजेचा सौम्य झटका लागल्यासारखे दिसत आहे." मीराताईंनी गोविंदकडे बघितले. मीराताईने बघितल्यानंतर गोविंद तिथून निघून गेला, मीरा ताईंच्या लायब्ररीमध्ये येऊन त्याने भगवद्गीता काढली आणि शांतपणे वाचायला सुरुवात केली. त्याचेही वागणे मीरा ताईंना आवडले नाही, त्यांनी शेफालीला फोन केला,
"मी तुम्हाला आधीच सांगितले होते, गोविंदला मारहाण केली तर तो विजेचा झटका देऊ शकतो. तुम्ही तुमच्या मुलीला आणि जावयाला समजावून सांगा." शेफाली म्हणाली.
शब्बीरला घर विकण्याची कल्पना मीराताईंना पसंत नव्हती, आपली वास्तू, आपलं घर, आपला शेवटचा श्वास इथेच असावा अशी त्यांची इच्छा होती. वेळोवेळी त्यांनी बोलून देखील दाखवली होती.
पावसाळी दिवस होते, मीराताईच्या घरामध्ये थोडेफार गळत पण होते, पण गोविंदने गच्ची वरती ताडपत्री टाकून होणारी गळती थांबवली होती. अनु आणि जावई परत परत येऊन मीराताईवरती दबाव टाकत होते.
एके रात्री काही गुंड बंगल्याच्या आवारात शिरले आणि त्यांनी दगडफेक केली, त्याच्यामध्ये शब्बीर पण होता, शब्बीरचा मोठा शिकारी कुत्रा गोविंदवर घेऊन चालून आला, गोविंद खाली पडला पण कुत्रा देखील काळा होऊन मरून पडला, दगडफेकीमध्ये एक दगड गोविंदला लागून तो खाली पडला. हा सर्व प्रकार बघून मीराताईंनी पोलिसांना फोन केला.
पोलीस काय करणार? पोलिसांनी मीराताईंना त्या वस्तीतून दूर जाण्यास सांगितले.
गोविंद अजूनही हालचाल करत नव्हता.
शेफाली ताबडतोब आली, गोविंदाच्या डोळ्यांमध्ये दगड मारणाऱ्याचा चेहरा फोटो आला होता. शेफालीने मीरा ताईंना सावध राहण्याची सूचना केली. गोविंदाच्या मध्ये जे काही नुकसान झालेलं होतं त्या सगळ्या चिप्स तिने बदलून टाकल्या, तिने गोविंदला अजून सशक्त आणि ताकदवर बनवले. स्वतःच्या रक्षणाची चीप प्रोग्राम करून गोविंद मध्ये टाकली.
थोडे दिवस शांत राहून एकेदिवशी दुपारीच शब्बीर घरी आला, तो बहुतेक दारू पिऊन आला होता, मीराताईला वाटेल ते बडबडू लागला, जादूटोणा करून आपला शिकारी कुत्रा मारल्याचा त्याने आरोप केला, तिला धमकी देऊ लागला, पावसाळी दिवसामुळे विजा चमकत होत्या, अनुला फोन करण्यासाठी म्हणून मीराताई स्वयंपाक घरामध्ये आली, एक जोरात वीज चमकून बंगल्याचे दिवे गेले, शब्बीरची जोरदार आरोळी ऐकू आली म्हणुन त्या धावत बाहेर आल्या. अंगणामध्ये शब्बीर काळा होऊन पडला होता, बहुतेक वीज कोसळली होती.
मीराताईंनी प्रश्नार्थक नजरेने गोविंदकडे बघितले,"कोणीही तुम्हाला नुकसान पोहोचवत असेल तर मला काय करायचे हे माहित आहे,
जेव्हा आकाशात वीज चमकली तेव्हा शब्बीरने मला मिठी मारली आणि तो काळा होऊन पडला."
शब्बीरचे नातेवाईक आले, डॉक्टरांनी सांगितले वीज पडल्यामुळे शब्बीर मेला. शब्बीरच्या नातेवाईकांमध्ये एकच दहशत निर्माण झाली, त्यांनी आजूबाजूचे बळकावलेले बंगले रिकामे केले आणि मूळ मालकांना परत दिले.
त्या रात्री मीराताईंनी आणि गोविंदाने मिळून भगवद्गीतेचा बारावा अध्याय परत एकदा वाचून काढला.
गोविंदाच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवून मीराताई म्हणाल्या," तूच माझा हरी, कृष्ण आणि गोविंद आहेस."
