kanchan chabukswar

Drama Others

2.7  

kanchan chabukswar

Drama Others

गोतावळा

गोतावळा

9 mins
335


शेवटी बँकेत काम करणाऱ्या नानू कामतला मनासारखा बंगला मिळाला. नानू कामत, बँकेच्या लोन डिपार्टमेंट मध्ये मुख्य अधिकारी म्हणून काम करत होता, नानू आणि सरू सेवानिवृत्त झाल्यावर मस्तपैकी नदीकाठच्या बंगल्यात रहायचे स्वप्न बघत होते.नानु च्या परदेशी गेलेल्या मुलांची शिक्षण, घरचा खर्च, आणि मागच्या वर्षीपर्यंत कॅन्सर आजारी असलेल्या म्हाताऱ्या चा खर्च यामुळे, नानुचे स्वप्न स्वप्नच राहत होत. कर्ज न चुकवलेल्या मालकांच्या प्रॉपर्टी नानू अधिक काळजीपूर्वक डोळ्याखालून घालायचा, न जाणे त्याच्या बजेटमध्ये बसणारी एखादी वास्तू त्याच्या नशिबात असेल.

   13 ऑगस्टला नानूचे नशीब फळले. विकी शेट्टीची प्रॉपर्टी लिलावात निघाली. वैतरणा काठी बरीच प्रॉपर्टी होती, बैठे बंगले, तयार कंपाऊंड, शांत नदीचा काठ. खुर्चीवरून उडीच मारली नानूने.  कर्जमधलं साटंलोटं करण्यासाठी विकीशेठ वाटेल ते करायला तयार होतात, नानू या पसंत असणारा असा 5 खोल्यांचा बंगला अतिशय कमी किमतीत नानू ला विकला. बंगल्याचे लेआउट, बाजूचे दोन रिकामे प्लॉट देखील अतिशय कमी किमतीत नानूने विकत घेतले.कर्जाचं लफडं बऱ्याच प्रमाणात कमी झाल्यामुळे विकीशेठ अतिशय प्रसन्न होऊन घरी गेला, नानू पण समाधानाने घरी आला, ताबडतोब व्हिडिओ कॉल करून त्याने अरविंद आणि अनुराधाला ही गोड बातमी दिली. मुलं तर बेफाम खूष झाली. विकीशेठने फटाफट कागदपत्रं करून बंगला नानूच्या नावावर केला. त्याचा वेग बघून नानूला आणि बँकेच्या बऱ्याच लोकांना आश्चर्य, आणि हेवामिश्रित असूया वाटली.

    

त्याच रविवारी वास्तुशांती करा, असं म्हाताऱ्या गुरुजींनी नानूला सांगितले. विकीशेठ त्याचा ब्राह्मण ऑनलाईन देणार होता. पाहुणे कोणी येणारच नव्हतं, ते एक बरं झालं म्हणा, उगीच लोकांना फार असूया वाटते. आयुष्य भाड्याच्या घरात घालवून आता सुखाचे दिवस येणार होते. सरू आणि नानू ताबडतोप नवीन घरात जाण्याचा निर्णय घेतला. बंगल्यापासून स्टेशन दोन किलोमीटरवर होते तेवढा त्रास नानू आनंदाने सहन करणार होता. 


स-मा-धा-न, अशी सुट्ट्या अक्षरांची पाटी तयार करून बंगल्यावर लावण्यात आली. नानू आणि सरू सामानसुमान घेऊन शुक्रवारीच नवीन बंगल्यात दाखल झाले. बंगला रो हाऊस सारखा होता, खालच्या मजल्यावर आटोपशीर स्वयंपाक घर, त्याच्यामागे थोडी अंधारी कोठीची खोली. मागच्या बाजूला अंगणात जाण्यासाठी दार, पक्का बांधलेला पाण्याची टाकी- हाऊद, पक्की बांधलेली मोरी. स्वयंपाकघराच्या पुढे दिवाणखाना, बाजूला एकखोली, लहानसा

पोर्च, एखादी लहान मारुती गाडीएवढा. समोर मोठे अंगण, डावीकडे मस्त झोपाळा, आणि उजवीकडे भरपूर फुलझाडं. वरच्या मजल्यावरती दोन शयनकक्ष, त्याच्यासोबत गच्ची, तिथे पण एक लाकडी झोपाळा. गच्चीवरती चढलेली सायलीची वेल, सगळं बघून सरू अतिशय खुश झाली. एकच गोष्ट खटकली की मागच्या अंगणातली तुळस अगदी मरून गेली होती. बाजूचे दोन प्लॉट पण त्यांचेच होते, प्लॉट लागूनच शंकराचे देऊळ होतं. बंगल्यापुढे पक्का रस्ता, रस्त्याच्या पुढे दोनशे फूट गेल्यावर वैतरणी च्ची सुरेख चंद्रकोर. जणू काही स्वप्नातलं घर.


         दिवसभर सामान-सुमान ला लावण्यामुळे दोघेही थकून गेली होती, संध्याकाळी अंगणातल्या झोपाळ्यावर बसून, सरू न आनंदाने डोळे मिटले.

   थोड्याच वेळात तिला आजुबाजूला कुजबुज ऐकू आली, जसं काही एखाद्या हॉलमध्येच बसली होती, स्पष्ट शब्द ऐकू येत नव्हते, पण 'आले आले', काहीतरी ऐकू येत होतं. मनाचे खेळ आहेत असं समजून सरू गप्प बसली.


रविवारी सकाळी दोघेजण बंगल्याकडे आले, आज वास्तुशांत होती. बघतात काय, समाधानमधली, स ची दांडी आणि ध अक्षर गायब झालं होतं.

नानूला तिकडे लक्ष देण्यासाठी काही वेळ नव्हता, कुलूप उघडून दोघेही आत आले, सामान जागेवरच होतं, भरभर पूजेची तयारी केली. गुरुजींनी साडेनऊची वेळ दिली होती, त्याच्या आत सरूला सगळा स्वयंपाक करायचा होता. नानू होमकुंड मांडून सगळी तयारी करून बसला, आयपॅड चालू करून दोघंही पूजेला बसले. थोडं विचित्रच वाटत होतं, एवढी आयुष्यभराची कमाई पण बघायला कोणी नाही. मूल पण ऑनलाइन पूजा बघायला आले. स्वयंपाक घरातून जरा विचित्र आवाज यायला लागले म्हणून सरू सतत जाऊन बघत राहिली. सगळं काही आलबेल होतं.

अनिरुद्ध मधेच म्हणाला,"कॉलनीतले बरेच जण आलेले दिसतात" भटजी पण छान आहेत बरं"

 नानू खेकसला,"अन्या तिरकस बोलू नकोस."

अनुराधा म्हणाली म्हणाली," आई, सोळा सोमवारचे उद्यापन पण करतेस का? एवढ्या सुवासिनी बोलावल्यास?" सरू न तिच्याकडे काही लक्ष दिले नाही, घरात नानू आणि सरू शिवाय दुसरं कोणीच नव्हतं.

परत अनिरुद्ध म्हणाला," नाना फोटो कोणाचा लावलाय भिंतीवर?" मी पाठवलेली फोटो फ्रेम नाही लावली?"

पूजा चालू असल्यामुळे नानू आणि सरू यांनी काही उत्तरच दिले नाही. दोघेजण शेवटची आहूती साठी उभे राहिले.

स्वयंपाक घरात भांडी पडण्याचा आवाज आला, तशी सरू धावली. भटजींचे मंत्र म्हणून झाले होते, म्हणून त्यांनी आयपॅड बंद करून टाकलं. सरू चा धावण्यामुळे नेमकं बाजूला ठेवलेला तांब्या यज्ञकुंडात पडला आणि ते भिजून गेले. शेवटची आहूती पडलीच नाही. अचानक होमकुंड पण विजून गेलं.

“झाली ना पूजा”, असं म्हणत नानू बाजूला बसून गेला.


स्वयंपाक घरामध्ये, सगळं सामान तर जागेवरच होतं, आवाज कसला बरं आला. मात्र सगळ्या भांड्यांवरची झाकणं उघडल्या सारखी दिसत होती.

मुले अजूनही ऑनलाईन होती. अनुराधा गमतीने म्हणाले," मी येऊ का वाढायला आई, इतक्या सगळ्या लोकांना तु का एकटीच वाढणार?" सरू रागाने म्हणाली," कुजकट पणाची सवय गेली नाही का अनु?"


     केळीच्या पानावरती नैवेद्य वाढून, सरू न देवापुढे ठेवला, एक पान वाढून, सरू आणि नानू पुढच्या अंगणात आले, सूर्य दर्शन घ्यायचं होतं. पाण्याने भरलेली कळशी सरू न डोक्यावर घेतली आणि बंगल्याच्या चारी बाजूला हलके-हलके प्रदक्षिणा घातली. पुढच्या अंगणात नानू उभा होता, स्वतःची सेल्फी काढताना अचानक त्याचे लक्ष बंगल्या कडे गेलं, काही अक्षर पडल्यामुळे फक्त स्मशान अशा काही तरी भास होत होता. नानु च्या अंगावर सरसरून काटा आला. समाधान -स्मशान कस झालं?


     सरू जेव्हा मागच्या अंगणामध्ये गेली तेव्हा तिला तिथे, खरकटी केळीचे पान दिसली, जणू काही आत्ताच कोणीतरी जेवून उठले असेल. तिला नवलच वाटलं अजून तर कोणाला जेवायला पण वाढलं नाही, आणि घरात तर दोघांच्या शिवाय कोणीच नाही. तिकडे लक्ष न देता तिने बंगल्याची प्रदक्षिणा पूर्ण केली, बंगल्या समोर आली, आणि डोळे मिटून उभी राहिले." छान झाला होता स्वयंपाक, नेहमीचे खीर वडे खाऊन फार कंटाळलो होतो, तुझी पुरणाची पोळी मात्र फार छान झाली होती." कोणीतरी कानाशी कुजबुजल, खाडकन सरू न डोळे उघडले. तिला काही अर्थच कळला नाही.

तेवढ्यात नानू ने तिला फोटो काढण्यासाठी बोलले, दोघांनी भरपूर सेल्फी काढल्या, एकमेकांचे फोटो काढले, नानू चेहऱ्यावरती आनंदापेक्षा काहीतरी काळजी दिसत होती.


सरू म्हणाली, "भटजी नाही कोणी नाही निदान शंकराच्या देवळात तरी एक पान ठेवून येते."

भराभरा सरू ने देवापुढे ठेवलेलं पान घेतलं, हातात एक दिवा घेतला, आणि शंकराच्या देवळात निघाली. देऊळ शांत होतं, शंकराच्या पिंडीवर नुकतच कोणी बेलाचं पान ठेवून गेलं होतं, शेजारचा दिवा विझला होता, म्हणून सरून आपण आणलेला दिवा लावला, आणि पिंडीपाशी पान ठेवलं. हात जोडून सरूनं डोळे मिटले, परत तसाच कुजबुज कुजबुज आवाज ऐकू आला, काही शब्द स्पष्ट ऐकू येत होते, पुरणपोळी, कुरडया, भजी, गरम वरण भात. काही मुलांच्या पण हसण्याचा आवाज येत होता, काही पुरुषांच्या जाड आवाजातल्या बोलण्याचा आवाज येत होता. तेवढ्यात एका मुलीचा आवाज आला," जाऊ द्यायचं नाही बरं!"


सरूने डोळे उघडले, बघते तर भोवताली कोणीच नव्हतं, अचानक तिच्या अंगावर सरसरून काटा आला. हातातलं सामान तसेच टाकून ती बंगल्याच्या दिशेने धावली. तिचं लक्ष बंगल्याच्या पाटीकडे गेलं, समाधानच्या ऐवजी चक्क स्मशान दिसत होतं. पुढच्या पायरीवर नानू बसला होता. त्याला काहीच न सांगता ती म्हणाली चला जेवू या. स्वयंपाकघरात गेली तर सगळी भांडी रिकामी होती.

   अनिरुद्ध म्हणाला," आई गंमत करतेस का? तू तर सोळा सुवासिनी बोलवले होत्या, आणि सगळ्याजणी काय ठरवून नऊवारी साडी नेसून आल्या होत्या का? सगळे ब्राह्मण पण काय मस्त सोवळी नेसून आले होते, मुलं पण आली होती वाटतं?" अनुराधा पण तेच म्हणाली." सगळे फार खूष होत्या तुझ्या स्वयंपाकावर." आता मात्र सरू घाबरली. पूजेच्या आधी केलेली साबुदाण्याची खिचडी दोघांनी खाल्ली आणि गप्प बसले. आज पूजा झाली होती त्यामुळे रात्री याच बंगल्यात त्यांना राहायचं होतं. आता मात्र सरू आणि नानू मनातून घाबरून गेले होते. चार वाजता चहा करण्यासाठी सर्व स्वयंपाक घरात आली, तर दूध नासलेले होतं. तिला वाटलं ठीक आहे ना नवीन जागा नवीन पाणी काहीतरी चुकलं असेल.


पावडरच्या दुधाचा चहा करून दोघांनी मुकाट्याने पिऊन घेतला. संध्याकाळ झाली तसं उगीचच सरू आणि नानू गप्प गप्प झाले. वातावरणा मधला ताण घालवण्यासाठी नानू म्हणाला चल." वैतरणा काठी जाऊन येऊ जरा." सरू ला तेच पाहिजे होतं, घराला कुलूप लावून दोघेही नदीकाठी गेले. नानू म्हणाला," सगळ्याची सवय होईल गं, शेजारच्या बंगल्यांमध्ये ओळख करून घे, तुझा पण वेळ जाईल आणि आता सहा महिन्यांनी मी पण निवृत्त होईल मग आपण आनंदाने इथे राहू"

  

दिवसभर दमल्यामुळे, खिचडी खाऊन दोघही झोपण्यासाठी वरच्या मजल्यावर गेले. मध्यरात्री अचानक दोन्ही झोपाळे वाजू लागले जसं काही कोणी झोपाळ्यावरती झोके घेत आहे. डोक्यावर उशी घेऊन नानू आणि सरू झोपण्याचं ढोंग करत झोपूनच राहिले. सुटला असेल वारा, दुसर्‍या दिवशी मात्र दोन्हीही झोपाळे खाली उतरून ठेवू या असे म्हणून सरूची समजूत काढली. आता मात्र नानू आणि सरू जामच घाबरले. इथे कसे राहायचं? त्यांना दोघांनाही प्रश्न पडला. दुसऱ्या दिवशी नानूने विकी शेठला फोन लावला, विकी शेठचा मुलगा म्हणाला,”विकी शेठ सहा महिन्यासाठी लंडनला गेले आहेत, आल्या नंतर बोलू.“


     नानूने आठवड्याची सुट्टी घेतली होती त्यामुळे दुसऱ्या दिवशी पण मुले जेव्हा ऑनलाईन आली तेव्हा दोघांना आश्चर्याचा धक्काच बसला.

अनिरुद्ध म्हणाला,"बाबा सोफ्यावर कोण पाहुणे बसले आहेत?" आणि ही मुलं कोण आहेत?" खरं म्हणजे मागे सोफा पण नव्हता आणि काहीच नव्हतं.

नानूच्या लक्षात काहीतरी गडबड आहे, हे जाणवलं. घरात भाजी नव्हती म्हणून जवळच्याच मंडईमध्ये सरू दूध, भाजी आणायला गेली.


म्हाताऱ्या भाजीवालीने सरूला विचारले,"नवीनच आलीस का माय? कुठे राहतेस? बंगला नंबर काय?" सरूनं जेव्हा पत्ता सांगितला तेव्हा भाजीवालीचे डोळे वाटीएवढे मोठे झाले. तोंडावर हात ठेवून म्हातारी सरू ला म्हणाली,"काय अवदसा आठवली माय तुला, अग स्मशानात का कोणी घर बांधत? फुकट जरी दिलं ना तरी राहू नये. शंकराचे देऊळ, नदीचा काठ, समजत नाही का ग तुला? दहनभूमीवरती घर आहे ते. इतकी वर्ष रिकामा पडलं होतं. तुझ्या नवऱ्याला गंडवले कोणीतरी. या माय इथून निघून जा." रडतच सरू घराच्या दिशेने निघाली, चालत, चालत ,बंगला काही दिसेना, तिला अजूनच रडू फुटलं ना शंकराचे देऊळ ना त्यांचा बंगला. नानू रस्त्यावरच उभा होता. त्याला मिठी मारून सरू म्हणाली,” नको, नको, आपल्याला हे घर,, आपण परत आपल्या जुन्या घरी जाऊ. “


नानू हसला आणि सरूला म्हणाला, “सगळे मनाचे भास असतात, कोण कुठली भाजीवाली, कशाला तू लक्ष देते. आणि जर येणाऱ्या लोकांना आपल्या घरी जेवायला आवडत असेल तर जास्त स्वयंपाक करत जा घाबरते कशाला. जोपर्यंत आपल्याला कोणी त्रास देत नाही तोपर्यंत आपण सगळेच गुण्यागोविंदाने इथेच राहू. असतात अगं माणसाच्या अतृप्त इच्छा, खायची असते कोणाला पुरणाची पोळी, त्यात काय एवढं! घाबरू नको हो. “

“आणि खरच जर 16 सुवासिनी येऊन आपल्या नवीन बंगल्यात जेवण केले असतील तर त्या आपल्याला आशीर्वाद देतील, तु अजीबात घाबरु नकोस. “

रडत- रडत सरू न देवळातल्या प्रसंग नानू ला सांगितला, त्यावर देखील नानू म्हणाला," म्हणतात ना ते की आपल्याला जाऊ द्यायचं नाही तर ते कुठल्याही घरी येतील त्यापेक्षा आपण येथेच राहू." सरू मात्र मनातून तुफान घाबरली होती.

 

नानुच्या पुढे भयंकर मोठा प्रश्न पडला, आयुष्यभराची कमाई त्याने बंगल्यासाठी घातली होती, आता फक्त पेन्शनवरती जगायचं असं त्या दोघांनी ठरवलं होतं. जबाबदाऱ्या संपल्या होत्या, सरूला मध्येमध्ये ब्लडप्रेशर वगैरेचा त्रास व्हायचा पण अगदी किरकोळ, त्याच्यामुळे दोघांनीही आनंदानी राहायचं ठरवलं होतं. बंगला विकला तर जाणार नव्हता, रात्रभर विचार करून नानूने मनाशी काहीतरी ठरवले.


   दुसर्‍या दिवशी त्याने सरूला देवळात पाठवले, घराचे दार बंद करून, नानू कोठीच्या खोलीत शिरला. हात जोडून म्हणाला, तुम्ही कोणीही असा, पण फक्त कोठीच्या खोलीतच रहा. तुमच्या काय इच्छा असतील, काय खायचं असेल, ते आम्ही पूर्ण करू, जर तुम्ही माझ्या बायकोला किंवा मला विचित्र त्रास दिला तर मात्र मी मांत्रिकाला बोलावून तुम्हाला हाकलून देईन.

     कोठीच्या खोलीमध्ये नानू एक पाटी आणि पेन्सिल ठेवली, हात जोडून म्हणाला, तुमच्या इच्छा याच्यावर लिहित जा. अचानक पाटीवरती रेघोट्या दिसल्या, नानू ने विचारले,"काय पाहिजे?"

नानूच्या मागून आवाज आला, आमच्या मुलांना इथे खेळायचं असतं, सगळे डबे असे चिटकून- चिटकून ठेवत जाऊ नका, धक्का लागला तर पडतील, नाही! मग आम्हाला बोल लावायचा नाही.

 

 नानूच्या लक्षात आले, प्रत्येक दोन किंवा तीन डबे मांडून त्यानंतर त्यांनी दोन-तीन इंचाची जागा ठेवली,"आता ठीक आहे"?

 पाटीवरती बरोबरची खूण आली.

   नानू हसला, म्हणाला हे तर फारच सोपं काम झालं. त्यानी मनाशी पक्कं ठरवलं, की काहीही झालं तरी इथून जायचं नाही.

परत वळून नानू ने सांगितले,"तुमच्यासाठी फक्त कोठीची खोली बर का, बाकीच्या खोल्यांमध्ये यायचं नाही, उगीच झोपाळ्यावर बसायचं नाही, तुम्ही जा ना तिकडे वडाच्या पारंब्यांवर खेळा. परत सांगतोय, माझ्या बायकोला घाबरवायचं नाही." अजून एक, सरू फक्त एक पान वाढून बाहेर तुळशीपाशी ठेवेल, रोज एक पान जरूर वाढेल, तुम्ही पाळीपाळीने जेवायला येत जा. आणि जेव्हा माझी मुलेबाळे येतील तेव्हा प्लीज दुसरीकडे कुठेही जा.”

"अजून एक" नानू म्हणाला,"माझ्या बायकोच्या साड्यांच्या कपाटात, किंवा माझ्या कपाटात कुठेही घुसायचं नाही."

तेवढ्यात पाटीवरती शब्द उठले, "नातेवाईकांना बोलवाल का?"

प्रश्न केला,” ते तुमच्यासारखेच आहेत का जिवंत आहेत?

जिवंत असतील तरच बोलवा, नाहीतर मी मांत्रिकाला बोलावून तुम्हाला सगळ्यांना इथून हाकलून देईन.“


एवढी धमकी देऊन नानू कोठी घरातून बाहेर आला, सरू देवळातून परत आली होती, आनंदात दिसत होती, देवळामध्ये तिच्या बर्‍याच नवीन ओळखी झाल्या होत्या. फोन करून नानूने कारपेंटरला बोलावले, बंगल्यावरचं नाव काढून "गोतावळा" अशी पाटी करायला सांगितली.

##################################################################################


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama